Home Bibles योहान 11:55 · मराठी बायबल
योहान 11:55 · मराठी बायबल

तेव्हा यहूघांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि सणाअगोदर पुष्कळ लोक आपणांस शुद्ध करायला देशातून वर यरुशलेमेस गेले.

Cross references

उत्पत्ति 35:2

तेव्हा याकोब आपल्या घरच्या मंडळीस व आपल्याबरोबरच्या सगळ्या दासांना म्हणाला, “तुमच्या जवळ असलेले लाकडांचे व धातूंचे परके देव फोडून तोडून टाका; तुम्ही स्वत:ला शुद्ध करा; स्वच्छ कपडे घाला;

निर्गम 12:11

ते खाण्या अगोदर तुम्ही प्रवासास जाण्याच्या तयारीने अंगावर कपडे घालावेत, पायात जोडे घालावेत आणि हातात काठी घ्यावी आणि मग घाईघाईने ते मांस खावे; कारण हा परमेश्वराचा वल्हांडण सण आहे.

निर्गम 19:10

परमेश्वर मोशेला म्हणाला, “आज आणि उद्या माझ्या विशेष भेटीसाठी लोकांना पवित्र कर; त्यांनी कपडे स्वच्छ धुवावेत.

निर्गम 19:14

मग मोशे पर्वतावरून खाली उतरला; तो लोकांकडे गेला व देवाच्या भेटीसाठी त्याने त्यांना पवित्र केले. लोकांनी आपले कपडे धुवून स्वच्छ केले.

गणना 9:6

परंतु काही लोकांना त्या दिवशी वल्हांडण सण पाळता येईना कारण प्रेताला शिवल्यामुळे ते अशुद्ध झाले होते. म्हणून ते त्या दिवशी मोशे व अहरोन ह्यांच्याकडे गेले.

1 शमुवेल 16:5

शमुवेल म्हणाला, “होय, मी स्नेहभावाने आलो आहे. मला परमेश्वरासाठी यज्ञ करायचा आहे. तयारीला लागा आणि माझ्याबरोबर यज्ञासाठी या.” शमुवेलने इशायला व त्याच्या मुलांना तयार केले. त्यांनाही यज्ञात आमंत्रित करुन त्यात भाग घ्यायला सांगितले.

2 इतिहास 30:17

येथे जमलेल्या पुष्कळशा लोकांनी स्वत:चे शुध्दीकरण केलेले नव्हते त्यामुळे वल्हांडणाचे यज्ञपशू मारायचा त्यांना अधिकार नव्हता. अशांसाठी ते काम लेवींनाच करावे लागत होते. लेवींनी सर्व यज्ञपशूंचे परमेश्वराकरता शुध्दीकरण केले.

एज्रा 3:1

इस्राएल लोक आपापल्या नगरात सातव्या महिन्यांत परतले, तेव्हा एकमनाने सर्व जण यरुशलेममध्ये एकत्र आले.

नहेम्या 8:1

त्या वर्षीच्या सातव्या महिन्यात सर्व इस्राएल लोक एकत्र आले. त्यांच्यामध्ये इतकी एकजूट होती की ते एकमेकांशी अगदी तद्रूप झाले होते. पाणी वेशीच्या समोरच्या मोकळया जागेत ते जमले. त्या सर्वांनी शिक्षक एज्राला मोशेच्या नियमशास्त्राचे पुस्तक बाहेर काढायला सांगितले. परमेश्वराने इस्राएल लोकांना सांगितले ते नियमशास्त्र हेच.

ईयोब 1:5

मुलांच्या भोजन समारंभानंतरच्या सकाळी ईयोब सर्वांत आधी उठून प्रत्येक मुलासाठी होमार्पणे करीत असे. तो म्हणे. “कदाचित् भोजन समारंभाच्यावेळी माझ्या मुलांनी निष्काळजीपणाने पाप केले असेल.” आपली मुलं देवाची उपासना करायला योग्य व्हावीत म्हणून ईयोब असे करीत असे.

स्तोत्रसंहिता 26:6

परमेश्वरा, मी हात स्वच्छ धुवून तुझ्या वेदीजवळ आलो आहे.

मत्तय 26:1

येशूने या सर्व बोधकथा सांगण्याचे संपविल्यानंतर तो त्याच्या शिष्यांना म्हणाला,

मार्क 14:1

वल्हांडणआणि बेखमीर भाकरीच्या सणाच्यादोन दिवस अगोदर प्रमुख याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक कपटाने त्याला धरून जिवे मारण्याचा मार्ग शोधीत होते.

योहान 2:6

त्या ठिकाणी दगडाचे सहा मोठे रांजण होते, यहूदी लोक विशेष विधीप्रसंगी धुण्यासाठीपाणि ठेवण्यासाठी हे रांजण वापरीत असत. प्रत्येक रांजणात वीस ते तीस बादल्या पाणी मावत असे.

योहान 2:13

यहूदी लोकांचा वल्हांडण सण अगदी जवळ आला होता, म्हणून येशू यरुशलेमला गेला.

योहान 5:1

नंतर एका यहुदी सणासाठी येशू यरुशलेमला गेला.

योहान 6:4

त्याच सुमारास यहूदी लाकांचा वल्हांडण सण जवळ आला होता.

योहान 7:8

तेव्ह तुम्ही सणासाठी जा. मी आत्ताच सणाला येणार नाही. माझी योग्य वेळ अजून आली नाही.”

योहान 12:1

मग येशू वल्हांडण सणाच्या अगोदर सहा दिवस असताना बेथानीस आला. येशूने ज्याला मेलेल्यातून उठविले होते तो लाजर तेथे होता.

योहान 13:1

मग वल्हांडण सणापूर्वी येशूने आपण या जगातून निघून पित्याकडे जावे असा समय आलाआहे, हे जाणून आपले स्वत:चे लोक जे जगात होते त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रीति केली.

योहान 18:28

नंतर यहूदी येशूला कयफाच्या घरातून रोमन राजवाड्याकडे घेऊन गेले. तेव्हा पहाट झाली होती. आपण विटाळले जाऊ नये व वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते राजवाड्यात गेले नाहीत.

प्रेषितांचीं कृत्यें 24:18

तेथे मी कसलाही जमाव केला नव्हता अगर दंगा ही केला नव्हता

1 करिंथकरांस 11:28

पंरतु मनुष्याने स्वत:ची परीक्षा करावी. आणि नंतर भाकर खावी किंवा द्राक्षारसाचा प्याला प्यावा.

इब्री लोकांस 9:13

कारण बकरे व बैल यांचे रक्त; तसेच कालवडीची राख त्यांच्यावर शिंपडले तर त्याची अपवित्र शरीरे शुद्ध होतात,

याकोब 4:8

देवाजवळ या, आणि तो तुमच्याजवळ येईल. पाप्यांनो, तुमचे हात स्वच्छ करा. आणि तुमची अंत:करणे शुद्ध करा, जे तुम्ही द्विबुद्धीचे आहात.

Interlinear

Choose Theme