येथे जमलेल्या पुष्कळशा लोकांनी स्वत:चे शुध्दीकरण केलेले नव्हते त्यामुळे वल्हांडणाचे यज्ञपशू मारायचा त्यांना अधिकार नव्हता. अशांसाठी ते काम लेवींनाच करावे लागत होते. लेवींनी सर्व यज्ञपशूंचे परमेश्वराकरता शुध्दीकरण केले.
Cross references
ह्या पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसापर्यंत त्या मेढ्याची किंवा बकऱ्याची निगा राखावी व त्यावर लक्ष ठेवावे. चौदाव्या दिवशी सर्व इस्राएल लोकांनी कातरवेळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर व अंधार पडण्यापूर्वी आपापल्या मेंढ्याचा किंवा बकऱ्याचा वध करावा.
ते लोक मोशेला म्हणले, “एका माणसाच्या प्रेताला आमचा स्पर्श झाला व आम्ही अशुद्ध झालो. त्यामुळे ठरलेल्या वेळी परमेश्वराला अर्पणे करण्यास याजकांनी आम्हाला बंदी केली. तेव्हा इतर इस्राएल लोकाबरोबर आम्हाला अर्पणे करिता येत नाहीत!”
होमबलीसाठी आणलेल्या एवढ्या पशूंची कातडी काढणे, कापणे हे तेवढ्या याजकांच्या आवाक्याबाहेरचे होते. तेव्हा त्यांच्या बांधवांनी लेवींनी त्यांना या कामात मदत केली आणि इतर याजक पुढच्या सेवेसाठी पवित्र होण्याच्या तयारीला लागले. या पवित्र होण्याच्या बाबतीत याजकांपेक्षा लेवी अधिक काटेकोर होते.
राएल लोकांना शिक्षण देणाऱ्या आणि परमेश्वराच्या सेवेसाठी शुचिर्भूत होणाऱ्या लेव्यांना योशीया म्हणाला, “दावीद पुत्र शलमोनाने बांधलेल्या या मंदिरात पवित्र करारकोश ठेवा. दावीद इस्राएलचा राजा होता. यापुढे पवित्र करारकोश वारंवार खांद्यावरुन वाहू नका. परमेश्वर देवाची सेवा करा. देवाची प्रजा म्हणजे इस्राएलचे लोक त्यांची सेवा करा.
माझ्या पवित्र जागेची सेवा करण्यासाठी लेवींची निवड केली गेली होती. ते मंदिराच्या प्रवेशद्वारांचे रक्षण करीत, मंदिरात सेवा करीत. बळी देण्यासाठी लोकांनी आणलेल्या प्राण्यांचा ते बळी देत व लोकांसाठी होमार्पणे करीत. लोकांना मदत करण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी त्यांची निवड केली गेली होती.