त्याच्या राज्यात सामर्थ्य आणि शांती नांदेल. आणि दाविदच्या वंशाच्या ह्या राजाच्या काळात ती वाढतच जाईल. हा राजा सदासर्वकाळ सदाचार आणि प्रामाणिक न्यायबुध्दीने राज्य करील.सर्वशक्तिमान परमेश्वराला त्याच्या लोकांबद्दल अतिशय प्रेम आहे. ह्या प्रेमापोटीच ह्या सर्व गोष्टी घडून येतील.
Cross references
राजसत्ता तुझ्याच वंशात चालू राहील याचा विश्वास बाळग. तुझे राज्य अबाधित राहील. तुझे सिंहासन टिकून राहील.”
कारण काही जण बचावतील. ते यरुशलेममधून बाहेर पडतील. सीयोन डोंगरातून काहीजण येतील. परमेश्वराच्या तीव्र आवेशामुळे असे घडेल.
जर तू विचारले तर मी तुला राष्ट्रे देईन या पृथ्वीवरची सगळी माणसे तुझी होतील.
तू खूप अद्भूत दिसतोस जा आणि चांगल्यासाठी व न्यायासाठी होत असलेली लढाई जिंकून ये. तुझा बलवान उजवा हात विस्मयजनक गोष्टी करण्यासाठी वापर.
देवा, तू राजाला तुझ्यासारखे योग्य निर्णय घेण्यासाठी मदत कर. आणि राजाच्या मुलाला तुझ्या चांगुलपणा विषयी शिकायला मदत कर.
तो जो पर्यंत राजा आहे तो पर्यंत चांगुलपणा उमलू दे. जो पर्यंत चंद्र आहे तो पर्यंत शांती नांदू दे.
माझ्या पवित्रतेतून मी त्याला वचन दिले आहे आणि मी दावीदशी खोटे बोलणार नाही.
परमेश्वराचे भय वाटण्यातच त्या मुलाला आनंद वाटेल. तो त्याच्या डोळ्यांना जे दिसते वा कानांनी जे ऐकू येते, त्याच्यावरून निर्णय घेणार नाही.हा मुलगा गोष्टी जशा दिसतात त्या वरून लोकांची पारख करणार नाही. तो जे ऐकेल त्यावरून लोकांची परीक्षा करणार नाही.
नंतर नवा राजा गादीवर बसेल. तो दाविदाच्या वंशातला असेल. तो सत्यप्रिय, प्रेमळ व दयाळू असेल. तो खरेपणाने न्याय देईल. तो योग्य व बरोबर अशाच गोष्टी करील.
मी सांगतो ते ऐका सगळीकडे चांगुलपणा नांदावा अशा तऱ्हेने राजाने राज्य करावे. नेत्यांनी लोकांना मार्गदर्शन करताना न्याय निर्णय घ्यावेत.
जिवंत राहिलेले थोडे लोक यरूशलेममधून येतील सियोनच्या डोंगरावरून वाचलेले येतील.” सर्वशक्तिमान परमेश्वराच्या तीव्र प्रेमामुळे हे होईल.
तो सभ्य असेल तो पिचलेला बांबूसुध्दा मोडणार नाही. मिणमिणणारी वातसुध्दा तो विझविणार नाही. तो प्रामाणिकपणाने न्याय देईल आणि सत्य शोधून काढेल.
परमेश्वराने पाहिले पण त्याला कोणीही ठामपणे उभा राहून लोकांना मदत करताना दिसला नाही. म्हणून परमेश्वराने स्वत:चे सामर्थ्य आणि चांगुलपणा वापरला आणि लोकांना वाचविले.
मी लोकांना शिक्षा करण्यासाठी वेळ निश्चित केली. आता लोकांना वाचविण्याची आणि त्यांना संरक्षण देण्याची वेळ माझ्यावर आली आहे.
हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी चांगला अंकुर निर्माण करण्याची वेळ येत आहे.” तो चांगला अंकुर सुज्ञपणे राज्य करणारा राजा असेल. देशात योग्य व न्याय्य गोष्टी तो करेल.
त्यावेळी दावीदाच्या वंशवृक्षाची एक चांगली शाखा मी वाढवीन ती ‘शाखा’ देशासाठी चांगल्या आणि योग्य गोष्टी करील.
“इस्राएलच्या लोकांनी माझे पवित्र नाव बदनाम केले. त्याबद्दल मला खेद वाटला.
त्यानंतर एकदमचलोखंड माती, काशे, चांदी, सोने ह्यांचा चुरा झाला तो चुरा उन्हाळ्यातील खळ्यातील फोलकटाप्रमाणे वाऱ्याने दूरवर उडवला गेला. मागे काहीच उरले नाही. तेथे पुतळा होता हे कोणलाही खरे वाटले नसते. मग पुतव्व्यावर आदळणाऱ्या दगडाचा मोठा पर्वत झाला व त्याने सर्व पृथ्वी व्यापली.
चौथ्या राजाच्या कारकिर्दीत, स्वर्गातला देव आणखी एक राज्य निर्माण करील. ते कायमचे राहील. त्याचा कधीही नाश होणार नाही. ते दुसऱ्या घराण्याकडे सोपविता येणार नाही. हे राज्य इतर राज्यांना चिरडून टाकील, त्यांचा शेवट करील पण ते राज्य सदासर्वकाळ टिकून राहील.
“मग त्या मनुष्यप्राण्याप्रमाणे दिसणाऱ्याला अधिकार, वैभव व संपूर्ण सत्ता देण्यात आली सर्व लोक राष्ट्रे व निरनिराळे भाषा बोलणारे सर्व त्याची सेवा करणार होते. त्याची सत्ता चिरंतन होती. त्याचे राज्य कायमचे होते. त्याचा कधीही नाश होणार नव्हता.
मग देवाचे खास लोक राज्य करतील. ते पृथ्वीवरच्या सर्व राज्यांतील सर्व लोकांवर राज्य करतील. हे राज्य कायम राहील. व इतर राज्यातील लोक त्याला मान देतील, त्याची सेवा करतील.”
तो महान होईल व त्याला सर्वोच्य देवाचा पुत्र म्हणतील. आणि प्रभु देव त्याला त्याचा पिता दावीद याचे सिंहासन देईल.
मग शेवट येईल प्रत्येक अधिपती, प्रत्येक सत्ता, व प्रत्येक सामर्थ्य जेव्हा ख्रिस्त नाहीसे करील, तेव्हा ख्रिस्त देवपित्याला राज्य देईल.
पण पुत्राविषयी तो असे म्हणतो,“तुझे सिंहासन, हे देवा, तुझे सिंहासन सदासर्वकाळासाठी आहे, आणि तुझे राज्य न्यायाचे असेल.
नंतर माझ्यासमोर स्वर्ग उघडलेला मी पाहिला; आणि माझ्यासमोर एक पांढरा घोडा होता. त्या घोड्यावर बसलेल्याचे‘नाव विश्वासू आणि खरा’ असे होते; कारण तो न्यायाने निवाडा करतो आणि न्यायाने लढाई करतो.