Home Bibles ईयोब 5:4 · मराठी बायबल
ईयोब 5:4 · मराठी बायबल

त्याच्या मुलांना कुणीही मदत करु शकले नाही. कोर्टात त्यांच्या बाजूने लढायला कुणीही नव्हते.

Cross references

निर्गम 20:5

त्यांची उपासना करू नको; किंवा त्यांची सेवा करु नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव आहे;मी ईर्ष्यावान देव आहे, जे माझ्याविरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात; मी त्यांना शिक्षा करीन; मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो;

ईयोब 1:19

तेव्हा वाळवंटातून सोसाट्याचा वारा आला आणि त्याने तुझे घर पडले. घर तुझ्या मुलामुलींवर पडल्यामुळे ते मेले. केवळ मीच त्यातून बचावलो व तुला सांगायला इथे आलो.”

ईयोब 4:10

वाईट लोक सिंहासारखी गर्जना करतात आणि गुरगुर करतात. परंतु देव त्यांना मुके करतो आणि त्यांचे दात पाडतो.

ईयोब 8:4

तुझ्या मुलांनी देवाविरुध्द काही पाप केले असेल म्हणून त्यांना देवाने शिक्षा केली.

ईयोब 10:7

मी निष्पाप आहे हे तुला माहित आहे. परंतु तुझ्या हातातून मला कुणीही वाचवू शकणार नाही.

ईयोब 18:16

त्याची खालची मुळे सुकून जातील आणि वरच्या फांद्या मरतील.

ईयोब 27:14

दुष्ट माणसाला खूप मुले असतील परंतु त्याची मुले लढाईत मरतील. दुष्ट माणसाच्या मुलांना पुरेसे खायला मिळणार नाही.

स्तोत्रसंहिता 7:2

तू जर मला मदत केली नाहीस तर सिंहाच्या तावडीत सापडलेल्या एखाद्या प्राण्यासारखी माझी अवस्था होईल मला दूर नेले जाईल आणि कुणीही मला वाचवू शकणार नाही.

स्तोत्रसंहिता 109:9

माझ्या शत्रूच्या मुलांना अनाथ आणि त्याच्या बायकोला विधवा कर.

स्तोत्रसंहिता 109:10

त्यांना त्यांचे घर गमावू दे आणि त्यांना भिकारी होऊ दे.

स्तोत्रसंहिता 119:155

दुष्ट लोक जिंकणार नाहीत कारण ते तुझे नियम पाळत नाहीत.

स्तोत्रसंहिता 127:5

जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल. [6] त्या माणसाचा कधीही पराभव होणार नाही त्याची मुले सार्वजानिक ठिकाणीत्याच्या शत्रूंविरुध्द त्याचे रक्षण करतील.

आमोस 5:12

का? कारण मला तुमच्या पुष्कळ पापांची माहिती आहे. तुम्ही खरोखरच काही वाईट कृत्ये केली आहेत. योग्य आचरण करणाऱ्यांना पैसा घेता. न्यायालयात गरिबांवर अन्याय करता.

लूक 13:4

किंवा त्या अठरा जणांचे काय? ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व ते मारले गेले? तुम्हांला वाटते का की, यरुशलेम येथे राहणाऱ्या सर्व लोकांपेक्षा ते अधिक दोषी होते?

Interlinear

Choose Theme