Cross references
अगदी वैभवात असेल असे ज्याबद्दल वाटले असा एक मूर्ख मला दिसला पण अचानक त्याचा घात झाला.
तिची मुळे खडकांभोवती आवळली जातात आणि खडकांवरही उगवण्याचा प्रयत्न करतात.
दुष्ट माणसाची काळोखापासून सुटका नसते. तो त्या झाडासारखा असतो ज्याची पाने रोगामुळे मरतात आणि वारा त्यांना दूर उडवून नेतो.
मी खूप पाणी शोषून घेऊ शकणारी मुळे असलेल्या व ज्याच्या फांद्या दवाने ओल्या झालेल्या आहेत अशा झाडासारखा असेन, असे मला वाटत असे.
अशा लोकांचे वाईट होईल. ज्याप्रमाणे आगीमध्ये पाने आणि गवत जळून भस्मसात होते त्याप्रमाणे त्यांच्या वंशजांचा पूर्णपणे नाश होईल. अंकुर मरून धुळीला मिळावा अथवा आगीत फूल जळून त्याची राख वाऱ्यावर कोठल्या कोठे उडून जावी तसाच त्यांच्या वंशजांचा समूळ नाश होईल.त्या लोकांनी, सर्वशक्तिमान परमेश्वराची आज्ञा मानण्यास, नकार दिला. इस्राएलच्या पवित्र देवाच्या संदेशाचा त्यांनी तिरस्कार केला.
एफ्राईमला शिक्षा होईल. त्यांचे मूल मरत आहे. ते नि:संतान होतील. ते बालकांना कदाचित् जन्म देतील, पण त्यांच्या पोटी जन्मलेल्या अमूल्य बालकांना मी ठार मारीन.
“पण प्रत्यक्ष त्यांच्यासमोर अमोरींना मारणारा मीच होतो. अमोरी गंधसंरूप्रमाणे उंच होते. ते अल्लोन वृक्षांप्रमाणे बळकट होते. परंतु मी त्यांच्या वरील फळांचा व खालील मुळांचा विध्वंस केला.
“ती न्यायनिवाड्याची वेळ येत आहे. ती तापलेल्या भट्टीसारखी असेल. सर्व गर्विष्ठांना आणि प्रत्येक दुष्ट माणसाला शिक्षा होईल. सर्व पापी गवताच्या काडीप्रमाणे जळून जातील. त्या वेळी, ते जळणाऱ्या झुडुपाप्रमाणे असतील एकही फांदी वा मूळ शिल्लक ठेवले जाणार नाही.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.