त्याचे धनुर्धारी मला घेरतात. तो माझ्या मुत्रपिंडात बाण सोडतो. तो दया दाखवीत नाही. तो माझे मूत्राशय धरतीवर रिकामे करतो.
Cross references
पुष्कळ लोक त्याच्या विरुद्ध झाले व त्याच्याशी लढले; धनुर्धारी लोकांनी त्याचा द्धेष केला;
परमेश्वर अशा माणसाला क्षमा करणार नाही. परमेश्वराचा त्याच्यावर कोप होईल. इतर सर्व इस्राएलापासून अलग करुन परमेश्वर त्याची नावनिशाणी पुसून टाकील. या ग्रंथातील सर्व शापांचा प्रत्यय त्या माणसाला स्वत:च्या बाबतीत येईल. या नियमशास्त्राच्या ग्रंथातील कराराचा हा एक भाग आहे.
त्या सर्वशक्तीमान देवाचे बाण माझ्यात आहेत. माझ्या आत्म्याला त्या बाणांच्या विषाची जाणीव होते. देवाची भयानक शस्त्रे माझ्या विरुध्द सज्ज आहेत.
आणि जेव्हा तो मला मारेल तेव्हा मला एका गोष्टीचे समाधान मिळेल, एका गोष्टीबद्दल मी आनंदी असेन, या सगळ्या दु:खातही मी पवित्र परमेश्वराच्या आज्ञेचा कधीही भंग केला नाही.
मी देवाला माझ्या डोळ्यांनी बघेन. अन्य कुणी नाही, तर मी स्वत:च त्याला पाहीन. आणि त्यामुळे मी किती हुरळून गेलो आहे ते मी सांगू शकत नाही.
पितळी बाण त्याच्या शरीरातून आरपार जाईल. त्याचे चकाकणारे टोक त्याचे आतडे भेदील आणि तो भयभीत होईल.
देवाने एकदा निर्णय घेतल्यानंतर तो त्याचे मन बदलत नाही.
रडून रडून माझे डोळे थकले आहेत. माझे अंत:करण अस्वस्थ झाले आहे. माझे हृदय जमिनीवर टाकल्याप्रमाणे तळमळत आहे. कारण माझ्या लोकांचा नाश झाला आहे. मुले आणि तान्ही मूर्छित पडत आहेत. सार्वजनिक चौकांत ती मूर्छित पडत आहेत.
त्याने माझ्या पोटात बाणाने मारले.
परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “यरुशलेम, मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो की मी तुला शिक्षा करीन. मी तुला शिक्षा करीन असे वचन देतो. का? कारण माझ्या पवित्र स्थानावर तुम्ही भयंकर गोष्टी केल्या. त्यामुळे ते स्थान अपवित्र झाले. मी तुम्हाला शिक्षा करीन. अजिबात दया दाखविणार नाही. मला तुझ्याबद्दल वाईट वाटणार नाही.
ज्याने आपल्या पुत्राला राखून ठेवले नाही, परंतु आपणा सर्वांसाठी मरण्यासाठी दिले तो आपणांला पुत्रासह सर्व काही देणार नाही काय?
देवाने प्राचीन काळातील जगाचीसुद्धा गय केली नाही; तेव्हा त्याने नोहाचे, ज्याने लोकांना योग्य रीतीनेराहण्यासाठी उपदेश केला व त्याच्याबरोबर इतर सात लोकांचे संरक्षण केले आणि अधार्मिक लोकांनी भरलेल्या या जगावरपाण्याचा महापूर आणाला.