आणि जेव्हा तो मला मारेल तेव्हा मला एका गोष्टीचे समाधान मिळेल, एका गोष्टीबद्दल मी आनंदी असेन, या सगळ्या दु:खातही मी पवित्र परमेश्वराच्या आज्ञेचा कधीही भंग केला नाही.
Cross references
“सर्व इस्राएल लोकांना सांग की मी तुमचा देव परमेश्वर आहे! मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र असलेच पाहिजे.
परमेश्वर अशा माणसाला क्षमा करणार नाही. परमेश्वराचा त्याच्यावर कोप होईल. इतर सर्व इस्राएलापासून अलग करुन परमेश्वर त्याची नावनिशाणी पुसून टाकील. या ग्रंथातील सर्व शापांचा प्रत्यय त्या माणसाला स्वत:च्या बाबतीत येईल. या नियमशास्त्राच्या ग्रंथातील कराराचा हा एक भाग आहे.
परमेश्वरासारखा पवित्र कोणी देव नाही. देवा, तुझ्यावाचून कोणी नाही. आमच्या देवासारखा अभेद्य दुर्ग दुसरा नाही.
ते लोक थडगे दिसल्यावर अधिक सुखी होतील. आपली कबर मिळाली की आनंदी होतील.
देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाशी युध्द करु शकणारा माणूस जखमी झाल्याशिवाय कसा राहील?
म्हणून दरीतली माती देखील दुष्ट माणसाठी सुखावह असेल. व त्याच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सामील होतील.
त्यांच्या वचनांचा स्विकार कर. तो काय म्हणतो त्याकडे नीट लक्ष दे.
मी त्याच्या आज्ञेचे पालन केले. मी माझ्या अन्नापेक्षा देवाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांवर अधिक प्रेम करतो.
चांगला माणूस चांगला उपदेश करतो आणि त्याचे निर्णय सर्वासाठी योग्य असतात.
मी विजयाची चांगली बातमी मोठ्यासभेत सांगितली. मी माझे तोंड बंद ठेवले नाही. परमेश्वरा, तुला ते माहीत आहे.
देवा, तू मला मी लहान मुलगा होतो तेव्हापासून शिकवीत आहेस आणि आजच्या दिवसापर्यंत मी लोकांना तू करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगितले.
मी तुझ्या सगळ्या शहाणपणाच्या निर्णयांबद्दल बोलेन.
खऱ्या घडणाऱ्या गोष्टी बघायचे टाळा. आमच्या रस्त्यातून दूर व्हा. इस्राएलच्या पवित्र देवाबद्दल आमच्याशी बोलू नका.”
देव अती उच्च व परम थोर आहे. देव चिरंजीव आहे. त्याचे नाव पवित्र आहे. देव म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो हे खरे पण मी दु:खी आणि लीन यांच्याबरोबरही असतो. मनाने नम्र असलेल्यांना आणि दु:खी लोकांना मी नवजीवन देईन.
मी, माझ्या भयंकर क्रोधाचा, विजय होऊ देणार नाही. मी पुन्हा एफ्राईमचा नाश करणार नाही. मी मानव नसून परमेश्वर आहे. मी तुमच्यामधला एकमेव पवित्र आहे मी तुमच्याबरोबर आहे. मी माझा क्रोध प्रकट करणार नाही.
त्यानंतर हबक्कूक म्हणाला, “परमेश्वरा, तू सनातन परमेश्वर आहेस तू माझा कधीही न मरणारा पवित्र, देव आहेस परमेश्वरा, जे केलेच पाहिजे, ते करण्यासाठीच तू खास्द्यांना निर्मिले आहेस आमच्या खडका, यहूद्यांच्या लोकांना शिक्षा करण्यासाठी तू त्यांना निर्मिले आहेस.
तेमानहून देव येत आहे. पारान पर्वतावरुन पवित्र परमेश्वर येत आहे. परमेश्वराच्या तेजाने स्वर्ग व्यापला जातो आणि स्तुतीने पृथ्वी व्यापली जाते.
जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हांला सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हांना माहीत आहे. आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही.
देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रगट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही.
ज्याने आपल्या पुत्राला राखून ठेवले नाही, परंतु आपणा सर्वांसाठी मरण्यासाठी दिले तो आपणांला पुत्रासह सर्व काही देणार नाही काय?
कराण देवाने, ज्या देवदूतांनी पाप केले त्यांनादेखील सोडले नाही, तर न्यायाचा दिवस येईपर्यंत त्यांना अधोलोकाच्या गडदअंधारात टाकले.
“फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही:“जो पवित्र, सत्य, जो दाविदाची किल्ली ठेवतो त्याचे हे शब्द आहेत, जे तो उघडतो, ते कोणी बंद करु शकणार नाहीआणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.
त्या प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते. व त्यांना सगळीकडे डोळे होते. त्यांच्या पंखाखालीसुद्धा डोळे होते.दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होते:“पवित्र, पवित्र, पवित्र, हा प्रभु देव सर्वसमर्थ जो होता, जो आहे, आणि जो येणार आहे.”