Home Bibles ईयोब 13:18 · मराठी बायबल
ईयोब 13:18 · मराठी बायबल

मी आता माझ्या बचावाला सिध्द झालो आहे. मी माझे मुद्दे काळजीपूर्वक मांडीन. मला माहीत आहे की मी बरोबर आहे हे मी दाखवून देईन.

Cross references

ईयोब 9:2

“तू जे काही म्हणत आहेस ते खरे असल्याची जाणीव मला आहे, परंतु देवापुढे माणूस कसा बरोबर ठरेल?

ईयोब 9:20

मी निष्पाप असलो तरी, माझे बोलणेच मला अपराधी बनवते. मी निष्पाप आहे, पण मी बोलल्यावर माझे तोंडच मला अपराधी शाबीत करते.

ईयोब 16:21

जशी एखादी व्यक्ति आपंल्या मित्रासाठी वादविवाद करते तसा तो माझ्याविषयी देवाबरोबर बोलतो.

ईयोब 23:4

मी देवाला माझी कथा सांगितली असती. माझा निरपराधीपणा सिध्द करण्यासाठी मी सतत वाद घातला असता.

ईयोब 33:9

तू म्हणालास, ‘मी शुध्द आहे, मी निरपराध आहे, मी काहीही चूक केली नाही. मी अपराधी नाही.

ईयोब 40:7

“ईयोब, तू आता कंबर कसूनउभा राहा आणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला सिध्द हो.

यशया 43:26

पण तू मात्र माझी आठवण ठेवावीस आपण एकत्र येऊन योग्य काय ते ठरवावे. तू केलेल्या गोष्टी तू सांगाव्यास आणि त्या योग्य आहेत हे दाखवावे.

रोमकरांस 8:33

देवाच्या निवडलेल्या लोकांवर आरोप कोण ठेवील? देव हाच एक त्यांना निरपराध ठरवितो.

2 करिंथकरांस 1:12

कारण आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण, म्हणजे आमच्या सद्सद्विवेकबुद्धीची साक्ष होय. ती अशी की आम्ही मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामणिकपणे जगात व विशेषकरुन तुमच्याजवळ वागलो.

Interlinear

Choose Theme