चांदी शुद्ध करणाऱ्या कारागिराप्रमाणे ते आहेत. फुंकणीने जोरात फुंकताच विस्तवाचा जाळ झाला आणि त्यातून शिसे बाहेर आले.चांदी शुध्द करण्याच्या प्रयत्नात त्या कारागिराने आपला वेळ वाया घालविला. त्याचप्रमाणे माझ्या लोकांमधून दुष्टपणा काढला गेला नाही.
Cross references
सोने आणि चांदी शुध्द करण्यासाठी आगीत टाकतात. लोकांची मने मात्र परमेश्वर शुध्द करतो.
मी म्हणालो, “मी निरर्थक मेहनत केली. स्वत: झिजून झिजून निरूपयोगी झालो पण काहीही उपयोगी पडणारे केले नाही. मी माझी सर्व शक्ती खर्च केली पण माझ्याहातून काहीच झाले नाही. तेव्हा आता काय करायचे. ते परमेश्वरानेच ठरविले पाहिजे. देवानेच मला काय फळ द्यायचे ते निश्चित केले पाहिजे.
म्हणून, सर्वशाक्तिमान परमेश्वर म्हणतो: “धातू शुद्ध आहे की नाही हे बघण्यासाठी कामगार तो तापवितो.” त्याप्रमाणे मी यहूदाच्या लोकांची परीक्षा घेईन. मला दुसरा पर्याय नाही. माझ्या लोकांनी पाप केले.
“कदाचित् यरुशलेमने तिच्यावरील डाग घासून काढण्यासाठी खूप मेहनत घेतली असेल. पण तो ‘गंज’ निघणार नाही. फक्त आगच (शिक्षा) तो काढील.
“तुम्ही माझ्याविरुध्द वागून पाप केले आणि पापांनी डागाळलात. तुम्हाला धुवुन स्वच्छ करण्याची माझी इच्छा होती. पण डाग निघाले नाही. माझा क्रोधाग्नी तुझ्याबाबतीत शांत होईपर्यंत मी तुला स्वच्छ करण्याचा पुन्हा प्रयत्न करणार नाही.
“मी परत यावे अशी माझ्या लोकांची अपेक्षा आहे. वरच्या परमेश्वराला ते बोलवतील पण देव त्यांना मदत करणार नाही.”
मग वाचलेल्यांची मी परीक्षा घेईन. मी त्यांना खूप त्रास देईल. चांदीची शुध्दता सिध्द करण्यासठी तिला आगीत टाकले जाते. त्या आगीप्रमाणे संकटे येतील. सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन. मग ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन. मी म्हणेण, ‘तुम्ही माझे लोक आहात.’ आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर आमचा देव आहे.”‘
“त्यावेळेची तयारी कोणीही करु शकत नाही. तो येताच, कोणीही त्याच्यासमोर उभा राहू शकणार नाही. तो धगधगत्या अग्नीसारखा असेल. वस्तू अगदी स्वच्छ व्हाव्या म्हणून वापरण्यात येणाऱ्या तीव्र साबणासारखा असेल.
नाशवंत सोने शुध्द करण्याकरिता अग्नित टाकले जाते. त्याहून अधिक मौल्यवान अशा तुमच्या विश्वासाची कसोटी व्हावी, आणि येशू ख्रिस्ताच्या परत येण्याच्या वेळी तो खरा ठरावा आणि तुम्हाला स्तुति, गौरव व सन्मान मिळावा याची आवश्यकता आहे.
प्रिय मित्रांनो, तुमच्यावर मोठे संकट येऊन तुमची कसोटी होते तेव्हा नवल वाटून घेऊ नका.