Home Bibles यशया 49:4 · मराठी बायबल
यशया 49:4 · मराठी बायबल

मी म्हणालो, “मी निरर्थक मेहनत केली. स्वत: झिजून झिजून निरूपयोगी झालो पण काहीही उपयोगी पडणारे केले नाही. मी माझी सर्व शक्ती खर्च केली पण माझ्याहातून काहीच झाले नाही. तेव्हा आता काय करायचे. ते परमेश्वरानेच ठरविले पाहिजे. देवानेच मला काय फळ द्यायचे ते निश्चित केले पाहिजे.

Cross references

लेवीय 26:20

तुम्ही खूप कष्ट कराल पण त्याचा काही उपयोग होणार नाही; कारण तुमची जमीन पीकदेणार नाही व तुमची झाडे फळे देणार नाहीत.

1 राजे 19:10

एलीया म्हणाला, “सर्व शक्तिमान परमेश्वर देवा, मी आतापर्यंत तुझीच सेवा करत आलेलो आहे. माझ्याकडून होईल तितके मी केले पण इस्राएलच्या लोकांनी तुझ्याशी केलेल्या कराराचा भंग केलेला आहे. त्यांनी तुझ्या वेदीचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना मारले. मीच एकटा काय तो अजून जिवंत आहे. पण आता ते माझ्याही जिवावर उठले आहेत.”

स्तोत्रसंहिता 22:22

परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझ्याबद्दल सांगेन. सभेत मी तुझे गुणगान गाईन.

यशया 35:4

लोक घाबरले व गोंधळले आहेत. त्यांना सांगा, “सामर्थ्यवान व्हा. भीऊ नका.” तुमचा देव येऊन तुमच्या शत्रूला शिक्षा करील. तो येईल आणि तुमच्या वर कृपा करील. परमेश्वर तुमचे रक्षण करील.

यशया 40:10

परमेश्वर, माझा प्रभू सर्व सामर्थ्यानिशी येत आहे लोकांवर अधिकार चालविण्यासाठी तो त्याचे सामर्थ्य वापरील तो आपल्या लोकांसाठी बक्षिस आणील. तो त्यांचा मोबदला चुकता करील.

यशया 53:10

परमेश्वराने त्याला चिरडून टाकण्याचे ठरविले आणि परमेश्वराने दु:ख भोगलेच पाहिजे असे निश्चित केले. म्हणून सेवक स्वत:चा बळी देण्यास तयार झाला. पण त्याला नवे जीवन मिळेल आणि तो खूप खूप जगेल. तो त्याच्या लोकांना पाहील. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, सेवकाने करायच्या, सर्व गोष्टी तो पूर्ण करील.

यशया 53:12

ह्यामुळेच मी त्याला सर्व लोकांत श्रेष्ठ बनवीन. बलवान माणसांबरोबर त्याला प्रत्येक गोष्टीत वाटा मिळेल. मी त्याच्यासाठी हे सर्व करीन कारण तो लोकांसाठी जगला आणि मेला. लोकांनी त्याला गुन्हेगार म्हटले. पण त्याने पुष्कळ लोकांच्या पापांचे ओझे स्वत: वाहिले. आणि तो पापी लोकांकरीता बोलतो आहे.”

यशया 62:11

ऐका! परमेश्वर दूरवरच्या देशांशी बोलत आहे “सियोनच्या लोकांना सांगा, पाहा! तुमचा तारणारा येत आहे. त्याचे बक्षिस त्याच्याजवळ आहे. त्याचे कर्म त्याच्या समोर आहे.”

यशया 65:2

“माझ्या विरूध्द गेलेल्या लोकांना स्वीकारायच्या तयारीत मी उभा राहिलो. ते माझ्याकडे येतील म्हणून मी त्यांची वाट पाहत होतो. पण ते त्यांच्या वाईट मार्गाप्रमाणेच जगत राहिले. त्यांच्या मनांत आले ते त्यांनी केले.

यशया 65:23

स्त्रियांना बाळंतपणाचा त्रास कधीच होणार नाही. बाळंतपणात काय होईल ह्याची त्यांना भिती वाटणार नाही. परमेश्वर माझ्या सर्व लोकांना व त्यांच्या मुलांना आशीर्वाद देईल.

यहेज्केल 3:19

“कदाचित् असेही होईल की तू एखाद्याला सावध करशील, त्याला त्याचा मार्ग बदलायला सांगशील, दुष्कृत्ये न करण्याचे आवाहन करशील. पण त्याने तुझे ऐकले नाही, तर तो मरेल. तो त्याच्या पापामुळे मृत्यू पावेल, पण तू त्याला सावध केले होतेस, म्हणून तुझा स्वत;चा जीव वाचेल.

मत्तय 17:17

येशूने उत्तर दिले, “अहो अविश्वासूव विपरीत पिढीच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आणखी कोठवर राहू? मी तुमचे किती सहन करू? त्याला माझ्याकडे आणा.”

मत्तय 23:37

अगे, यरूशलेमे, यरूशलेमे, तू संदेष्ट्यांना जिवे मारतेस. देवाने तुझ्याकडे पाठविलेल्या लोकांना दगडमार करतेस. कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसे तुझ्यातील लोकांना एकवटण्याचा पुष्कळ वेळा मी प्रयत्न केला पण तू मला तसे करू दिले नाहीस.

लूक 24:26

ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?”

योहान 1:11

तो जगात आला, जे त्याचे स्वत:चे होते त्या लोकांकडे आला, परंतु त्याच्या स्वत:च्याच लोकांनी त्याला आपले मानले नाही.

योहान 17:4

तू मला जे काम करायला दिले ते संपवून मी पृथ्वीवर तुला गौरविले.

रोमकरांस 10:21

परंतु देव इस्राएल लोकांविषयी म्हणतो, “ज्या लोकानी माझी आज्ञा मोडली, आणि मला विरोध केला त्यांच्याकडे सर्व दिवसभर मी आपले हात पसरले आहेत.”

2 करिंथकरांस 2:15

कारण आम्ही, जे तारले जात आहोत व जे नाश पावत आहेत ते देवाला वाहिलेला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत.

2 करिंथकरांस 12:15

म्हणून मी फार आनंदाने माइयाकडे जे काही आहे, ते तुमच्यासाठी खर्च करीन आणि स्वत:देखील खर्ची पडेन. जर मी तुमच्यावर अधिक प्रेम करतो तर तुम्ही माझ्यावर कमी प्रेम कराल?

गलतीकरांस 4:11

मला तुमच्याविषयी भीती वाटते मला वाईट वाटते की, मी तुमच्यासाठी केलेले श्रम व्यर्थ आहेत.

फिलिप्पैकरांस 2:9

म्हणून देवाने सुद्धा त्याला अत्युच्च केले, व सर्व नावाहून जे नाव श्रष्ठ आहे ते त्याला दिले.

इब्री लोकांस 12:2

जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केंद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या सिंहासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.

Interlinear

Choose Theme