Home Bibles नीतिसूत्रे 17:3 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 17:3 · मराठी बायबल

सोने आणि चांदी शुध्द करण्यासाठी आगीत टाकतात. लोकांची मने मात्र परमेश्वर शुध्द करतो.

Cross references

अनुवाद 8:2

तसेच गेली चाळीस वर्षे आपल्या परमेश्वर देवाने तुम्हाला रानावनातून कसे चालवले, त्या प्रवासाची आठवण ठेवा. परमेश्वर तुमची परीक्षा पाहात होता. तुम्हाला नम्र करावे, तुमच्या अंत:करणातील गोष्टी जाणून घ्याव्या, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता की नाही ते बघावे म्हणून त्याने हे केले.

अनुवाद 8:16

तुमच्या पूर्वजांनी कधीही न पाहिलेला मान्ना तुम्हाला खायला घालून पोषण केले. परमेश्वराने तुमची परीक्षा पाहिली. शेवटी तुमचे भले व्हावे म्हणून परमेश्वराने तुम्हांला नम्र केले.

1 इतिहास 29:17

हे देवा, लोकांची तू पारख करतोस आणि त्यांच्या भलेपणाने तुला आनंद होतो हे मी जाणतो. मी शुध्द आणि प्रामणिक मनाने हे सगळे तुला सानंद अर्पण करत आहे. हे सगळे तुझे लोक इथे हजर आहेत आणि या सर्व वस्तू ते खुशीने तुला देत आहेत; हे मी पाहतो आहे.

ईयोब 23:10

परंतु देवाला मी माहीत आहे. तो माझी परीक्षा घेत आहे. आणि मी सोन्यासारखा शुध्द असेन याकडे तो लक्ष पुरवेल.

ईयोब 28:1

“लोकांना जेथून चांदी मिळते अशा खाणी असतात आणि लोक जेथे सोने वितळवतात आणि ते शुध्द करतात अशा जागा असतात.

स्तोत्रसंहिता 26:2

परमेश्वरा, माझी चौकशी कर माझी परीक्षा घे. माझ्या ह्दयात आणि मनात अगदी जवळून पाहा.

स्तोत्रसंहिता 66:10

लोक चांदीची अग्रि परीक्षा करतात तशी देवाने आमची परीक्षा पाहिली.

नीतिसूत्रे 16:2

माणसाला तो जे करतो ते बरोबर आहे असे वाटते. पण माणसाने केलेल्या गोष्टी मागच्या खऱ्या कारणांचा न्यायनिवाडा परमेश्वरच करतो.

नीतिसूत्रे 21:2

माणूस जे जे करतो ते सर्व बरोबर आहे असे त्याला वाटते. पण लोक काही गोष्टी करतात या मागची खरी कारणे योग्य की अयोग्य ते परमेश्वरच ठरवतो.

नीतिसूत्रे 27:21

सोने आणि चांदी शुध्द करण्यासाठी लोक अग्नीचा वापर करतात. त्याच रीतीने माणसाची परीक्षा लोक त्याची स्तुती करतात त्यावरुन होते.

यशया 48:10

“पाहा! मी तुम्हांला शुध्द करीन. लोक चांदी शुध्द करण्यासाठी गरम भट्टीचा उपयोग करतात. मी तुम्हांला संकटात टाकून शुध्द करीन.

यिर्मया 17:10

पण मी प्रत्यक्ष परमेश्वर असल्याने, मी माणसाच्या मनात डोकावू शकतो मी माणसाच्या मनाची परीक्षा घेऊ शकतो. प्रत्येकाला काय हवे ते मी ठरवू शकतो प्रत्येकाला त्याच्या कर्माचे योग्य फळ मी देऊ शकतो.

जखऱ्या 13:9

मग वाचलेल्यांची मी परीक्षा घेईन. मी त्यांना खूप त्रास देईल. चांदीची शुध्दता सिध्द करण्यासठी तिला आगीत टाकले जाते. त्या आगीप्रमाणे संकटे येतील. सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन. मग ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन. मी म्हणेण, ‘तुम्ही माझे लोक आहात.’ आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर आमचा देव आहे.”‘

मलाखी 3:2

“त्यावेळेची तयारी कोणीही करु शकत नाही. तो येताच, कोणीही त्याच्यासमोर उभा राहू शकणार नाही. तो धगधगत्या अग्नीसारखा असेल. वस्तू अगदी स्वच्छ व्हाव्या म्हणून वापरण्यात येणाऱ्या तीव्र साबणासारखा असेल.

1 पेत्र 1:7

नाशवंत सोने शुध्द करण्याकरिता अग्नित टाकले जाते. त्याहून अधिक मौल्यवान अशा तुमच्या विश्वासाची कसोटी व्हावी, आणि येशू ख्रिस्ताच्या परत येण्याच्या वेळी तो खरा ठरावा आणि तुम्हाला स्तुति, गौरव व सन्मान मिळावा याची आवश्यकता आहे.

प्रकटीकरण 2:23

तर मी तिच्या अनुयायांना ठार मारुन टाकीन.मग सर्व मंडळ्यांना हे कळेल की मी तो आहे जो अंत:करणे आणि मने पारखतो. तुमच्या कृतींप्रमाणे मी प्रत्येकाला तुमचामोबदला देईन.

Interlinear

Choose Theme