Home Bibles यिर्मया 51:18 · मराठी बायबल
यिर्मया 51:18 · मराठी बायबल

त्या मूर्ती कवडीमोलाच्या आहेत. लोकांनी घडविलेल्या त्या मूर्ती म्हणजे भ्रम आहे. त्यांच्या न्यायनिवाड्याचा दिवस उजाडेल आणि त्यांचा नाश केला जाईल.

Cross references

निर्गम 12:12

“आज रात्री मी मिसर देशभर फिरेन आणि त्यातील प्रथम जन्मलेल्या मुलांना व जनावरांतील नरांना मी मारून टाकीन, आणि मिसरमधील सर्व दैवतांना धडा शिकवून दाखवीन की मी परमेश्वर आहे.

यशया 2:18

सर्व मूर्ती (खोटे देव) नाहीशा होतील.

यशया 19:1

मिसरबद्दल शोक संदेश पाहा, परमेश्वर, जलद गतीने जाणाऱ्या मेघावर आरूढ होऊन येत आहे. देव मिसरमध्ये प्रवेश करील आणि तेथील खोटे देव भीतीने थरथर कापू लागतील. मिसर खरा धैर्यवान होता पण त्याचे धैर्य गरम मेणाप्रमाणे वितळून जाईल.

यशया 46:1

बेल आणि नेबो माझ्यापुढे वाकतात. ते खोटे देव म्हणजे फक्त मूर्ती आहेत. लोक त्या मूर्तीना जनावरांच्या पाठीवर लादतात त्या मूर्ती म्हणजे वाहून न्यावी लागणारी फक्त ओझी आहेत. खोटे देव लोकांना दमविण्याव्यातिरिक्त काहीही करीत नाहीत.

यशया 57:12

मी तुमच्या ‘चांगुलपणाबद्दल’ आणि सर्व ‘धार्मिक’ कृत्यांबद्दल सांगू शकलो असतो पण त्या गोष्टीत काही अर्थ नाही.

यिर्मया 10:8

दुसऱ्या देशातील लोक मतिमंद आणि मूर्ख आहेत. दीड दमडीच्या लाकडाच्या मूर्ती त्यांना उपदेश करतात.

यिर्मया 10:11

परमेश्वर म्हणतो, “त्या लोकांना पुढील संदेश द्या. ‘त्या खोट्या देवांनी पृथ्वीची आणि स्वर्गाची निर्मिती केली नाही. ते स्वर्ग आणि पृथ्वीवरुन नाहीसे होतील.“

यिर्मया 10:15

त्या मूर्ती शून्य किंमतीच्या आहेत. त्या खोट्या आहेत, न्यायदानाच्या वेळी त्यांचा नाश होईल.

यिर्मया 18:15

पण माझे लोक मला विसरले आहेत. ते कवडी मोलाच्या मूर्तींना वस्तू अर्पण करतात. ते जे काय करतात, त्यालाच अडखळतात त्यांच्या पूर्वजांच्या जुन्या रस्त्यांपाशी ते अडखळतात माझी माणसे, माझ्यामागून चांगल्या मार्गाने येण्याऐवजी, आडवळणाने व वाईट मार्गाने जाणे पसंत करतील.

यिर्मया 43:12

तो मिसरच्या दैवतांच्या देवळांना आग लावील. तो देऊळे जाळील व मूर्ती काढून नेईल. मेंढपाळ ज्याप्रमाणे त्याच्या कपड्यावरील पिसवा व काटे ओढून काढून आपले कपडे स्वच्छ करतो, त्याप्रमाणे नबुखद्नेस्सर मिसर साफ करील. मग तो निर्धास्तपणे मिसर सोडून जाईल.

यिर्मया 46:25

सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “लवकरच मी नोच्या आमोन देवतेला शिक्षा करीन. मी फारो, मिसर आणि तिचे दैवत यांनाही शिक्षा करीन. मी मिसरच्या राजाला सजा देईन आणि फारोवर अवलंबून असलेल्या लोकांना शिक्षा करीन.

यिर्मया 48:7

तुम्ही घडविलेल्या गोष्टी व तुमची संपत्ती यावर तुम्ही भिस्त ठेवता, म्हणून तुम्ही पकडले जाल. कमोश दैवत कैद केले जाईल आणि त्याच्याबरोबर त्याचे पुरोहित व अधिकारी यांनाही नेले जाईल.

यिर्मया 50:2

“सर्व राष्ट्रांत घोषणा कर! झेंडा उंच उभारुन संदेश दे. माझा सगळा संदेश दे आणि सांग ‘बाबेल काबीज केला जाईल. बेल दैवताची फजिती होईल. मरदोख घाबरुन जाईल. बाबेलच्या मूर्तींची विटंबना केली जाईल. त्या भयभीत होतील.’

यहेज्केल 6:6

तुमचे लोक कोठेही राहात असले तरी त्यांचे वाईट होईल. त्यांची शहरे दगडमातीचे ढिगारे होतील. त्यांच्या उच्चस्थानांचा नाश होईल. का? कारण त्यांचा परत कधीही पूजेसाठी उपयोग केला जाऊ नये! त्या सगळ्या वेदींचा नाश केला जाईल. लोक त्या घाणेरड्या मूर्तीची पुन्हा कधीही पूजा करणार नाहीत. लोक त्या घाणेरड्या मूर्तींची पुन्हा कधीही पूजा करणार नाहीत. त्या धूपदानांचे तुकडे तुकडे केले जातील. तुम्ही तयार केलेल्या सर्व गोष्टींचा नाश केला जाईल.

योना 2:8

“काहीजण निरुपयोगी मूर्तीची पूजा करतात पण ते पूतळे त्यांना कधीच मदत करीत नाहीत.

सफन्या 2:11

ते लोक परमेश्वराला घाबरतील. का? कारम परमेश्वर त्यांच्या दैवतांचा नाश करील. मग दूरदूरच्या प्रदेशांतील सर्व लोक परमेश्वराची उपासना करु लागतील.

प्रेषितांचीं कृत्यें 14:15

“लोकांनो, ह्या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही! तुम्हांला जशा भावना आहेत, तशाच आम्हालाही आहेत! आम्ही तुम्हांला सुवार्ता सांगायला आलो. आम्ही तुम्हांला हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे. खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे. त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले.

Interlinear

Choose Theme