Home Bibles यिर्मया 51:17 · मराठी बायबल
यिर्मया 51:17 · मराठी बायबल

पण लोक इतके मूर्ख असतात की देवाने काय केले ते जाणत नाहीत. कुशाल कारागीर खोट्या दैवतांच्या मूर्ती करतात. त्या मूर्ती खोट्याच असतात. त्या म्हणजे कारगिराच्या मूर्खपणाचे प्रतीक होय. त्या मूर्ती काही जिवंत नसतात.

Cross references

स्तोत्रसंहिता 14:2

परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता. त्याला शहाणे लोक शोधायचे होते शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात.

स्तोत्रसंहिता 53:1

केवळ मूर्ख माणूसच देव नाही असा विचार करतो. तसले लोक भ्रष्टाचारी, वाईट, द्वेषपूर्ण असतात आणि ते कसले ही सत्कृत्य करीत नाहीत.

स्तोत्रसंहिता 92:5

परमेश्वरा, तू फारच महान गोष्टी केल्यास तुझे विचार समजून घेणे आम्हाला फार जड जाते.

स्तोत्रसंहिता 115:5

त्या पुतळ्यांना तोंड आहे पण बोलता येत नाही. त्यांना डोळे आहेत पण बघता येत नाही.

स्तोत्रसंहिता 115:8

ज्या लोकांनी असे पुतळे केले आणि त्यावर जे विश्वास ठेवतात ते त्या पुतळ्यांसारखेच होतात.

स्तोत्रसंहिता 135:17

पुतळ्यांना कान होते पण ते ऐकू शकत नव्हते. त्या पुतळ्यांना नाक होते पण ते वास घेऊ शकत नव्हते.

यशया 44:18

त्या लोकांना ते काय करीत आहे कळत नाही. त्यांना काही समजत नाही. जणू काही त्यांच्या डोळ्यावर पडदा पडला आहे, त्यामुळे ते पाहू शकत नाही. त्यांची हृदये (मने) समजून घ्यायचा प्रयत्न करीत नाहीत.

यिर्मया 10:14

लोक अगदी मूर्ख आहेत. आपण निर्माण केलेल्या मूर्तीमुळेच सोनार मूर्ख बनविले जातात. त्या मूर्ती म्हणजे फक्त असत्य आहे. ते फक्त थोतांडचआहे

यिर्मया 50:2

“सर्व राष्ट्रांत घोषणा कर! झेंडा उंच उभारुन संदेश दे. माझा सगळा संदेश दे आणि सांग ‘बाबेल काबीज केला जाईल. बेल दैवताची फजिती होईल. मरदोख घाबरुन जाईल. बाबेलच्या मूर्तींची विटंबना केली जाईल. त्या भयभीत होतील.’

हबक्कूक 2:18

त्या माणसाचे दैवत त्याला मदत करणार नाही. का? कारण तो देव म्हणजे काही लोकांनी धातूत कोरलेला एक पुतळा आहे. ती फक्त एक मूर्ती आहे. तेव्हा घडविणाऱ्याने तिच्याकडून मदतीची अपेक्षा करु नये. तो पुतळा बोलूसुध्दा शकत नाही.

रोमकरांस 1:20

जगाच्या निर्मितीपासून देवाचे अदृश्य गुण, त्याचे सनातन सामर्थ्य व त्याचे देवपण हे देवाने ज्या गोष्टी निर्माण केल्या त्यावरुन प्रगट होतात. आणि जर तुम्हांला हे कळत नाही, तर ह्याचे तुम्हांला कसलेच समर्थन करता येणार नाही.

1 करिंथकरांस 1:19

कारण पवित्र शास्त्रांत असे लिहिले आहे,“शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन, आणि बुद्धिवंतांची बुध्दि मी बाजूला करीन.”

Interlinear

Choose Theme