“आता तुझी आई खजील होईल. तुला जन्म देणारी ओशाळवाणी होईल. बाबेल सर्व राष्ट्रांत क्षुद्र ठरेल. ती म्हणजे ओसाड, निर्जन वाळवंट होईल.
Cross references
पण बाबेलोनचे सौंदर्य टिकणार नाही. भविष्यकाळात लोक तेथे राहणार नाहीत. अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत. मेंढपाळ मेंढ्या चारण्यास तेथे येणार नाहीत.
सर्वशक्तिमान परमेश्वर म्हणाला, “मी स्वत: त्या लोकांविरूध्द लढण्यास उभा राहीन. मी प्रसिध्द शहर बाबेलोनचा नाश करीन. मी सर्व बाबेलोन वासीयांचा नाश करीन. त्यांची मुले, नातवंडे, परतवंडे ह्यांचा नाश करीन.” हे सर्व स्वत: परमेश्वर बोलला.
मग सोर लोक म्हणतात, “बाबेलोनमधील लोक आम्हाला मदत करतील.” पण खास्द्यांच्या भूमीकडे (बाबेलोनकडे) पाहा. बाबेलोन आता देश राहिलेला नाही. अश्शूरने बाबेलोनवर हल्ला केला आणि त्याच्या भोवती युध्दस्तंभ उभारले. सुंदर घरातील सर्व चीजवस्तू सैनिकांनी लुटल्या. अश्शूरांनी बाबेलोनला जंगली जनावरांना राहण्यायोग्य बनविले. त्यांनी बाबेलोनला पूर्णपणे उजाड केले.
“पण 70 वर्षांनंतर मी बाबेलच्या राजाला शिक्षा करीन. मी बाबेल राष्ट्रालाही शिक्षा करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी खास्द्यांनी केलेल्या पापाबद्दल त्यांच्या देशाला शिक्षा करीन. मी त्या भूमीचे रुपांतर कायमच्या वाळवंटात करीन.
उत्तरेकडील सर्व, दूरच्या व जवळच्या राजांना मी ही द्राक्षरस पिण्यास भाग पाडले. एकामागून एकाला मी तो प्यायला लावला. पृथ्वीवरील सर्व राज्यांना मी परमेश्वरच्या क्रोधाने भरलेल्या प्याल्यातून प्यायला लावले. पण बाबेलचा राजा, सर्व राष्ट्रांच्या नंतर या प्याल्यातून पिईल.
परमेश्वर म्हणतो, “अम्मोनीच्या राब्बातून युद्धाचा खणखणाट ऐकण्याची वेळ येईल. राब्बाचा नाश होईल. ते पडझड झालेल्या इमारतींनी झाकलेली ओसाड टेकडी होईल. त्याच्या भोवतीची गावे जाळली जातील. ज्या लोकांनी, इस्राएलच्या लोकांना इस्राएलची भूमी बळजबरीने सोडायला लावली, त्यांच्याकडून इस्राएलचे लोक आपल्या भूमीचा ताबा घेतील. पण भविष्यात, इस्राएल त्यांना बळजबरीने हाकलून लावेल.” परमेश्वराने हे सांगितले.
देव म्हणतो, “तलवारी, बाबेलवासीयांना ठार कर. बाबेलमधील राजाच्या अधिकाऱ्यांना व ज्ञानी लोकांना ठार कर.
“पुन्हा कधीही बाबेलमध्ये मनुष्यवस्ती होणार नाही. जंगली, कुत्रे, शहामृग, आणि वाळवंटातील इतर प्राणी तेथे राहतील. पण कोणीही मनुष्याप्राणी तेथे पुन्हा कधीही राहणार नाही.
परमेश्वर म्हणतो, “बाबेल तू एखाद्या विनाशकारी पर्वताप्रमाणे आहेस, आणि मी तुझ्याविरुद्ध आहे. तू सर्व देशाचा नाश केलास, आणि मला ते आवडले नाही. मी माझ्या हाताच्या बळाने तुला कड्यांवरुन लोटून देईन. आणि बेचिराख झालेल्या पर्वताप्रमाणे मी तुझी स्थिती करीन.
बाबेलमधील गावांचा नाश होईल आणि ती ओसाड बनतील. बाबेल एक रुक्ष वाळवंट होईल. तो निर्जन होईल. लोक ह्या भूमीतून नुसता प्रवाससुध्दा करणार नाहीत.
मग म्हण, ‘हे देवा, बाबेलचा नाश करीन असे तू म्हणालास, तू तिचा नाश करशील. मग तेथे कोणी मनुष्यप्राणी वा पशू राहणार नाही. ती जागा सदाकरिता ओसाड भग्नावशेष होईल.’
परंतु स्वर्गीययरुशलेम स्वतंत्र आहे. स्वर्गीय यरुशलेम ही आमची आई आहे.
तिच्या कपाळावर नाव लिहिले होते.त्या नावाला गुपित अर्थ आहे. त्यावर असे लिहीले होते:
मग एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलून तो समुद्रात टाकून दिला. आणि म्हणाला:“अगदी अशीच महान बाबेल नगरी जोराने खाली फेकण्यात येईल आणि परत ती कधीही कोणाला सापडणार नाही.