Home Bibles यिर्मया 50:11 · मराठी बायबल
यिर्मया 50:11 · मराठी बायबल

“बाबेल, तू आनंदी व उल्हसित आहेस तू माझी भूमी घेतलीस. धान्यात शिरलेल्या गायीप्रमाणे तू नाचतेस. तू आनंदाने घोड्याप्रमाणे खिंकाळतेस.

Cross references

अनुवाद 32:15

“पण यशुरुन (इस्राएल) माजला आणि उन्मत्त बैलासारखा लाथा झाडू लागला. खाऊन पिऊन तो धष्ट पुष्ट झाला! आणि त्याने आपल्या कर्त्या देवाचा त्याग केला! आपले तारण करणारा दुर्गासारखा परमेश्वर तुच्छ मानला.

स्तोत्रसंहिता 22:12

माझ्याभोवती लोक आहेत ते बळकट बैलासारखे माझ्या चहू बाजूला आहेत.

स्तोत्रसंहिता 74:2

तू खूप दिवसांपूर्वी ज्या लोकांना विकत घेतलेस त्यांची आठवण ठेव. तू आम्हाला वाचवलेस आता आम्ही तुझे आहोत. ज्या सियोनाच्या डोंगरावर तू राहिलास त्याची आठवण तुला होते का?

स्तोत्रसंहिता 79:1

देवा, काही लोक तुझ्या माणसांशी लढायला आले. त्या लोकांनी तुझ्या पवित्र मंदिराचा नाश केला. त्यांनी यरुशलेम उध्वस्त केले.

स्तोत्रसंहिता 83:1

देवा, गप्प राहू नकोस. तुझे कान बंद करु नकोस. देवा, कृपा करुन काही तरी बोल.

नीतिसूत्रे 17:5

काही लोक गरीबांची थट्टी करतात. ज्यांच्यापुढे समस्या असतात त्यांना ते हसतात. या वरुन असे दिसते की ते वाईट लोक, ज्या देवाने त्यांची निर्मिती केली त्या देवाचा आदर करीत नाहीत. त्यांना शिक्षा होईल.

यशया 10:6

पापे करणाऱ्या लोकांविरूध्द लढण्यासाठी मी अश्शूरला पाठवीन. मला त्या लोकांचा अतिशय राग आला आहे म्हणून मी अश्शूरला त्यांच्यावर चाल करून जाण्याची आज्ञा करीन. अश्शूर त्यांचा पराभव करील व त्यांची सर्व संपत्ती लुटून नेईल. रस्त्यातील कचऱ्याप्रमाणे इस्राएल अश्शूरच्या पायाखाली तुडविला जाईल.

यशया 47:6

“मी माझ्या लोकांवर रागावलो होतो ते लोक माझे आहेत पण मी रागावलो असल्याने त्यांचे महत्व कमी केले. मी त्यांना तुझ्या ताब्यात दिले. तू त्यांना शिक्षा केलीस. पण तू त्यांना अजिबात दया दाखविली नाहीस. तू वृध्दांनासुध्दा खूप मेहनत करायला लावलीस.

यिर्मया 5:8

ते लोक, भरपूर खाद्य खाणाऱ्या व समागमाला तयार असणाऱ्या घोड्यांप्रमाणे आहेत. शेजाऱ्याच्या बायकोला वासनेने हाका मारणाऱ्या घोड्यांप्रमाणे ते आहेत.

यिर्मया 5:28

त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांमुळे ते पुष्ट व लठ्ठ झाले आहेत. त्यांच्या दुष्कृत्यांना अंत नाही. ते अनाथांच्या वतीने बोलणार नाहीत. ते त्यांना मदत करणार नाहीत. ते गरीब लोकांना योग्य न्याय मिळवून देणार नाहीत.

यिर्मया 46:21

मिसरच्या सैन्यातील भाडोत्री सैनिक हे लठ्ठ वासराप्रमाणे आहेत. ते पाठ फिरवून पळून जातील. ते चढाईला समर्थपणे तोंड देणार नाहीत त्यांच्या नाशाची वेळ येत आहे. त्यांना लवकरच शिक्षा होईल.

यिर्मया 50:17

“सर्व देशभर पसरलेल्या मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे इस्राएल आहे. सिंहाने पाठलाग करुन दूर पळवून लावलेल्या मेंढराप्रमाणे इस्राएल आहे. त्यांच्यावर प्रथम हल्ला करणारा सिंह म्हणजे अश्शूरचा राजा आणि त्याची हाडे मोडणारा अखेरच सिंह म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होय.”

यिर्मया 50:27

बाबेलमधल्या सर्व तरुण बैलांना (पुरुषांना) ठार करा. त्यांची कत्तल होऊ द्या. त्यांच्या पराभवाची वेळ आली आहे. त्यांचे फार वाईट होईल. ही त्यांच्या शिक्षेची वेळ आहे.

यिर्मया 51:34

सियोनचे लोक म्हणतील, “बाबेलच्या राजा नबुखद्नेस्सरने पूर्वी आमचा नाश केला. पूर्वी त्याने आम्हाला दुखावले. त्याने आमचे लोक नेले, व त्यामुळे आमची स्थिती रिकाम्या रांजणासारखी झाली. आमच्याजवळचे जेवढे चांगले, तेवढे त्याने नेले, आणि आम्हाला दूर फेकून दिले. तो पोट भरेपर्यंत आम्हाला खाणाऱ्या एखाद्या प्रचंड राक्षसासारखा होता.

विलापगीत 1:21

“माझे ऐका मी उसासे टाकीत आहे. माझे सांत्वन करणारा कोणीही नाही. माझा त्रासाबद्दल माझ्या शत्रूंना कळले आहे. त्यांना आनंद झाला आहे. तू माझे असे केल्यामुळे ते आनंदित झाले आहेत. तू म्हणालास की शिक्षेची वेळ येईल. व तू माझ्या शत्रूंना शिक्षा करशील. आता म्हटल्याप्रमाणे कर. माझ्याप्रमाणेच त्यांची स्थिती होऊ दे.

विलापगीत 2:15

रस्त्यावरून जाणारे तुला पाहून हादरतात व हळहळतात. यरुशलेमच्या कन्येकडे बघून ते चुकचुकतात. ते विचारतात, “लोक जिला “सौंदर्यपूर्ण नगरी” अथवा “पृथ्वीवरचा आनंद म्हणतात, ती नगरी हीच का?””

विलापगीत 4:21

अदोमच्या लोकांनो, आनंदित व्हा. ऊस देशात राहणाऱ्यांनो, हर्षित व्हा. पण लक्षात ठेवा की परमेश्वराच्या क्रोधाचा प्याला तुमच्याकडेसुध्दा येईल. तुम्ही जेव्हा त्यातील पेय (शिक्षा) प्याल, तेव्हा झिंगाल आणि विवस्त्र व्हाल.

यहेज्केल 25:3

त्यांना सांग, ‘माझ्या परमेश्वर प्रभुचा संदेश ऐका. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की माझ्या पवित्र स्थानाचा नाश झाला, तेव्हा तुम्हाला खूप आनंद झाला. इस्राएलची भूमी उद्ध्वस्त करण्यात आली, तेव्हा तुम्ही इस्राएलच्या भूमीच्या विरुद्ध होता. यहूदी लोकांना कैदी म्हणून नेण्यात आले, तेव्हा तुम्ही यहूदी लोकांच्याविरुध्द होता.

यहेज्केल 25:15

परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “पलिष्ट्यांनी सूड घ्यायचा प्रयत्न केला. ते फार क्रूर होते. त्यांनी आपला राग खूप काळ मनात दाबून धरला.”

यहेज्केल 26:2

“मानवपुत्रा, सोरने यरुशलेमबद्दल वाईट उद्गार काढले. ती म्हणाली, ‘अहा! लोकांचे रक्षण करणाऱ्या प्रवेशद्वाराचा नाश झाला आहे. आता मला द्वार मोकळे झाले आहे. नगरीचा (यरुशलेमचा) नाश झाला. त्यामुळे तेथून मला खूप मौल्यवान वस्तू मिळतील.”

होशेय 10:11

एफ्राईम शिकविलेल्या तरुन कालवडीप्रमाणे आहे. तिला खळ्यातील धान्यावरुन चालायला आवडते. मी तिच्या गळ्यात चांगले जोखड अडकवीन. एफ्राईमला दोराने बांधीन मग यहूदा नांगरणी करील याकोब स्वत: ढेकळे फोडील.

आमोस 4:1

शोमरोनच्या पर्वतावर राहणाऱ्या, बाशानच्या गायींनो, मी काय म्हणतो ते ऐका! तुम्ही गरिबांना दुखविता! त्यांना चिरडून टाकत! तुम्ही तुमच्या नवऱ्यांना तुमच्यासाठी “मद्य आणण्यास सांगता!”

ओबद्या 1:12

तुझ्या भावाच्या संकटांना तू हसलास. तू असे करायला नको होतेस. लोकांनी जेव्हा यहूदाचा नाश केला तेव्हा तू आनंद मानलास, तू तसे करायला नको होतेस. त्याच्या संकटसमयी तू प्रौढी मिरविलीस; असेही तू करायला नको होतेस.

हबक्कूक 1:15

शत्रू त्यांना गळाच्या आणि जाळ्याच्या साहाय्याने पकडतो तो त्यांना आत ओढतो. आपण पकडलेल्या सावजावर, शत्रु असतो.

जखऱ्या 2:8

का? कारण जर त्यांनी तुला दुखविले तर ते (कृत्य) देवाच्या डोळ्यातील बुबुळाला इजा करण्यासारखेच आहे.

जखऱ्या 14:1

पाहा! परमेश्वराचा न्यायदानाचा ठराविक दिवस आहे. तुम्ही लुटलेली संपत्ती तुमच्या शहरात वाटली जाईल.

जखऱ्या 14:12

पण यरुशलेमविरुध्द लढलेल्या राष्ट्रांना परमेश्वर शिक्षा करील. तो त्या राष्ट्रांना रोगराईने पछाडेल. जिवंतपणीच लोकांची कातडी कुजू लागेल. त्याचे डोळे त्यांच्या खाचांत आणि जिभा तोंडांत सडतील.

Interlinear

Choose Theme