Home Bibles प्रकटीकरण 18:21 · मराठी बायबल
प्रकटीकरण 18:21 · मराठी बायबल

मग एका बलवान देवदूताने जात्याच्या मोठ्या तळीसारखा धोंडा उचलून तो समुद्रात टाकून दिला. आणि म्हणाला:“अगदी अशीच महान बाबेल नगरी जोराने खाली फेकण्यात येईल आणि परत ती कधीही कोणाला सापडणार नाही.

Cross references

निर्गम 15:5

खोल पाण्याने त्यांना बुडविले; ते खोल पाण्यात दगडाप्रमाणे तळापर्यंत बुडाले.

नहेम्या 9:11

त्यांच्या डोळयादेखत तू तांबडा समुद्र दुभंगून दाखवलास. आणि ते कोरड्या जमिनीरुन चालत गेले. मिसरचे सैन्य त्यांचा पाठलाग करत होते पण तू त्या शत्रूला समुद्रात फेकून दिलेस आणि ते समुद्रात दगड बुडावा तसे बुडुन गेले.

ईयोब 20:8

तो एखाद्या स्वप्नासारखाउडून जाईल व तो कोणालाही सापडणार नाही. त्याला घालवून देण्यात येईल आणि एखाद्या दु:स्वप्रासारखा तो विसरलाही जाईल.

स्तोत्रसंहिता 37:36

परंतु नंतर तो नाहीसा झाला, मी त्याला शोधले पण तो मला सापडला नाही.

यिर्मया 51:63

हा संदेश वाचून संपताच पटाला एक दगड बांध. नंतर हा पट फरात नदीत फेकून दे.

यहेज्केल 26:21

तुझी स्थिती पाहून इतर लोक घाबरतील. तू संपशील. लोक तुला शोधतील, पण तू त्यांना पुन्हा कधीही सापडणार नाहीस” असे परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो.

दानीएल 11:19

ह्यान्तर उत्तरेचा राजा स्वतःच्या देशातील भक्कम किल्ल्यांत परत जाईल पण तो दुर्बल होईल व पडेल त्याचा अंत होईल.

प्रकटीकरण 5:2

आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत मोठ्याआवाजात म्हणाला, “गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण पात्र आहे.?”

प्रकटीकरण 10:1

मग मी आणखी एक शक्तीशाली देवदूत स्वर्गातून येताना पाहिला. तो ढगांनी आच्छादलेला होता. त्याच्या डोक्यावरमेघधनुष्य होते. त्याचा चेहरा सूर्यासारखा होता, त्याचे पाय जणू काय अग्नीचे खांब होते.

प्रकटीकरण 12:8

पण साप तितका बलवान नव्हता. प्रचंड साप व त्याच्या दूतांना स्वर्गातील त्यांचे स्थान गमवावेलागले.

प्रकटीकरण 16:20

प्रत्येक बेट नाहीसे झाले. आणि पर्वत पूर्णपणे नष्ट झाले.

प्रकटीकरण 18:10

तिच्या शारीरिक पीडांच्या भीतीमुळे ते राजे दूरउभे राहतील, आणि ओरडतील:“भयंकर! भयंकर, हे महान नगरी बाबेल, सामर्थ्याच्या शहरा! एका तासात तुझा न्याय तुझ्यावर येईल!”

प्रकटीकरण 18:22

वीणा वाजविणाऱ्यांचा, संगीत वाजविणाऱ्यांचा, बासरी वाजविणाऱ्यांचा आणि कर्णा वाजविणाऱ्यांचा आवाज परत कधीतुझ्या येथे ऐकू येणार नाही. कोणताही कारागिरीचा व्यापारी तुइयामध्ये आढळणार नाही तुझ्या येथे जात्याचा आवाज कधीऐकू येणार नाही.

प्रकटीकरण 20:11

नंतर एक मोठे पांढरे सिंहासन आणि त्याच्यावर जो बसला होता. त्याला मीपाहिले. त्याच्या समोरुन पृथ्वी आणि आकाश ही पळून गेली. आणि त्याच्यासाठी कोठेच जागा नव्हती.

Interlinear

Choose Theme