Home Bibles यिर्मया 41:17 · मराठी बायबल
यिर्मया 41:17 · मराठी बायबल

योहानान व इतर सैन्याधिकारी खास्द्यांना भीत होते. बाबेलच्या राजाने गदल्याला यहूदाचा राज्यपाल म्हणून निवडले होते. पण इश्माएलने गदल्याचा खून केला, म्हणून खास्दी रागावले असतील अशी भीती योहानानला वाटत होती. म्हणून त्यांनी मिसरला पळून जाण्याचे ठरविले मिसरच्या वाटेवर ते गेरुथ किम्हाम येथे राहिले. गेरुथ किम्हाम बेथलेहेमनजीक आहे.

Cross references

2 शमुवेल 19:37

पण मला पुन्हा परत घरी जाऊ दे. म्हणजे माझ्या गावात मी देह ठेवीन आणि माझ्या आईवडीलांच्या कबरीतच माझे दफन होईल. पण किम्हनला आपला चाकर म्हणून बरोबर घेऊन जाऊ शकतोस. महाराज आपल्या मर्जीप्रमाणे त्याला वागव.

2 शमुवेल 19:38

तेव्हा राजा म्हणाला, “तर किम्हाम माझ्याबरोबर येईल. तुला स्मरुन मी त्याचे भले करीन. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.”

यशया 30:2

ही मुले मिसरकडे मदत मागायला जात आहेत. पण ते जे करीत आहेत, ते योग्य आहे का; असे मला विचारावे, असे त्यांना वाटत नाही. फारो त्यांचा बचाव करील असे त्यांना वाटते. मिसरने त्यांचे रक्षण करावे अशी त्यांची इच्छा आहे.

यिर्मया 42:14

तुम्ही कदाचित् असेही म्हणाल ‘नाही, आम्ही मिसरमध्ये जाऊन राहू. तेथे युध्द आम्हाला दिसणार नाही किंवा रणशिंगाचा आवाज ऐकू येणार नाही तेथे आमची उपासमार होणार नाही.’

यिर्मया 42:19

“यहूदातील वाचलेल्या लोकांनो, ‘मिसरला जाऊ नका.’ असे परमेश्वराने तुम्हाला सांगितले आहे, मी आताच तुम्हाला ताकीद देतो.

यिर्मया 43:5

पण परमेश्वराचे ऐकण्याऐवजी, योहानान व सेनाधिकारी वाचलेल्या लोकांना इतर देशांत नेले होते. पण ते यहूदाला परत आले होते.

यिर्मया 43:7

त्या लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही, ते सर्व लोक मिसरला गेले, ते तहपन्हेस येथे गेले.

Interlinear

Choose Theme