मग कारेहचा मुलगा योहानान व इतर सर्व सैन्याधिकारी यांनी सर्व कैद्यांना सोडविले. गदल्याला ठार मारल्यानंतर इश्माएलने ह्या लोकांना मिस्पा येथून आणले होते. त्या वाचलेल्या लोकांत सैनिक, स्त्रिया, मुले व दरबारातील अधिकारी होते. योहानानने त्यांना गिबोनमधून परत आणले.
Cross references
मिस्पामधील इतर सर्व लोकांना इश्माएलने पकडले ह्या लोकांत राजाच्या मुली व इतर मागे राहिलेले लोक होते. हे लोक म्हणजे नबूजरदानने गदल्याला ज्या लोकांवर लक्ष ठेवण्यास नेमले होते, तेच होते नबूजर दान हा बाबेलच्या राजाच्या खास रक्षकांचा प्रमुख होता. इश्माएलने त्या सर्व लोकांना कैद केले व तो अम्मोनी लोकांचा देश पार करुन जाण्यास निघाला.
मग यिर्मयाने कारेहचा मुलगा योहानान, त्याच्याबरोबर असलेले सेनाधिकारी व राजापासून रंकापर्यंत सर्व लोक यांना एकत्र केले.
म्हणून योहानान, सेनाधिकारी व इतर सर्व लोक ह्यांनी परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन केले परमेश्वराने त्यांना यहूदात राहण्याची आज्ञा दिली होती.