Home Bibles यिर्मया 39:18 · मराठी बायबल
यिर्मया 39:18 · मराठी बायबल

तू युध्दात मरणार नाहीस, तर तू निसटशील आणि जगशील. तू माझ्यावर विश्वास ठेवलास, म्हणून हे घडेल.” हा परमेश्वराचा संदेश आहे.

Cross references

1 इतिहास 5:20

मनश्शे, रऊबेन आणि गाद वंशातील लोक लढाईच्या वेळी देवाची प्रार्थना करीत. देवावर भरवंसा असल्यामुळे ते मदतीची याचना करीत. देव त्यांना साहाय्य करी. त्यामुळे त्यांना हग्री लोकांचा पराभव करता आला. या लोकांबरोबरच्या इत्तर लोकांचाही त्यांनी पाडाव केला.

ईयोब 5:20

दुष्काळात देव तुला मृत्यूपासून वाचवेल आणि युध्दातही तो तुझे मृत्यूपासून रक्षण करेल.

स्तोत्रसंहिता 2:12

तुम्ही देवपुत्रासी प्रामाणिक आहात हे दाखवा. तुम्ही जर असे केले नाही तर तो रागावेल आणि तुमचा नाश करेल जे परमेश्वरावर विश्वास ठेवतात ते सुखी असतात. पण इतरांनी मात्र सावधगिरी बाळगली पाहिजे. तो आता आपला राग प्रकट करण्याच्या बेतात आहे.

स्तोत्रसंहिता 33:18

परमेश्वर त्याच्या भक्तांवर नजर ठेवतो आणि त्यांची काळजी घेतो. जे लोक त्याची भक्ती करतात त्यांचे तो रक्षण करतो.

स्तोत्रसंहिता 34:22

परमेश्वर त्याच्या सेवकांच्या आत्म्यांना वाचवतो. ते लोक त्याच्यावर अवलंबून असतात तो त्यांचा विनाश होऊ देणार नाही.

स्तोत्रसंहिता 37:3

तू जर परमेश्वरावर विश्वास ठेवलास आणि चांगल्या गोष्टी केल्यास तर तू खूप जगशील आणि ही जमीन ज्या चांगल्या गोष्टी देते त्यांचा उपभोग घेशील.

स्तोत्रसंहिता 37:39

परमेश्वर चांगल्या माणसांना तारतो ते जेव्हा संकटात सापडतात तेव्हा परमेश्वर त्यांची शक्ती होतो.

स्तोत्रसंहिता 84:12

सर्वशक्तिमान परमेश्वरा, जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात ते खरोखरच सुखी असतात. 13

स्तोत्रसंहिता 91:7

तुम्ही 1000 शत्रूंचा पराभव कराल, तुमचा उजवा हात 10 000 शत्रू सैनिकांचा पराभव करेल. तुमचे शत्रू तुम्हाला स्पर्शसुध्दा करु शकणार नाहीत.

स्तोत्रसंहिता 146:3

तुमच्या नेत्यांवर मदतीसाठी अवलंबून राहू नका. लोकांवर विश्वास टाकू नका. का? कारण लोक तुम्हाला वाचवू शकत नाहीत.

स्तोत्रसंहिता 147:11

जे लोक त्याची प्रार्थना करतात त्यांच्या बरोबर परमेश्वर आनंदी असतो. जे लोक त्याच्या खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर देव आनंदी असतो.

यशया 26:3

परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर श्रध्दा ठेवणाऱ्यांना, तू खरी शांती देतोस.

यिर्मया 17:7

परंतु परमेश्वरावर विश्वास ठेवणाऱ्यावर कृपादृष्टी होईल. का? कारण परमेश्वर विश्वासास प्रात्र आहे, ह्याची देव त्याला प्रचिती देईल.

यिर्मया 21:9

जो यरुशलेममध्ये राहील तो लढाईत, उपासमारीने वा भयंकर रोगराईने मरेल, पण जो कोणी यरुशलेमच्या बाहेर जाऊन बाबेलच्या सैन्याला शरण जाईल, तो जागेल. त्या सैन्याने नगरीला वेढा घातला आहे म्हणून नगरीला रसद मिळू शकत नाही. पण जो कोणी नगर सोडून जाईल, त्याचा जीव वाचेल.

यिर्मया 38:2

“परमेश्वर असे म्हणतो ‘यरुशलेममध्ये राहणारा प्रत्येकजण युद्ध, उपासमार वा भयंकर रोगाराई ह्यांनी मरेल. पण बाबेलच्या सैन्याला शरण जाणारा वाचेल, तो जिवानिशी सुटेल.’

यिर्मया 45:4

“यिर्मया, बारुखला असे सांग की परमेश्वर म्हणतो, ‘मी बांधलेले मीच तोडून टाकीन. मी पेरलेले मीच उपटून टाकीन. मी सर्व यहूदात असेच करीन.

यिर्मया 45:5

बारुख, तू स्वत:साठी मोठ्या गोष्टींची अपेक्षा करतोस तशी अपेक्षा करु नकोस. कारण मी सर्वांवर संकट आणीन.’ परमेश्वरानेच ह्या गोष्टी सांगितल्या ‘तुला खूप ठिकाणी जावे लागेल पण तू जेथे जाशील, तेथून मी तुझी जिवंतपणे सुटका करीन.”

रोमकरांस 2:12

जे सर्व नियमशास्त्राबाहेर असून पाप करतात, ते नियमशास्त्राबाहेर नाश पावतील. व जितक्यांनी नियम शास्त्राधीन असून पाप केले तितक्यांना नियमशास्त्रानुसार शिक्षा होईल.

इफिसकरांस 1:12

यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर अगोदरच आशा ठेवली होती, त्या आम्हांकडून त्याच्या गौरवाची स्तुति व्हावी.

1 पेत्र 1:21

ज्या देवाने त्याला मेलेल्यांतून उठविले व त्याला गौरव दिले त्या देवावर तुम्ही विश्वास ठेवणारे झाला आहात. म्हणून तुमचा विश्वास आणि आशा देवामध्ये आहे.

Interlinear

Choose Theme