“यिर्मया, बारुखला असे सांग की परमेश्वर म्हणतो, ‘मी बांधलेले मीच तोडून टाकीन. मी पेरलेले मीच उपटून टाकीन. मी सर्व यहूदात असेच करीन.
Cross references
म्हणून पृथ्वीवर मनुष्य निर्माण केल्याबद्दल परमेश्वरला वाईट वाटले;
भूतकाळात तू आम्हाला अतिशय महत्वाच्या वनस्पती सारखे वागवलेस. तू तुझी ही “वेल” मिसर देशाच्याबाहेर आणलीस. तू इतर लोकांना ही जमीन सोडून जायला भाग पाडलेस आणि तू तुझी “वेल” इथे लावलीस.
ठर मारण्याची आणि बरे करण्याची पण वेळ असते. सगव्व्याचा नाश करण्याची आणि पुन्हा परत सर्व उभारायचीही वेळ असते.
माझ्या मित्राने खणून जमीन साफसूफ केली. तिच्यामध्ये अतिशय उत्तम प्रतीच्या द्राक्षाची लागवड केली. त्याने मळ्याच्या मध्यभागी एक मनोरा बांधला. द्राक्षाचे उत्तम पीक येईल अशी त्याला आशा होती पण त्यातून निकृष्ट प्रतीचीच फळे आली.
आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे ते तुम्हाला सांगतो.मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढून मी जाळून टाकीन. त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून दगड पायाने तुडवीन.
खाली ओढण्यासाठी, फाडून टाकण्यासाठी, नष्ट करुन टाकण्यासाठी आणि उलथून टाकण्यासाठी, उभारणी करण्यासाठी आणि नवीन लागवड करण्यासाठी आजपासून मी राष्ट्रे आणि राज्ये तुझ्या ताब्यात देत आहे.”
सर्वशक्तिमान परमेश्वराने तुझे रोपटे लावले, आणि आता तोच तुझ्यावर संकटे येणार असे म्हणतो. का? कारण इस्राएल आणि यहूदाच्या लोकांनी कुकर्मे केली. त्यांनी ‘बआल’ देवाला यज्ञ अर्पण केले म्हणून मला राग आला.”
मी राष्ट्र व राज्य ह्याबद्दल बोलण्याची वेळ येण्याचा संभव आहे. मी कदाचित् त्या राष्ट्राला वर ओढीन असे म्हणेन वा त्या राष्ट्रांला खाली खेचून त्या राष्ट्राचा वा राज्याचा नाश करीन असेही म्हणेन.
पूर्वी मी यहूदा आणि इस्राएल यांच्यावर लक्ष ठेवले. व त्यांना उपटून काढण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट पाहिली मी त्यांना फाडून काढले. मी त्यांचा नाश केला. मी त्यांच्यावर खूप संकटे आणली. पण आता, त्यांनी पुन्हा उभे राहावे व सामर्थ्यवान व्हावे म्हणून लक्ष ठेवीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
बाग उपटून टाकावी, तसा परमेश्वराने आपला स्वत:चा तंबू उखडला. त्याची उपासना करण्यासाठी लोक जेथे जमत, ती जागा त्याने नष्ट केली. परमेश्वराने सणव शब्बाथ दिवस हग्रंचा विसर पाडला आहे. परमेश्वर रागावला व त्याने राजा व याजक यांना दूर लोटले.
“म्हणून मी (परमेशवर) तिला शिकवीन. मी तिला वाळवंटात नेईन. मी तिच्याशी प्रेमाने बोलेन.