Home Bibles यिर्मया 39:17 · मराठी बायबल
यिर्मया 39:17 · मराठी बायबल

पण, एबद-मलेख, मी तुला त्या दिवशी वाचवीन.’ हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. तू ज्या लोकांना घाबरतोस, त्यांच्या स्वाधीन मी तुला करणार नाही.

Cross references

उत्पत्ति 15:1

या सर्व गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांन्तात परमेश्वराचे वचन आले. देव म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको; मी तुझे रक्षण करीन आणि तुला आनंद होईल असे मी तुला मोठे प्रतिफळ देईन.”

2 शमुवेल 24:14

दावीद गादला म्हणाला, “मी पेचात सापडलो आहे खरा! पण परमेश्वर दयाळू आहे. परमेश्वरच मला शिक्षा देवो. लोकांच्या हाती मी पडू नये.”

1 राजे 18:15

यावर एलीया त्याला म्हणाला, “सर्वशक्तिमान परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, आज मी राजासमोर उभा राहाणार आहे, असे मी वचन देतो.”

1 राजे 18:16

तेव्हा ओबद्या राजाकडे गेला. त्याने अहाब राजाला एलीयाचा ठावठिकाणा सांगितला. राजा एलीयाला भेटण्यासाठी आला.

2 राजे 6:16

अलीशा म्हणाला, “घाबरु नको! अरामच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य किती तरी मोठे आहे!”

ईयोब 5:19

देव तुला सहा प्रकारच्या संकटांतून तारील. आणि सात संकटांत तुला काहीही अपाय होणार नाही.

स्तोत्रसंहिता 41:1

जो माणूस गरीबांना यशस्वी होण्यासाठी मदत करतो त्याला अनेक आशीर्वाद मिळतील. संकट येईल तेव्हा परमेश्वर त्याला वाचवेल.

स्तोत्रसंहिता 41:2

परमेश्वर त्या माणसाचे रक्षण करेल आणि त्याचा जीव वाचवेल. पृथ्वीवर त्या माणसाला आशीर्वाद मिळेल. देव त्या माणसाचा त्याच्या शत्रूकडून नाश होऊ देणार नाही.

स्तोत्रसंहिता 50:15

देव म्हणतो, “इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही संकटात असाल तेव्हा माझी प्रार्थना करा. मी तुम्हाला मदत करीन. आणि नंतर तुम्ही मला मान देऊ शकाल.”

स्तोत्रसंहिता 91:14

परमेश्वर म्हणतो, “जर एखादा माणूस माझ्यावर विश्वास ठेवेल, तर मी त्याचे तारण करीन. जे माझे अनुयायी माझी उपासना करतात त्यांचे मी रक्षण करतो.

यिर्मया 1:19

ते सर्व लोक तुझ्याविरुद्ध लढतील, पण ते तुझा पराभव करणार नाहीत. का? कारण मी तुझ्याबरोबर आहे. मी तुझे रक्षण करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे.

यिर्मया 38:1

यिर्ममाचे संदेशाबद्दलचे बोलणे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऐकले. मत्तानचा मुलगा शफाट्या, पशहूरचा मुलगा गदल्या, शलेम्याचा मुलगा युकाल व मल्कीयाचा मुलगा पशहूर हे ते राजाचे अधिकारी होत. यिर्मया सर्व लोकांना पुढील संदेश सांगत होता.

दानीएल 6:16

अखेर दारयावेश राजाने हुकूम दिला. मग त्यांनी दानीएलला आणून सिंहाच्या गुहेत (पिजंऱ्यात) टाकले. राजा दानीएलला म्हणाला “तू ज्या देवाची उपासना करतोस तो तुझा देव तूला वाचवील अशी मी आशा करतो”.

मत्तय 10:40

जी व्यक्ति तुम्हांला स्वीकारते ती व्यक्ति मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठविले त्यालाही स्वीकारते.

मत्तय 25:40

“मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हांला खरे सांगतो: येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.

2 तीमथ्थाला 1:16

अनेसिफराच्या घरावर प्रभु दया दाखवो. कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे. आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्याला लाज वाटली नाही.

Interlinear

Choose Theme