Home Bibles यशया 6:12 · मराठी बायबल
यशया 6:12 · मराठी बायबल

परमेश्वर लोकांना दूर पळवून लावील ह्या देशात खूप मोठी ओसाड जमीन तयार होईल.

Cross references

अनुवाद 28:64

परमेश्वर तुम्हाला पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या खोट्यानाट्या देवांची उपासना कराल.

2 राजे 25:11

नगरात अजून असलेले लोक नबुजरदानने ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी जे शरण यायला तयार होते त्यांच्यासह सर्वांना कैदी म्हणून नेले.

यशया 26:15

तुझ्या आवडत्या राष्ट्राला तू मदत केलीस. इतर लोकांना त्या राष्ट्राचा पराभव करण्यापासून थांबविलेस.

यिर्मया 4:29

यहुदातील लोक घोडेस्वारांचा व धनुर्धरांचा आवाज ऐकतील आणि ते पळून जातील. काही लोक गुहांतून लपतील काही झुडुपांत लपतील. काही डोंगरकड्यावर चढतील. यहुदातील सर्व शहरे ओस पडतील. तेथे कोणीही राहणार नाही.

यिर्मया 12:7

“मी परमेश्वराचा माझ्या घराचा त्याग केला आहे. मी माझी मालमत्तासोडली आहे. मी माझी प्रियतमा (यहूदा) तिच्या वैऱ्यांच्या ताब्यात दिली आहे.

यिर्मया 15:4

पृथ्वीवरच्या सर्व लोकांना, एखाद्या भयंकर गोष्टीसाठी देण्याचे उदाहरण म्हणून मी यहूदाच्या लोकांचा उपयोग करीन. मनश्शेने यरुशलेममध्ये जे काय केले, त्यासाठी मी यहूदातील लोकांना शिक्षा करीन. कारण मनश्शे हा हिज्कीया राजाचा मुलगा व यहूदाचा राजा होता.’

यिर्मया 52:28

आणि अशाप्रकारे नबुखद्नेस्सरने त्यांना कैद केलेनबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या 7 व्या वर्षी 3023यहूदी लोकांना यहूदातून पकडून नेले.

विलापगीत 5:20

परमेश्वर आम्हाला कायमचा विसरला आहेस असे दिसते. तू आम्हाला दीर्घकाल सोडून गेला आहेस.

रोमकरांस 11:1

तर मग मी म्हणतो, “देवाने आपल्या लोकांना सोडून दिले आहे काय?” खात्रीने नाही! कारण मीही इस्राएली आहे. अब्राहामापासूनचा, बन्यामिन वंशातला.

रोमकरांस 11:15

जर देवाने त्यांच्या केलेल्या अव्हेराचा परिणाम जगासाठी समेट झाला. तर देवाकडून स्वीकार याचा अर्थ मेलेल्यांतून जिवंत होणे, नाही का?

Interlinear

Choose Theme