Home Bibles यशया 6:13 · मराठी बायबल
यशया 6:13 · मराठी बायबल

पण लोकसंख्येचा दहावा हिस्सा ह्या भूमीवर राहतील. त्यांचा नाश होणार होता तरीही ते परमेश्वराकडे परत येतील. हे लोक एलाच्या झाडाप्रमाणे असतील. एलाचे झाड कापले तरी बुडखा शिल्लक राहतोच. हे राहिलेले लोक त्या बुडख्याप्रमाणे असतील. हे लोक खास बीज म्हणजेच देवाची लाडकी लेकरे असतील.

Cross references

उत्पत्ति 22:18

पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्र तुझ्या वंशजाद्वारे आशीर्वाद पावेल; तू माझ्या सर्व आज्ञा पाळल्यास म्हणून मी हे करीन.”

अनुवाद 28:62

आकाशातील ताऱ्यांइतके तुम्ही संख्येने विपुल असलात तरी तुमचा देव परमेश्वर ह्याचे न ऐकल्यामुळे त्यापैकी फारच थोडे शिल्लक राहाल.

एज्रा 9:2

इस्राएल लोकांनी या इतर लोकांशी विवाहसंबंध ठेवले आहेत. इस्राएल लोकांनी आपले वेगळेपण टिकवले पाहिजे. पण त्यांचे यहुदी नसलेल्या लोकांचे नेते आणि आधिकारी यांनीच या बाबतीत वाईट उदारहण घालून दिले आहे.”

एज्रा 9:8

पण आता तू अखेर आमच्यावर दया केली आहेस. बंदिवासातून सुटका करुन तू आमच्यापैकी काही जणांना या पवित्रस्थानी पारतून येऊ दिलेस. आम्हाला दास्यमुक्त करुन तू आम्हाला जीवदान दिलेस.

ईयोब 14:7

“वृक्षाला तोडून टाकले तरी त्याच्याबाबतीत आशा असते. ते पुन्हा वाढू शकते त्याला नवीन फांद्या फुटतच राहतात.

यशया 1:9

सर्व शक्तिमान परमेश्वराने काही लोकांना जिवंत ठेवले नसते तर सदोम अथवा गमोरा ह्या शहरांप्रमाणे आपला संपूर्ण नाश झाला असता.

यशया 4:3

त्यावेळी सीयोन व यरूशलेम येथे जे लोक राहत असतील त्यांना पवित्र मानले जाईल. देवाची कृपा झाल्याने त्यांची नावे खास यादीत समाविष्ट केली गेली आहेत. त्या सर्व लोकांच्या बाबतीत हे घडेल. त्या सर्व यादीतील लोकांना जिवंत राहण्याची संमत्ती दिली जाईल.

यशया 10:20

त्यावेळी याकोबचे जे वंशज इस्राएलमध्ये राहत असतील ते त्यांना मारणाऱ्या माणसावर अवलंबून राहणे सोडतील आणि इस्राएलच्या पवित्र परमेश्वरावर मनापासून श्रध्दा ठेवायला शिकतील.

यशया 10:22

समुद्रकाठच्या वाळूच्या कणांप्रमाणे तुझे लोक खूप असले तरी त्यातील फक्त थोडेच परमेश्वराकडे परत येतील. ते देवाकडे वळतील पण त्यापूर्वी देशाचा नाश केला जाईल. देवाने घोषित केले आहे की तो देश उध्वस्त करणार आहे. नंतर चांगुलपणा देशात येईल. तो दुथडीभरून वाहाणाऱ्या नदीसारखा असेल.

यशया 65:8

परमेश्वर म्हणतो, “द्राक्षांत जेव्हा नवा रस भरतो, तेव्हा लोक तो पिळून काढून घेतात, पण ते द्राक्षांचा संपूर्ण नाश करीत नाहीत. कारण ती द्राक्षे अजून उपयोगात येऊ शकतात. मी माझ्या सेवकांच्या बाबतीत असेच करीन. मी त्यांना संपूर्णपणे नष्ट करणार नाही.

यहेज्केल 6:8

देव म्हणाला, “तुमच्यातील काही लोकांना मी निसटू देईन. ते दुसऱ्या देशांत थोड्या काळाकरिता राहतील. मी त्यांना विखरुन टाकीन आणि दुसऱ्या देशांत राहायला भाग पाडीन.

मीखा 5:6

ते आपल्या तलवारीच्या बळावर अश्शूरींवर सत्ता गाजवतील. निम्रोदच्या भूमीवर, हातात तलवार घेऊन, राज्य करतील. ते लोकांवर राज्य करण्यासाठी आपल्या तलवारीचा उपयोग करतील. पण इस्राएलचा राज्याकर्ता, अश्शूरीपासून आपल्याला वाचवील. ते लोक आमच्या देशात येतील व आमचे भव्य वाडे पायदळी तुडवतील.

सफन्या 3:12

माझ्या नगरीत (यरुशलेममध्ये) मी फक्त नम्र व लीन लोकांनाच राहू देईन. ते परमेश्वराच्या नावावर श्रध्दा ठेवतील.

जखऱ्या 13:8

त्या प्रदेशातील 2 3 लोक जखमी होऊन मरतील. पण 1 3 वाचतील

मलाखी 2:15

पती-पत्नींनी शरीरांनी व मनांनी एक व्हावे अशी देवाची इच्छा आहे. का? मग त्यांची मुलेही पवित्र होतील. म्हणून आध्यात्मिक ऐक्याचे रक्षण करा. तुमच्या पत्नीला फसवू नका. तुमच्या तारुण्यापासून ती तुमची अधार्गांगिती आहे.

मत्तय 24:22

आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीच वाचले नसते. परंतु त्याच्या निवडलेल्यांमुळे तो ते दिवस थोडे करील.

मार्क 13:20

देवाने जर ते दिवस कमी केले नसते तर कोणीही वाचला नसता. परंतु ज्यांना त्याने निवडले आहे अशा निवडलेल्या लोकांसाठी ते दिवस त्याने कमी केले आहेत.

योहान 15:1

मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे.

रोमकरांस 9:5

त्यांचे पूर्वज थोर आहेत. मानवी दृष्टीने सांगताना ख्रिस्त त्यांच्यापासून आला, जो सदासर्वकाळ सर्व लोकांवर धन्यवादित देव आहे. आमेन.

रोमकरांस 11:5

त्याच प्रमाणे हल्ली देवाच्या कृपेच्या निवडीप्रमाणे काही शिल्लक राहिले आहेत.

रोमकरांस 11:16

जर प्रथम भाग पवित्र आहे, तर संपूर्ण पिठाचा गोळा पवित्र आहे. जर झाडाचे मूळ पवित्र आहे तर फांद्यासुद्धा पवित्र आहेत.

गलतीकरांस 3:16

अब्राहामाला व त्याच्या वंशजांना अभिवचने दिलेली होती. लक्षातघ्या की, ते “आणि त्याच्या वंशजांना” असे अनेकजणांसांबंधी म्हणत नाही, तर जसे काय ते एका व्यक्तीला म्हणते,“आणि तुइया संतानाला” (आणि तो वंशज) ख्रिस्त आहे.

गलतीकरांस 3:28

तेथे यहूदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र, पुरुष किंवा स्त्री हा भेदच नाही. कारण तुम्ही सर्वख्रिस्त येशूमध्ये एक आहात.

Interlinear

Choose Theme