Home Bibles यशया 44:6 · मराठी बायबल
यशया 44:6 · मराठी बायबल

परमेश्वर इस्राएलचा राजा आहे सर्वशक्तिमान परमेश्वर इस्राएलला वाचवितो. परमेश्वर म्हणतो, “मीच फक्त देव आहे. दुसरे कोणीही देव नाहीत. मीच आरंभ आहे आणि मीच अंत आहे.

Cross references

अनुवाद 4:35

परमेश्वर हाच खरा देव आहे हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने तुम्हाला हे दाखवले. त्याच्यासारखा दुसरा देव नाही.

अनुवाद 4:39

तेव्हा, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वर हाच देव आहे, दुसरा कोणीही नाही. हे आज तुम्ही नीट समजून घ्या व लक्षात ठेवा.

अनुवाद 6:4

“हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे.

अनुवाद 32:39

“तेव्हा आता पाहा, मीच खरा आणि एकमेव देव आहे. अन्य कोणी नाही. लोकांचा तारक मी आणि मारकही मीच, त्यांना घायाळ करणारा मी आणि त्यातून बरे करणाराही मीच. माझ्या समर्थ हातांमधून कोणीही कोणालाही सोडवू शकत नाही!

यशया 37:16

सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, करूब देवदूतांचा राजा म्हणून तू सिंहासनी बसतोस. देवा, तुझी आणि तुझीच सत्ता पृथ्वीवरील सर्व राज्यांवर चालते. तूच स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केलीस.

यशया 37:20

पण तू परमेश्वर आमचा देव आहेस म्हणून अश्शूरच्या राजाच्या बळापासून आम्हाला वाचव. म्हणजे सर्व देशांना कळेल की परमेश्वरच फक्त खरा देव आहेस.

यशया 40:18

देवाची तुलना तुम्ही कशाशी करू शकता का? नाही. तुम्ही देवाचे चित्र काढू शकता का? नाही.

यशया 41:4

ह्या गोष्टी कोणी घडवून आणल्या? हे कोणी केले? सुरवातीपासून लोकांना कोणी बोलाविले? मी, परमेश्वराने, या गोष्टी केल्या आरंभापासून मी म्हणजे परमेश्वर आहे, आरंभापूर्वीही मी येथे होतो आणि सर्व संपल्यावर मीच येथे असेन.

यशया 41:14

बहुमोल यहुदा, घाबरू नकोस. इस्राएलमधील माझ्या लाडक्या लोकांनो, भिऊ नका. मी खरोखरच तुम्हाला मदत करीन.” परमेश्वराने स्वत:च ह्या गोष्टी सांगितल्या. जो तुम्हाला वाचवितो तोच इस्राएलचा पवित्र देव हे बोलला.

यशया 41:21

परमेश्वर, याकोबचा राजा म्हणतो, “या आणि तुमचे काय मुद्दे आहेत ते मला सांगा तुमचे त्याबद्दलचे पुरावे मला दाखवा आणि मग आपण काय बरोबर आहे ते ठरवू.

यशया 42:8

“मी परमेश्वर आहे माझे नाव यहोवा, मी माझे गौरव दुसऱ्यांना देणार नाही. माझ्याकरिता असलेली स्तुती मी मूर्तीच्या (खोट्या देवांच्या) वाट्याला येऊ देणार नाही.

यशया 43:1

याकोब, परमेश्वराने तुला जन्म दिला. इस्राएल, परमेश्वराने तुला निर्मिले. आता देव म्हणतो, “भिऊ नकोस मी तुझे रक्षण करीन. मी तुला निवडले आहे. तू माझा आहेस.

यशया 43:9

सर्व लोकांनी आणि सर्व राष्ट्रांनीसुध्दा एकत्र जमावे. त्यांच्यातील एखादा खोटा देव, आरंभी काय घडले याबद्दल कदाचित सांगू इच्छित असेल, त्यांनी आपल्याबरोबर साक्षीदार आणावेत. साक्षीदारांनी सत्य सांगावे त्यावरून ते बरोबर आहेत हे सिध्द होईल.”

यशया 43:10

परमेश्वर म्हणतो, “तुम्ही लोक माझे साक्षीदार आहात. मी निवडलेले तुम्ही लोक माझे सेवक आहात माझ्यावर विश्वास ठेवायला लोकांना तुम्ही मदत करावी म्हणून मी तुम्हाला निवडले आहे. ‘मीच तो आहे,’ मीच खरा देव आहे. हे तुम्हाला कळावे म्हणून मी तुमची निवड केली. माझ्याआधी कोणी देव नव्हता आणि माझ्यानंतर कोणी देव नसेल.

यशया 43:14

परमेश्वर, इस्राएलचा पवित्र देव तुमचे रक्षण करतो. देव म्हणतो, “मी तुझ्यासाठी बाबेलला सैन्य पाठवीन. खूप लोकांना बंदी केले जाईल. त्या खास्दी (खाल्डियन) लोकांना त्यांच्याच नावांतून दूर नेले जाईल. (खास्दयांना (खाल्डियन लोकांना) त्यांच्या नावांचा फार गर्व आहे.)

यशया 44:8

घाबरू नका. काळजी करू नका. मी काय घडणार हे नेहमीच तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही लोक माझे साक्षीदार आहात. दुसरा कोणीही देव नाही. मीच एकमेव देव आहे. दुसरा कोणीही ‘खडक’ नाही. मला माहीत आहे की मी एकमेव आहे.”

यशया 44:24

तू आता आहेस तसा तुला परमेश्वराने बनविले. तू आईच्या गर्भात असताना परमेश्वराने हे केले. परमेश्वर म्हणतो, “मी, परमेश्वराने प्रत्येक गोष्ट निर्माण केली. मी स्वत: आकाश तेथे ठेवले आणि माझ्यासमोर जमीन पसरली.”

यशया 45:5

मी परमेश्वर आहे मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही देव नाही. मी तुला वस्त्रे घातली, पण तरीही तू मला ओळखत नाहीस.

यशया 45:21

त्या लोकांना माझ्याकडे यायला सांगा. ह्या सर्व गोष्टींबद्दल त्यांना एकत्रितपणे बोलू द्या.)“पुष्कळ वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला कोणी सांगितले? फार पूर्वीपासून तुम्हाला या गोष्टी कोण सांगत आले आहे? मी, देवाने, एकमेव परमेश्वराने, तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. मीच फक्त देव आहे. माझ्यासारखा आणखी दुसरा कोणी आहे का? चांगला दुसरा देव आहे का? दुसरा कोणी देव त्याच्या लोकांना वाचवितो का? नाही कोणीही दुसरा देव नाही.

यशया 48:12

“याकोबा, माझे ऐक, इस्राएल, मी तुला माझे होण्यासाठी बोलाविले, तेव्हा माझे ऐक. मीच आरंभ आहे आणि मीच अंत आहे.

यशया 48:17

मी परमेश्वर तुमचा तारणारा, इस्राएलचा पवित्र देव म्हणतो,“मीच परमेश्वर तुमचा देव आहे. मी तुम्हाला सत्कृत्ये करायला शिकवितो. तुम्ही कोणत्या मार्गाने जावे ह्याचे मी मार्गदर्शन करतो.

यशया 54:5

कारण तुझा पती हा तुझा निर्माता म्हणजेच देव आहे. त्याचे नाव सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. इस्राएलला वाचविणारा एक तोच आहे तो इस्राएलचा पवित्र देव आहे. आणि त्याला सर्व पृथ्वीचा पवित्र देव म्हटले जाईल.

यशया 59:20

मग तारणारा सियोनला येईल आधी पाप केलेल्या पण नंतर देवाला शरण आलेल्या याकोबच्या लोकांकडे तो येईल.

यिर्मया 10:1

इस्राएलच्या वंशजांनो, परमेश्वर तुमच्याविषयी काय म्हणतो ते ऐका.

यिर्मया 50:34

पण परमेश्वर त्या लोकांना परत आणेल. त्याचे नाव आहे ‘सर्वशक्तिमान परमेश्वर देव’ तो समर्थपणे त्या लोकांचे रक्षण करील. त्यामुळे त्या देशाला विश्रांती मिळू शकेल. पण बाबेलच्या लोकांना विश्रांती मिळणार नाही.”

मलाखी 1:14

काहीजणांजवळ चांगले नर जातीचे पशू आहेत. ते, ते पशू मला यज्ञबली म्हणून अर्पण करु शकतील पण ते तसे करीत नाहीत. काही लोक चांगली जनावरे आणतात. ती मला अर्पण करण्याचे वचनही देतात पण गुपचूप आजारी जनावरांबरोबर त्यांची आदलाबदल करतात, आणि मला रोगी जनावरे अर्पण करतात. अशा लोकांचे वाईट होईल. मी महान राजा आहे. तुम्ही मला मान द्यावा. सर्व जगातील लोक मला मानतात.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

मत्तय 25:34

“मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे आशीर्वादित आहात! जे तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तयार केले आहे.

मत्तय 27:37

येशूच्या डोक्याच्या वरच्या बाजूला त्याच्यावर ठेवण्यात आलेला दोषारोप लिहिलेला लेख शिपायांनी लावला. त्यावर मजकूर होता, “येशू - यहूद्यांचा राजा.”

1 तीमथ्याला 3:16

आणि आपल्या सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे.तो मानवी शरीरात दिसला; आत्म्याने तो नीतिमान ठरविला गेला, देवतूतांनी त्याला पाहीले होते; राष्ट्रांमध्ये तो गाजविला गेला. जगाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि स्वर्गामध्ये तो गौरवाने घेतला गेला.

प्रकटीकरण 1:8

प्रभु देव म्हणातो, “मी अल्फा आणि ओमेगाआहे. मी जो आहे, जो होतो आणि जो येत आहे. मी सर्वसमर्थ आहे.”

प्रकटीकरण 1:11

तो आवाज म्हणाला, “तू या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू पुस्तकात लिही,आणि सात मंडळ्यांना पाठव: इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया आणि लावदिकीया.”

प्रकटीकरण 1:17

जेव्हा मी त्याला पाहिले, तेव्हा मी मेलेल्या माणसा सारखा त्याच्या पायजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माइयावरठेवला आणि म्हणाला, “घाबरु नको! मी पहिला आणि शेवटला आहे. मी जिवंत आहे,

प्रकटीकरण 2:8

“स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही: “जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मेला होता पणपुन्हा जीवनात आला.

प्रकटीकरण 22:13

मी अल्फा व ओमेगा, पहिला व अखेरचा, आरंभ आणि शेवट आहे.

Interlinear

Choose Theme