Home Bibles यशया 45:21 · मराठी बायबल
यशया 45:21 · मराठी बायबल

त्या लोकांना माझ्याकडे यायला सांगा. ह्या सर्व गोष्टींबद्दल त्यांना एकत्रितपणे बोलू द्या.)“पुष्कळ वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला कोणी सांगितले? फार पूर्वीपासून तुम्हाला या गोष्टी कोण सांगत आले आहे? मी, देवाने, एकमेव परमेश्वराने, तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. मीच फक्त देव आहे. माझ्यासारखा आणखी दुसरा कोणी आहे का? चांगला दुसरा देव आहे का? दुसरा कोणी देव त्याच्या लोकांना वाचवितो का? नाही कोणीही दुसरा देव नाही.

Cross references

स्तोत्रसंहिता 26:7

परमेश्वरा, मी तुझे स्तुतीपर गाणे गातो तू ज्या ज्या आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहे सत्यांची गाणी मी गातो.

स्तोत्रसंहिता 71:17

देवा, तू मला मी लहान मुलगा होतो तेव्हापासून शिकवीत आहेस आणि आजच्या दिवसापर्यंत मी लोकांना तू करीत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगितले.

स्तोत्रसंहिता 96:10

सगळ्या राष्ट्रांना सांगा की परमेश्वर राजा आहे म्हणून जगाचा नाश होणार नाही. परमेश्वर लोकांवर न्यायाने राज्य करेल.

यशया 41:1

परमेश्वर म्हणतो, “दूरवरच्या देशांनो, शांत व्हा आणि माझ्याकडे या. राष्ट्रांनो, शूर व्हा, येऊन माझ्याशी बोला. आपण एकत्र जमून कोणाचे बरोबर आहे ते ठरवू.

यशया 41:22

तुमच्या मूर्तीनी (खोट्या देवांनी) यावे व काय घडत आहे ते सांगावे.“सुरवातीला काय झाले? भविष्यात काय घडणार आहे? ते आम्हाला सांगा. आम्ही लक्षपूर्वक ऐकू. मग नंतर काय घडणार आहे ते आम्हाला कळेल.

यशया 41:26

हे सर्व घडण्यापूर्वी आम्हाला कोणी सांगितले? त्याला आम्ही देव म्हणावे, तुमच्या कोणात्या मूर्तीने हे सांगितले का? नाही. त्या मूर्तीपैकी कोणीही आम्हाला काहीही सांगितले नाही. त्या मूर्ती एक शब्दसुध्दा बोलत नाहीत. आणि आपण बोललेले ते खोटे देव ऐकू शकत नाहीत.

यशया 43:3

का? कारण मी स्वत: तुझा परमेश्वर आहे. मी, इस्राएलचा पवित्र देव तुझा तारणहार आहे. मी तुझ्या मोबदल्यात मिसर देश दिला. तुला माझा करण्यासाठी मी इथिओपिआ व सेबा यांचे दान केले.

यशया 43:9

सर्व लोकांनी आणि सर्व राष्ट्रांनीसुध्दा एकत्र जमावे. त्यांच्यातील एखादा खोटा देव, आरंभी काय घडले याबद्दल कदाचित सांगू इच्छित असेल, त्यांनी आपल्याबरोबर साक्षीदार आणावेत. साक्षीदारांनी सत्य सांगावे त्यावरून ते बरोबर आहेत हे सिध्द होईल.”

यशया 43:11

मी स्वत:च परमेश्वर आहे मी एकमेव आहे. दुसरा कोणीही तारणकर्ता नाही. मीच एकटा आहे.

यशया 44:7

माझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. जर असा कोणी असेल, तर त्याने आता बोलावे. त्याने यावे व तो माझ्यासारखा आहे हे सिध्द करावे. मी ह्या लोकांनी निर्माण केल्यापासून जे घडले आणि जे अनंत काळ घडत राहील ते काय ते त्याने मला सांगावे. भविष्यात काय घडणार आहे हे त्याला माहीत असल्याचे त्याने काही खुणेने पटवून द्यावे.

यशया 45:5

मी परमेश्वर आहे मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही देव नाही. मी तुला वस्त्रे घातली, पण तरीही तू मला ओळखत नाहीस.

यशया 45:14

परमेश्वर म्हणतो, “मिसर आणि इथिओपिआ श्रीमंत आहेत. पण इस्राएल, तुला ती संपत्ती मिळेल. सेबाचे उंच लोक तुझ्या मालकीचे होतील. ते गळ्यात साखळ्या अडकविलेल्या अवस्थेत तुझ्यामागून चालतील (म्हणजेच ते तुझे गुलाम होतील) ते तुझ्यापुढे वाकतील आणि तुझी विनवणी करतील.” इस्राएल, देव तुझ्या बरोबर आहे दुसरा कोणीही देव नाही.

यशया 45:18

परमेश्वरच फक्त देव आहे. त्यानेच आकाश व पृथ्वी निर्मिली. परमेश्वराने पृथ्वीला तिच्या जागी ठेवले. परमेश्वराने पृथ्वी निर्मिली तेव्हा त्याला ती रिकाती नको होती. ती पुढे जगावी म्हणून त्याने ती निर्मिली. तिच्यावर राहता यावे म्हणून त्याने ती निर्माण केली “मीच परमेश्वर आहे दुसरा कोणीही देव नाही.

यशया 45:25

परमेश्वर, इस्राएलच्या लोकांना सत्कृत्य करायला मदत करील, व लोक त्यांच्या देवाबद्दल अभिमान बाळगतील.

यशया 46:9

पूर्वी घडलेल्या गोष्टी आठवा. मी देव आहे हे लक्षात ठेवा. दुसरा कोणताच देव नाही. ते खोटे देव माझ्यासारखे नाहीत.

यशया 48:3

“मी तुम्हाला फार पूर्वीच भविष्यात घडणाऱ्या गोष्टीबद्दल सांगितले. मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगितले आणि अचानक त्या गोष्टी घडवून आणल्या

यशया 48:14

“तुम्ही सगळे इकडे या आणि माझे ऐका. कोणत्याही खोट्या देवाने असे कसे होईल म्हणून तुम्हाला सांगितले का? नाही.” देव इस्राएलवर प्रेम करतो बाबेलबाबत आणि खास्द्यांबाबत देव त्याला पाहिजे ते करील.

यशया 63:1

अदोमाहून हा कोण येत आहे? तो बस्राहून येतो. त्याची वस्त्रे लालभडक आहेत. तो त्या वस्त्रांत अत्यंत सुंदर दिसत आहे. तो त्याच्या सामर्थ्यामुळे ताठ मानेने चालत आहे. तो म्हणतो, “माझ्याजवळ तुम्हाला वाचवायचे सामर्थ्य आहे आणि मी सत्य बोलतो”

यिर्मया 23:5

हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी चांगला अंकुर निर्माण करण्याची वेळ येत आहे.” तो चांगला अंकुर सुज्ञपणे राज्य करणारा राजा असेल. देशात योग्य व न्याय्य गोष्टी तो करेल.

यिर्मया 50:2

“सर्व राष्ट्रांत घोषणा कर! झेंडा उंच उभारुन संदेश दे. माझा सगळा संदेश दे आणि सांग ‘बाबेल काबीज केला जाईल. बेल दैवताची फजिती होईल. मरदोख घाबरुन जाईल. बाबेलच्या मूर्तींची विटंबना केली जाईल. त्या भयभीत होतील.’

योएल 3:9

राष्ट्रा-राष्ट्रामध्ये घोषणा करा: युध्दाला सज्ज व्हा. बलवान माणसांना उठवा. सर्व योध्दे जवळ येऊ देत त्यांना उठू द्या.

सफन्या 3:5

पण देव अजूनही त्या नगरीत आहे. आणि तो नेहमीच चांगला वागतो. देव कोणाचाही कधीच अपराध करीत नाही. तो त्याच्या लोकांना नेहमीच मदत करीत राहतो. योग्य निर्णय घेण्यास तो लोकांना रोजय मदत करतो. पण वाईट लोकांना त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींची लाज वाटत नाही.

सफन्या 3:17

परमेश्वर तुझा देव, तुमच्याबरोबर आहे. तो बलवान वीराप्रमाणे आहे. तो तुला वाचवील. तो तुझ्यावर किती प्रेम करतो, हे तो तुला दाखवून देईल. तुझ्याबरोबर तो किती सुखी आहे, हेही तुला दिसेल.

जखऱ्या 9:9

सियोन, आनंदोत्सव कर! यरुशलेमवासीयांनो, आनंदाने जल्लोश करा! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे येत आहे. तो विजयी व चांगला राजा आहे. पण तो विनम्र आहे. एका गाढवीच्या शिंगरावर, तो स्वार झाला आहे.

रोमकरांस 3:25

लोकांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून ख्रिस्ताचे रक्त सांडून देवाने त्याला जाहीरपणे पुढे केले. देवाने हे यासाठी सिद्ध केले की तो नीतिमात आहे हे सिद्ध व्हावे.

तीताला 2:13

आणि आपली धन्य आशा म्हणजे आपला महान देव व आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्या गौरवी प्रकट होण्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहावी.

Interlinear

Choose Theme