इस्राएलला दूर पाठवून परमेश्वर हा वाद निकालात काढील. परमेश्वर इस्राएलची निर्भत्सना करील. वाळवंटातील गरम वाऱ्याप्रमाणे त्याचे शब्द जळजळीत असतील.
Cross references
तेव्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला. ते म्हणाले, “परमेश्वरा, आम्ही दुष्कृत्य केले आहे. देवाला सोडून आम्ही बआल या भलत्या दैवताची उपासना केली आहे.”
देव माझ्याविरुध्द त्याच्या सामर्थ्याचा उपयोग करेल का? नाही. तो मी काय म्हणतो ते ऐकेल.
परमेश्वरा, रागाने मला सुधारु नकोस. रागावू नकोस आणि मला शिक्षा करु नकोस.
परमेश्वरा, तू माझ्यावर टीका करतोस तेव्हा रागावू नकोस तू मला वळण लावतोस तेव्हा क्रोधित होऊ नकोस.
तू जेव्हा दुष्टांना शिक्षा करतोस, तेव्हा देवा लोक तुला मान देतात. तू तुझा क्रोध दाखवतोस आणि वाचलेले लोक शक्तिमान होतात.
परंतु देव दयाळू होता. देवाने त्यांना त्यांच्या पापांबद्दल क्षमा केली आणि त्याने त्यांचा नाश केला नाही. देवाने अनेक वेळा स्व:तचा राग आवरला. त्याने स्व:तला खूप राग येऊ दिला नाही.
परमेश्वर नेहमीच टीका करीत नाही. परमेश्वर आमच्यावर सदैव रागावलेला राहात नाही.
देवाला आमच्याबद्दल सारे काही माहीत असते. आम्ही धुळीपासून निर्माण झालो आहोत हे देवाला माहीत आहे.
देव म्हणतो, “मला तुम्हाला सतत शिक्षा का करावी लागावी? मी तुम्हाला शिक्षा केली तरी तुम्ही सुधारत नाही. तुम्ही माझ्याविरूध्द बंड करीतच राहता. सध्या प्रत्येकाचे डोके व हृदय कमकुवत झाले आहे.
परमेश्वर म्हणातो, “या, आपण या गोष्टींची चर्चा करू या. तुमची पातके कितीही काळीकुट्ट (शब्दश: शेंदरासारखी लाल) असली तरी ती धुता येतील आणि तुम्ही हिमाप्रमाणे पांढरेशुभ्र व्हाल. जरी तुमची पापे लाल असली तरी तुम्ही शुभ्र लोकरीसारखे व्हाल.
म्हणून देव म्हणाला, “यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनो व यहूदात राहणाऱ्या लोकांनो, माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा जरा विचार करा.
देव म्हणेल, “मी अश्शूरचा उपयोग छडीप्रमाणे करीन. रागाच्या भरात मी अश्शूरकडून इस्राएलला शिक्षा करीन.
सीयोनचा डोंगर व यरूशलेम यांच्याबाबतीत योजलेल्या गोष्टी माझा परमेश्वर पार पाडील. नंतर तो अश्शूरला शिक्षा करील. अश्शूरचा राजा फार गर्विष्ठ आहे. त्याच्या अहंकारामुळे त्याने अनेक दुष्कृत्ये केली आहेत. म्हणून परमेश्वर त्याला शिक्षा करील.
परमेश्वर म्हणतो, “इस्राएलच्या लोकांनो, मी, तुमची आई यरूशलेमला, घटस्फोट दिला असे तुम्ही म्हणता. पण मी तिला घटस्फोट दिला हे सिध्द करणारे कायदेशीर कागदपत्रे आहेत का? माझ्या मुलांनो, मी कोणाचे पैसे देणे लागतो का? कर्ज फेडण्यासाठी मी तुम्हांला विकले का? नाही. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांमुळे मी तुम्हाला देऊन टाकले. तुमच्या आईने केलेल्या पापांमुळे मी तिला दूर केले.
देव म्हणतो, “मी तुला सोडले ते थोड्या वेळापुरतेच. मी तुला माझ्यात सामावून घेईन आणि तुझ्यावर कृपा करीन.
मी अखंड लढाई करीत राहणार नाही. मी नेहमी रागावणार नाही. मी सतत रागावलो तर माणसाचा आत्मा मीत्याला दिलेले जीवन - माझ्यासमोर मरून जाईल.
जे लोक सत्कृत्यात आनंद मानतात, त्यांच्याबरोबर तू असतोस. ते लोक तुझ्या चालीरीतींची आठवण ठेवतात. पण देवा, पूर्वी आम्ही तुझ्याविरूध्द जाऊन पाप केले म्हणून तू आमच्यावर रागावलास. आता, आमचे रक्षण कसे होणार?
तुमच्याच चुकीने हे संकट आले आहे. परमेश्वर तुमचा देव तुम्हाला योग्य मार्गाने नेत होता. पण तुम्हीच उलटे फिरलात.
त्या वेळेला यहुदा व यरुशलेम येथील लोकांना एक संदेश दिला जाईल. “उजाड टेकड्यावरुन गरम वारा वाहतो. तो वाळवंटातून माझ्या लोकांकडे वाहत येतो. फोलकटापासून धान्य वेगळे करण्याकरिता शेतकरी ज्या वाऱ्याचा उपयोग करतात, तसा हा सौम्य वारा नाही.”
परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: “संपूर्ण देशाचा नाश होईल. (पण मी देशाचा संपूर्ण नाश करणार नाही.)
परमेश्वरा, आम्हाला सुधार!पण न्याय्य रीतीने सुधार! रागाच्या भरात आम्हांला शिक्षा करु नकोस. नाही तर तू कदाचित् आमचा नाश करशील.
इस्राएलच्या व यहूदाच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी तुमचे रक्षण करीन. मी तुम्हाला त्या राष्ट्रांमध्ये पाठविले. पण त्या सर्व राष्ट्रांचा मी नाश करीन. खरंच! मी त्या राष्ट्रांचा नाश करीन. पण मी तुमचा नाश करणार नाही. तुम्ही केलेल्या पापांची शिक्षा तुम्हाला झालीच पाहिजे. पण मी न्याय्यबुद्धीने तुम्हाला शिक्षा करीन.”
परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “याकोब, माझ्या सेवका घाबरु नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे मी तुला खूप निरनिराळ्या ठिकाणी पाठविले पण मी तुझा संपूर्ण नाश करणार नाही. इतर राष्ट्रांचा मात्र मी नाश करीन. तुझ्या दुष्कृत्यांबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून तुझ्या शिक्षेतून मी तुला सूट देणार नाही. मी तुला शिस्त लावीन हे खरे! पण ती न्याय्यपणाने लावीन.”
परमेश्वर लोकांकडे कायमची पाठ फिरवित नाही, हे माणसाने लक्षात ठेवावे.
परमेश्वर जेव्हा शिक्षा करतो, तेव्हा तो दया पण दाखवितो. हा त्याचा दयाळूपणा त्याच्या जवळील महान प्रेम व थोर करुणा ह्यामुळे आहे.
तो वेल उंचच उंच वाढली. तिला खूप फांद्या फुटून ती ढगांपर्यंत पोहोचली.
इस्राएलच्या लोकांनो, परमेश्वराचा संदेश ऐका! ह्या देशात राहणाव्या लोकांविरुध्द परमेश्वर आपले म्हणणे मांडणार आहे. “ह्या देशातील लोकांना परमेश्वराची खरीखुरी ओळख नाही. ते सत्याने वागत नाहीत आणि परमेश्वराशी एकनिष्ठ नाहीत.
“चला! आपण परमेश्वराकडे परत जाऊ या! त्याने आपल्याला दुखविले, पण तोच आपल्याला बरे करील. त्याने आपल्याला जखमी केले, पण तोच त्यावर मलमपट्टी करील.
“मी परत यावे अशी माझ्या लोकांची अपेक्षा आहे. वरच्या परमेश्वराला ते बोलवतील पण देव त्यांना मदत करणार नाही.”
इस्राएल त्यांच्या भावांत वाढतो आहे. पण पूर्वेकडून जोराचा वारा येईल. परमेश्वराचा वारा वाळवंटाकडून वाहील. मग इस्राएलची विहीर आटून जाईल. त्याचा झरा कोरडा पडेल. वारा इस्राएलच्या खजिन्यातील प्रत्येक मौल्यवान वस्तू काढून घेईल.
परमेश्वराची त्याच्या लोकांविरुध्द तक्रार आहे. पर्वतांनो, परमेश्वराची तक्रार ऐका! पृथ्वीचे पाये असलेल्यांनो, परमेश्वराचे ऐका! इस्राएल चूक आहे, हे तो सिध्द करुन दाखवील.
जे मनुष्याला सामान्य नाही अशा कोणत्याही मोहाने तुम्हाला पकडले नाही. परंतु देव विश्वासनीय आहे. तुम्हांला सहन करता येते त्यापलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. परंतु त्या मोहाबरोबर, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील. म्हणजे तुम्हांला सहन करणे शक्य होईल.
वेगवेगळ्या प्रकारच्या पिडांनी काही काळापर्यंत तुम्ही दु:खी होणे जरी जरुरीचे असले, तरी यामुळे आनंद करीत आहा.