Home Bibles स्तोत्रसंहिता 78:38 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 78:38 · मराठी बायबल

परंतु देव दयाळू होता. देवाने त्यांना त्यांच्या पापांबद्दल क्षमा केली आणि त्याने त्यांचा नाश केला नाही. देवाने अनेक वेळा स्व:तचा राग आवरला. त्याने स्व:तला खूप राग येऊ दिला नाही.

Cross references

निर्गम 34:6

परमेश्वर मोशेपुढून गेला व म्हणाला, “मी याव्हे म्हणजे प्रभु आहे; मी दयाळू, कनवाळू, मंदक्रोध (लवकर राग न येणारा,) महान प्रेमाने पुरेपूर भरलेला व विश्वास ठेवण्यास पात्र असा देव आहे.

गणना 14:18

तू म्हणालास, ‘परमेश्वराला रागवायला वेळ लागतो. तो महान प्रीतिने भरलेला आहे. परमेश्वर अपराधांची व अधर्माची क्षमा करतोपण जे लोक अपराधी आहेत त्यांना परमेश्वर नेहमी शिक्षा करतो. त्यांच्या मुलांना व नातवंडांना शिक्षा करतो आणि पंतवंडाना देखील त्या वाईट गोष्टीबद्दल शिक्षा करतो.’

गणना 16:44

परमेश्वर मोशेला म्हणाला,

2 शमुवेल 24:16

यरुशलेमच्या संहारासाठी देवदूताचा हात उंचावला पण झाल्या गोष्टीबद्दल परमेश्वराला फार वाईट वाटले. लोकांचा संहार करणाऱ्या देवदूताला परमेश्वर म्हणाला, “आता पुरे तुझा हात खाली घे.” तेव्हा हा देवदूत अरवना यबूसी याच्या खळ्याजवळ होता.

2 राजे 13:23

पण परमेश्वरालाच इस्राएलची दया आली. इस्राएलवर त्याने आपली कृपादृष्टी वळवली. अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याशी त्याने केलेल्या करारामुळे त्याने हे केले. परमेश्वराला इस्राएल लोकांचा समूळ नाश करायचा नव्हता. त्याला त्यांना अद्याप टाकून द्यायचे नव्हते.

2 राजे 21:20

आपले वडील मनश्शे यांच्याप्रमाणेच आमोननेही परमेश्वराच्या दृष्टीने गैर कृत्ये केली.

स्तोत्रसंहिता 99:8

परमेश्वरा, देवा, तू त्यांच्या प्रार्थनेला उत्तर दिलेस, तू त्यांना दाखवलेस की तू क्षमाशील देव आहेस आणि तू वाईट गोष्टी केल्याबद्दल लोकांना शिक्षा करतोस.

स्तोत्रसंहिता 106:43

देवाने त्याच्या माणसांना खूप वेळा वाचवले. पण ते देवाविरुध्द गेले आणि त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले. देवाच्या माणसांनी खूप वाईट गोष्टी केल्या.

यशया 44:21

“याकोबा, ह्या गोष्टी लक्षात ठेव. इस्राएला, तू माझा सेवक आहेस. हे लक्षात ठेव. मी तुला निर्माण केले. तू माझा सेवक आहेस. म्हणून इस्राएल, तू मला विसरू नकोस.

यशया 48:9

पण मी सहन करीन. हे मी माझ्यासाठी करीन. तुमच्यावर रागावून तुमचा नाश करीत नाही म्हणून लोक माझी स्तुती करतील. मी केलेल्या प्रतीक्षेबद्दल तुम्ही माझे स्तवन कराल.

यहेज्केल 20:8

पण त्यांनी माझ्याकडे पाठ फिरविली व माझे ऐकण्याचे नाकारले, त्यांनी त्यांच्या त्या भयंकर मूर्ती ऐकल्या नाहीत ते मिसरचे घाणेरडे पुतळे त्यांनी मिसरमध्येच टाकून दिले नाहीत. मग माझ्या रागाचा पारा किती चढतो हे त्यांना कळावे म्हणून मी (देवाने) मिसरमध्येच त्यांचा नाश करण्याचा निश्चय केला.

यहेज्केल 20:13

“पण वाळवंटात इस्राएली लोक माझ्याविरुध्द गेले. त्यांनी माझे नियम पाळले नाहीत. माझे नियम पाळायला त्यांनी नकार दिला. खरे म्हणजे, ते नियम अतिशय चांगले होते. एखाद्याने ते पाळले असते तर तो नक्कीच जगला असता! माझ्या सुट्ट्यांच्या विशेष दिवसांकडे त्यांनी त्यांना काही महत्व नसल्याप्रमाणे दुर्लक्ष केले. पुष्कळ वेळा, त्यांनी त्या दिवशी काम केले. म्हणून माझ्या क्रोधाचा पूर्णाविष्कार दाखविण्यासाठी, त्यांचा वाळवंटात नाश करण्याचा मी निश्चय केला.

यहेज्केल 20:17

पण मला त्यांची दया आल्याने मी त्यांचा वाळवंटात संपूर्ण नाश केला नाही.

यहेज्केल 20:21

“पण ती मुले माझ्याविरुध्द गेली. त्यांनी माझे नियम मानले नाहीत. माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत. मी सांगितलेल्या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत. खरे म्हणजे, माझे नियम चांगले आहेत. माणसाने ते पाळल्यास, तो अवश्य जगेल. त्यांनी माझ्या सुट्टयांच्या विशेष दिवसांकडे दुर्लक्ष केले. मग माझा राग किती आहे, हे त्यांना कळावे म्हणून मी वाळवंटात त्यांचा संपूर्ण नाश करण्याचे ठरविले.

होशेय 11:9

मी, माझ्या भयंकर क्रोधाचा, विजय होऊ देणार नाही. मी पुन्हा एफ्राईमचा नाश करणार नाही. मी मानव नसून परमेश्वर आहे. मी तुमच्यामधला एकमेव पवित्र आहे मी तुमच्याबरोबर आहे. मी माझा क्रोध प्रकट करणार नाही.

आमोस 7:3

मग ह्याबाबतीत परमेश्वराचे मन:परिवर्तन झाले परमेश्वर म्हणाला, “ते घडणार नाही.”

आमोस 7:6

मग परमेश्वराचे ह्या गोष्टीबाबत ह्रदयपरिवर्तन झाले. परमेश्वर प्रभू म्हणाला, “हीही घटना घडणार नाही.”

Interlinear

Choose Theme