Home Bibles यशया 27:13 · मराठी बायबल
यशया 27:13 · मराठी बायबल

माझी बरीच माणसे अश्शूरमध्ये गमावली आहेत. माझी काही माणसे मिसरला पळून गेली आहेत. पण त्या वेळी प्रचंड तुतारी फुंकली जाईल आणि ते सर्व लोक यरूशलेमला परत येतील. ते सर्व जण त्या पवित्र डोंगरावरील देवापुढे नमन करतील.

Cross references

लेवीय 25:9

मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चिताचा दिवशी मोठ्या आवाजाचे मेंढ्याचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे;

गणना 10:2

“चांदीचे दोन घडीव कर्णे बनव. लोकांना एकत्र जमविण्यासाठी आणि तळ कधी हलवावा हे सांगण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.

2 राजे 17:6

होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले. इस्राएल लोकांना त्याने कैद करुन अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि मेदीलोकांच्या नगरात ठेवले.

1 इतिहास 15:24

शबन्या, योशाफाट, नथानेल, अमासय, जखऱ्या, बनाया आणि अलियेजर हे याजक करारकोशापुढे चालताना कर्णे वाजवत होते. ओबेद-अदोम आणि यहीया हे करार कोशाचे आणखी दोन रक्षक होते.

स्तोत्रसंहिता 47:5

परमेश्वर बिगुलाच्या आणि तुतारीच्या आवाजात आपल्या सिंहासानाकडे जातो.

स्तोत्रसंहिता 81:3

अमावास्येला एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा. पौर्णिमेला ही एडक्याच्या शिंगाचा कर्णा वाजवा. याचवेळी आपला सण सुरु होतो.

स्तोत्रसंहिता 89:15

देवा, तुझे इमानी भक्त खरोखरच सुखी आहेत. ते तुझ्या दयेच्या प्रकाशात जगतात.

यशया 2:3

पुष्कळ लोक तेथे जातील. ते म्हणतील, “आपण परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ या. आपण याकोबच्या देवाच्या मंदिरात जाऊ या. मग देव, त्याचा जगण्याचा मार्ग आपल्याला दाखवील. आणि आपण त्या मार्गाने जाऊ.”देवाच्या शिकवणुकीची सुरूवात, परमेश्वराच्या संदेशाचा आरंभ यरूशलेममधील सीयोनच्या डोंगरात होईल. व तो सर्व जगात पोहोचेल.

यशया 2:11

गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल आणि ते शरमिंदे होऊन माना खाली घालतील. अशा वेळी फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा असेल.

यशया 11:11

त्या वेळेला माझा प्रभू (देव) मागे राहिलेल्या लोकांपर्यंत पुन्हा पोहोचेल. असे तो दुसऱ्यांदा करील. आणि त्यांना बाहेर आणील. (अश्शूर, उत्तर मिसर, द्रक्षिण मिसर, इथिओपिया, एलाम, बॉबिलॉन, हमाथ आणि पृथ्वीवरील दूरची सर्व राष्ट्रे येथे असलेल्या ह्या त्याच्या लोकांना तो बाहेर आणील.

यशया 11:12

देव “तो ध्वज” सर्व लोकांची निशाणी म्हणून उभारेल. इस्राएल व यहुदा येथील लोकांना बळजबरीने देशाच्या बाहेर घालवून देण्यात आले ते पृथ्वीवरील दूरदूरच्या देशात विखुरले. पण देव त्यांना एकत्र आणील.

यशया 11:16

ह्यामुळे अश्शूरमध्ये मागे राहिलेल्या त्याच्या लोकांना अश्शूर सोडून जाता येईल. हे देवाने मिसरमधून इस्राएली लोकांना बाहेर काढले, त्या वेळे प्रमाणेच असेल.

यशया 16:3

त्या म्हणतात, “आम्हाला मदत करा, आम्ही काय करावे ते सांगा. जशी सावली दुपारच्या उन्हापासून आपले रक्षण करते, तसे शत्रूपासून आमचे रक्षण करा. आम्ही शत्रूला चुकवून पळत आहोत. आम्हाला लपवा. आम्हाला शत्रूच्या ताब्यात देऊ नका.”

यशया 18:3

त्यांना इशारा करा की त्यांचे काहीतरी वाईट होणार आहे. त्या राष्ट्रांचे वाईट होताना जगातील सर्व लोक पाहतील. डोंगरावर फडकणाऱ्या ध्वजाप्रमाणे ही गोष्ट सर्वांना स्वच्छ दिसेल. ह्या उंच लोकांबाबत घडणारी गोष्ट जगातील सर्व लोक रणशिंगाच्या आवाजाप्रमाणे स्पष्टपणे ऐकतील.

यशया 19:21

त्या वेळेला मिसरवासीयांना परमेश्वराची खरी ओळख होईल. ते देवावर प्रेम करतील. ते देवाची उपासना करतील आणि बळी अर्पण करतील. ते परमेश्वराला नवस बोलतील आणि ते फेडतील.

यशया 19:23

त्या वेळी मिसर ते अश्शूर असा महामार्ग असेल. त्यामुळे मिसर व अश्शूर त्यांच्यामधे ये-जा होईल. मिसर अश्शूरच्या बरोबरीने वागेल.

यशया 25:6

त्या वेळेस, सर्वशक्तिमानपरमेश्वर, डोंगरावरील सर्व लोकांना मेजवानी देईल. मेजवानीत उत्कृष्ट अन्नपदार्थ व उंची मद्य असेल. मांस कोवळे व चांगल्या प्रतीचे असेल.

यशया 43:6

मी उत्तरेला म्हणेन : माझे लोक मला परत दे. मी दक्षिणेला सांगेन, माझ्या लोकांना तुरूंगात ठेवू नको. दूरदूरच्या ठिकाणांहून माझ्या मुलांमुलींना माझ्याकडे परत आण.

यशया 56:8

परमेश्वर, माझा प्रभू असे म्हणाला.इस्राएलच्या लोकांना सक्तीने त्यांचा देश सोडावा लागला. पण परमेश्वर पुन्हा त्यांना एकत्र गोळा करील. परमेश्वर म्हणतो, “मी ह्या लोकांना गोळा करून एकत्र करीन.”

यशया 66:18

“ते लोक दुष्ट विचार करतात आणि पापे करतात म्हणून त्यांना शिक्षा करण्यासाठी मी येत आहे मी सर्व राष्ट्रांना व सर्व लोकांना गोळा करीन. सर्व लोक एकत्र येऊन माझे सामर्थ्य पाहतील.

यिर्मया 31:6

अशी एक वेळ येईल की पहारेकरी ओरडून पुढील आदेश देतील. ‘या, आपण परमेश्वर देवाची उपासना करण्यासाठी वर सियोनला जाऊ या.’ एफ्राईम या डोंगराळ प्रदेशातील पहारेकरीसुद्धा ओरडून हा संदेश देतील.”

यिर्मया 43:7

त्या लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही, ते सर्व लोक मिसरला गेले, ते तहपन्हेस येथे गेले.

यिर्मया 44:28

काही लोक तलवारीच्या वारातून निसटतील ते मिसरमधून यहूदाला परत येतील पण असे लोक फारच थोडे असतील. मग वाचलेल्या व मिसरमध्ये राहायला आलेल्या लोकांना कोणाचे शब्द खरे ठरले ते कळेल. ‘माझे शब्द खरे ठरले की त्यांचे’ ते त्यांना समजेल.

होशेय 8:13

इस्राएलींना बळी देणे आवडते. ते मांसाचा नैवेद्य दाखवून ते खातात. परमेश्वर त्यांनी दिलेले बळी स्वीकारीत नाही. त्याला त्यांची पापे स्मरतात. म्हणून तो त्यांना शिक्षा करील. कैदी म्हणून त्यांना मिसरला नेण्यात येईल.

होशेय 9:3

इस्राएली परमेश्वराच्या भूमीत राहणार नाहीत. एफ्राईम मिसरला परत जाईल. अश्शूरमध्ये त्यांना निषिध्द भक्ष्य भक्षण करावे लागेल.

होशेय 11:11

ती मिसरमधून घाबरलेल्या पाखरंाप्रमाणे येतील. मग मी त्यांना घरी परत नेईन.” परमेश्वर असे म्हणाला आहे.

मीखा 7:14

म्हणून तुझ्या दंडाने लोकांवर राज्य कर. तुझ्या मालकीच्या लोकांच्या समुदायावर राज्य कर. तो लोकांचा समुदाय एकटाच रानात आणि कर्मेल पर्वतावर राहतो. पूर्वीप्रमाणेच तो बाशान व गिलाद यांच्यामध्ये रातो.

जखऱ्या 9:13

यहूदा, मी तुझा धनुष्यासारखा उपयोग करीन. एफ्राईमचा उपयोग मी बाणांसारखा करीन. इस्राएल, ग्रीसशी लढण्यासाठी मी तुमचा उपयोग दणकट तलवारीसारखा करीन.

जखऱ्या 10:8

“मी त्यांना शीळ वाजवून एकत्र बोलवीन. मी त्यांना खरोखर वाचवीन. त्यांची संख्या खूप वाढेल.

जखऱ्या 10:10

मी त्यांना मिसरमधून व अश्शूमधून परत आणीन मी त्यांना गिलादच्या भागात आणीन. पण तेथे पुरेशी जागा नसल्याने मी त्यांना लबानोनमध्ये राहू देईन.”

जखऱ्या 14:16

यरुशलेमशी लढण्यास आलेल्यापैकी काही वाचतील. आणि सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करण्यासाठी ते दरवर्षी येतील. मंडपाचा सण साजरा करायला ते यरुशलेमला येतील.

मलाखी 1:11

“सर्वजगातील लोक माझ्या नावाचा मान राखतात. सर्व जगातील लोक मला उत्तम भेटी आणतात. भेट म्हणून उत्तम धूप माझ्यापुढे जाळतात. का? कारण त्या सर्व लोकांना माझ्या नावाचे महत्व वाटते.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

मत्तय 24:31

मनुष्याचा पुत्र तुतारीचा मोठा नाद करून आपले दूत पृथ्तीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.

लूक 4:18

“प्रभूचा आत्मा मजवर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे, यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यासाठी बंदीवान म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आंधळ्यांना दृष्टि मिळावी व त्यांनी बघावे यासाठी, जुलूूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी

योहान 4:21

येशू म्हणाला, “बाई, माझ्यावर विश्वास ठेव! अशी वेळ येत आहे की, आपल्या पित्याची (देवाची) उपासना करण्यासाठी यरुशलेमला अगर या डोंगरावर जाण्याची गरज पडणार नाही.

रोमकरांस 10:18

परंतु मी म्हणतो, “त्यांनी आमचा उपदेश ऐकला नव्हता काय? “होय, त्यानी ऐकला: आत्मा म्हणतो:“त्यांच्या आवाजाचा नाद सर्व पृथ्वीवर गेला आहे आणि त्यांचे शब्द पृथ्वीच्या शेवटापर्यंत गेले आहेत.”स्तोत्र. 11:4

1 थेस्सलनीकाकरांस 4:16

कारण, जेव्हा मोठ्याने मुख्य देवदूताच्या आवाजात आणि देवाच्या कर्ण्याच्या आवाजात आज्ञा दिली जाईल, तेव्हा, प्रभु स्वत: स्वर्गातून खाली उतरेल आणि जे ख्रिस्तात मेले होते ते प्रथम उठतील.

इब्री लोकांस 12:22

परंतु तुम्ही सीनाय पर्वताजवळ जिवंत देवाच्या नगराजवळ आणि स्वर्गीय यरुशलेम येथे आलेले आहात आणि तुम्ही आनंदाने जमा झालेल्या हजारो देवदूतांजवळ आलेले आहात.

प्रकटीकरण 8:2

आणि मी सात देवदूतांनादेवासमोर उभे असलेले पाहिले. त्यांना सात कर्णे दिले होते.

प्रकटीकरण 8:6

मग सात देवदूत त्यांचे कर्णे वाजविण्यास तयार झाले.

Interlinear

Choose Theme