Home Bibles यिर्मया 31:6 · मराठी बायबल
यिर्मया 31:6 · मराठी बायबल

अशी एक वेळ येईल की पहारेकरी ओरडून पुढील आदेश देतील. ‘या, आपण परमेश्वर देवाची उपासना करण्यासाठी वर सियोनला जाऊ या.’ एफ्राईम या डोंगराळ प्रदेशातील पहारेकरीसुद्धा ओरडून हा संदेश देतील.”

Cross references

2 इतिहास 13:4

एफ्राइमच्या डोंगराळ प्रदेशातील समाराइम पर्वतावर उभे राहून अबीया म्हणाला, “यराबाम आणि समस्त इस्राएल लोकांनो, ऐका,

2 इतिहास 30:5

बैर - शेबा पासून दान पर्यंत इस्राएलभर त्यांनी दवंडी पिटली. वल्हांडणासाठी यरुशलेमला यायला सर्व लोकांना आवाहन करण्यात आले. मोशेच्या नियमशास्त्रात सांगितलेल्या पारंपारिक पध्दतीने बहुसंख्य लोकांनी फार वर्षात हा सण साजरा केला नव्हता.

एज्रा 1:5

तेव्हा यहूदा व बन्यामीनच्या घराण्यातील वडीलधाऱ्यांनी यरुशलेमला निघायची तयारी केली; मंदिर बांधण्यासाठी ते यरुशलेमला चालले होते. ज्यांना ज्यांना देवाने प्रेरणा दिली होती असे सगळेच यरुशलेमला जायला तयार झाले.

एज्रा 8:15

मी (म्हणजे एज्राने) या सर्व लोकांना अहवाकडे वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाजवळ बोलावून घेतले. त्या ठिकाणी आमचा तीन दिवस मुक्काम होता. तेथे मला असे समजले की या लोकांमध्ये याजक होते पण लेवी नव्हते.

यशया 2:2

शेवटच्या दिवसात, परमेश्वराचे मंदिर असलेला डोंगर सर्व डोंगरांपेक्षा उंच होईल. तो टेकड्यांपेक्षा उंच उचलला जाईल. सर्व देशांतील लोक तेथे जातील.

यशया 11:11

त्या वेळेला माझा प्रभू (देव) मागे राहिलेल्या लोकांपर्यंत पुन्हा पोहोचेल. असे तो दुसऱ्यांदा करील. आणि त्यांना बाहेर आणील. (अश्शूर, उत्तर मिसर, द्रक्षिण मिसर, इथिओपिया, एलाम, बॉबिलॉन, हमाथ आणि पृथ्वीवरील दूरची सर्व राष्ट्रे येथे असलेल्या ह्या त्याच्या लोकांना तो बाहेर आणील.

यशया 27:13

माझी बरीच माणसे अश्शूरमध्ये गमावली आहेत. माझी काही माणसे मिसरला पळून गेली आहेत. पण त्या वेळी प्रचंड तुतारी फुंकली जाईल आणि ते सर्व लोक यरूशलेमला परत येतील. ते सर्व जण त्या पवित्र डोंगरावरील देवापुढे नमन करतील.

यशया 40:9

सियोन, तुझ्याकडे सांगण्यासाठी एक सुर्वाता आहे. उंच डोंगरावर चढून जा आणि ही सुवार्ता ओरडून सांग. यरूशलेम, तुझ्यासाठी चांगली वार्ता आहे. घाबरू नकोस. मोठ्याने बोल.यहुदातील सर्व शहरांना ही वार्ता सांग, “हा पाहा तुमचा देव!

यशया 52:7

“शांती प्रस्थापित झाली आहे चांगुलपणा आला आहे. तारण झाले आहे. सियोन, तुमचा देव हाच राजा आहे.” अशी घोषणा देवदूताकडून ऐकणे असे शुभवर्तमान घेऊन टेकड्यांवरून येणारा देवदूताचा आवाज ऐकणे ही खरोखरच विस्मयकारक गोष्ट आहे.

यशया 62:6

“यरूशलेम, तुझ्या वेशीवर मी रखवालदार (संदेष्टा) ठेवतो. ते रखवालदार गप्प बसणार नाही. रांत्रदिवस ते प्रार्थना करीत राहतील.” रखवालदारांनो, तुम्ही देवाची प्रार्थना करीत राहिले पाहिजे त्याच्या वचनाची आठवण तुम्ही त्याला करून दिली पाहिजे. कधीही प्रार्थना करायचे थांबू नका.

यिर्मया 6:17

तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मी रखवालदार निवडले. मी त्यांना सांगितले, ‘रणशिंगाचा आवाज ऐका.’ पण ते म्हणाले, ‘आम्ही ऐकणार नाही.’

यिर्मया 50:4

परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी इस्राएलचे व यहूदाचे लोक एकत्र येतील. ते एकत्र येऊन रडतील, आणि एकत्रितपणेच त्यांच्या परमेश्वर देवाचा शोध घेतील.

यिर्मया 50:19

“मी इस्राएलला त्याच्या भूमीत परत आणीन. कर्मेलच्या डोंगरावर व बाशानच्या भूमीत वाढलेले धान्य तो खाईल व तृप्त होईल. एफ्राईम व गिलाद येथील टेकड्यांवर तो चरेल.”

यहेज्केल 3:17

“मानवपुत्रा, मी तुला इस्राएलचा पहारेकरी करीत आहे. इस्राएलबाबत घडणाऱ्या वाईट गोष्टी मी तुला सांगीन. मग तू इस्राएलला त्या गोष्टींबद्दल इशारा दे.

यहेज्केल 33:2

“मानवपुत्रा, तुझ्या माणसांशी बोल त्यांना सांग, ‘ह्या देशावर हल्ला करण्यासाठी कदाचित्, मी शत्रूसैनिकांना आणीन. त्या वेळेस लोक एकाला पहारेकरी म्हणून निवडतील.

होशेय 1:11

“मग यहूदाचे व इस्राएलचे लोक एकत्र येतील. ते त्यांच्यासाठी एक राजा निवडतील. त्याचे राष्ट भूप्रदेशापेक्षा खूपच मोठे असेल. तेव्हा इज्रेलचा दिवस खरोखर चांगला असेल.”

होशेय 9:8

परमेश्वर आणि संदेष्टा एफ्राईम वर लक्ष ठेवण्याऱ्या रखवालदाराप्रमाणे आहेत. पण रस्ताभर अनेक सापळे आहेत. आणि लोक संदेष्ट्याचा त्याच्या परमेश्वराच्या घरातसुध्दा, तिरस्कार करतात.

मीखा 4:1

शेवटल्या दिवसांत, देवाचे मंदिर ज्या पर्वतावर आहे, तो पर्वत सर्व पर्वतांत उंच असेल. टेकड्यांपेक्षा तो उंच होईल. आणि तिथे जाणाऱ्या लोकांचा प्रवाह सतत वाहत राहील.

जखऱ्या 8:20

सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “भविष्यात, पुष्कळ गावचे लोक यरुशलेमला येतील.

जखऱ्या 8:21

निरनिराळ्या गावातील लोक एकमेकांना भेटतील. ते म्हणतील, ‘आम्ही सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करण्यास जात आहोत.’ आणि इतरलोक म्हणतील, ‘आम्हालासुध्दा यावेसे वाटते.”‘

प्रेषितांचीं कृत्यें 8:5

फिलिप्पशोमरोनातील एका शहरात गेला. त्याने ख्रिस्ताचा संदेश दिला. तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले व त्याने केलेले चमत्कार पाहिले.

Interlinear

Choose Theme