Home Bibles यशया 43:6 · मराठी बायबल
यशया 43:6 · मराठी बायबल

मी उत्तरेला म्हणेन : माझे लोक मला परत दे. मी दक्षिणेला सांगेन, माझ्या लोकांना तुरूंगात ठेवू नको. दूरदूरच्या ठिकाणांहून माझ्या मुलांमुलींना माझ्याकडे परत आण.

Cross references

स्तोत्रसंहिता 107:3

परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले. त्याने त्याना पूर्व - पश्चिम, उत्तर - दक्षिण या दिशांतून आणले.

यशया 11:12

देव “तो ध्वज” सर्व लोकांची निशाणी म्हणून उभारेल. इस्राएल व यहुदा येथील लोकांना बळजबरीने देशाच्या बाहेर घालवून देण्यात आले ते पृथ्वीवरील दूरदूरच्या देशात विखुरले. पण देव त्यांना एकत्र आणील.

यशया 18:7

त्या वेळेला, सर्वशक्तिमान परमेश्वराला अर्पण करण्यासाठी खास वस्तू आणल्या जातील. ह्या वस्तू, उंच आणि धडधाकट लोक, देवाच्या स्थळी सीयोनच्या डोंगरावर आणतील. (ह्या उंच व धडधाकट लोकांना सर्व लोक घाबरतात. त्यांचे राष्ट्र बलाढ्य आहे. ते इतर राष्ट्रांना हरवते. हे राष्ट्र नद्यांनी विभागले गेले आहे.)

यशया 27:13

माझी बरीच माणसे अश्शूरमध्ये गमावली आहेत. माझी काही माणसे मिसरला पळून गेली आहेत. पण त्या वेळी प्रचंड तुतारी फुंकली जाईल आणि ते सर्व लोक यरूशलेमला परत येतील. ते सर्व जण त्या पवित्र डोंगरावरील देवापुढे नमन करतील.

यशया 49:12

“पाहा! दूरदूरच्या ठिकाणाहून लोक माझ्याकडे येत आहेत उत्तर आणि पश्चिम दिशांकडून ते माझ्याकडे येत आहेत. मिसरमधील सीनीहूनही (आस्वानहूनही) लोक येत आहेत.”

यिर्मया 3:14

“तुम्ही लोक विश्वासघातकी आहात. पण माझ्याकडे परत या.” हा परमेश्वराचा संदेश होता.“मी तुमचा प्रभू आहे मी प्रत्येक नगरातील एक आणि प्रत्येक कुटुंबातील दोन माणसे घेईन आणि तुम्हाला सियोनला आणीन.

यिर्मया 3:18

त्या दिवसांत यहूदाचे घराणे इस्राएलच्या घराण्याला येऊन मिळेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.

यिर्मया 23:8

पण लोक काही नवीनच बोलतील. ‘परमेश्वर चिरंजीव आहे परमेश्वर एकमेव आहे. त्याने इस्राएलच्या लोकांना उत्तरेकडील देशातून बाहेर आणले. त्याने त्या लोकांना ज्या ज्या देशात पाठविले होते, त्या त्या देशांतून बाहेर आणले.’ मग इस्राएलचे लोक त्यांच्या स्वत:च्या देशात राहतील.”

यहेज्केल 36:24

देव म्हणाला, “मी तुम्हाला त्या राष्ट्रांतून बाहेर काढून एकत्र करीन आणि तुमच्या देशात तुम्हाला परत आणीन.

होशेय 1:10

“भविष्यकाळात, समुद्रकाठच्या वाळूच्या कणांप्रमाणे इस्राएली लोक असतील. तुम्ही वाळू मापू वा मोजू शकत नाही. मग ‘तुम्ही माझे लोक नव्हत’ असे ज्यांना म्हणण्यात आले, ‘त्याऐवजी त्यांना तुम्ही जिवंत परमेश्वराची लेकरे आहात.’ असे म्हणण्यात येईल.

रोमकरांस 9:7

याचा अर्थ असाही नाही की, ते अब्राहामापासून आलेले आहेत, म्हणून खरोखरच ती अब्राहामाची मुले आहेत, तर देवाने म्हटल्याप्रमाणे, “इसहाकाच्या वंशातील लोकांना तुझे संतान म्हटले जाईल.

रोमकरांस 9:25

होशेयाच्या ग्रंथात पवित्र शास्त्र सांगते,“जे माझे लोक नव्हते, त्यांना मी माझे लोक म्हणेन. आणि ज्या स्त्रीवर प्रीति केली नव्हती तिला प्रिय म्हणेन.”

2 करिंथकरांस 6:17

“म्हणून त्यांच्यामधून बाहेर या आणि स्वत:ला त्यांच्यापासून वेगळे करा. प्रभु म्हणतो, अशुद्ध वस्तूला स्पर्श करु नका, आणि मी तुम्हांला स्वीकारीन.”यशया 52:11

गलतीकरांस 3:26

कारण तुम्ही सर्व सुवार्तेवर विश्वासठेवल्यामुळे येशू ख्रिस्ताद्वारे देवाचे पुत्र आहात.

Interlinear

Choose Theme