त्या वेळेला तू म्हणशील:“परमेश्वरा, मी तुझे स्तवन करतो तू माझ्यावर रागावला होतास पण आता राग सोड तुझ्या प्रेमाची प्रचिती दे.”
Cross references
“मी सांगितलेल्या या सर्व गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील. आशीर्वाद तसेच शापही खरे होतील. तुमचा देव परमेश्वर तुम्हांला इतर राष्ट्रांमध्ये हद्दपार करील. तेव्हा तुम्हांला या सर्व गोष्टींची आठवण होईल.
नहेम्या म्हणाला, “आता जा आणि सुग्रास अन्न खा, गोड पेये प्या. ज्यांना असे खाणेपिणे करता आलेले नाही त्यांना आपल्यातले काही खाद्य-पेय पाठवा. परमेश्वराचा हा पवित्र दिवस आहे. दु:खी राहू नका. कारण परमेश्वराचा आनंदच तुम्हाला सामर्थ्य देणार आहे.”
नंतर तू तुझे दु:ख विसरशील. तुझे दु:ख निचरा झालेल्या पाण्यासारखे वाहून जाईल.
देव रागावला होता म्हणून त्याचा निर्णय होता “मृत्यू.” परंतु त्याने त्याचे प्रेम दाखवले आणि मला “जीवन” दिले आदल्या रात्री मी झोपताना रडत होतो परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी मी आनंदी होतो व गात होतो.
मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन. माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल.
देवा, मला दया दाखव आणि आशीर्वाद दे. कृपाकरुन आमच्या स्वीकार कर!
देवाची स्तुती करा स्वर्ग आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्व गोष्टी तुम्ही सर्वानी त्याची स्तुती करा.
राजा चिरायु होवो! आणि त्याला शबाकडून सोने मिळू दे. राज्यासाठी नेहमी प्रार्थना करा, त्याला रोज आशीर्वाद द्या.
परमेश्वरा, तुझ्या देशाला दया दाखव. याकोबाचे लोक परदेशात कैदी आहेत. कैद्यांना त्यांच्या देशात परत आण.
देवा, तारणहारा, आमच्यावर रागावणे सोडून दे. आणि आमचा पुन्हा स्वीकार कर.
देवा, तू मला वाचवणार आहेस याची प्रचीती मला दाखव. माझ्या शत्रूंना ती खूण दिसेल आणि ते निराश होतील. तू माझी प्रार्थना ऐकलीस आणि तू मला मदत करणार आहेस हे यावरुन दिसून येईल.
लोकांना देवाजवळ त्याचे गुणगान करु द्या आणि त्यांना त्यांच्या तलवाडी हातात घेऊ द्या.
गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल आणि ते शरमिंदे होऊन माना खाली घालतील. अशा वेळी फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा असेल.
कैद्याप्रमाणे तुम्हाला वाकावे लागेल, मृताप्रमाणे तुम्हाला जमिनीवर पडावे लागेल. पण एवढ्यानेही भागणार नाही. कारण अजूनही देवाचा राग शांत झाला नसेल. अजूनही देव शिक्षा करण्याच्या तयारीत असेल.
पण थोड्या काळात माझा राग शांत होईल. अश्शूरने तुम्हाला दिलेली शिक्षा मला पुरेशी वाटेल.”
त्या वेळेला इशायाच्या घराण्यात एक विशेष व्यक्ती असेल ती व्यक्ती ध्वजाप्रमाणे असेल हा “ध्वज” सर्व राष्ट्रांना त्याच्याभोवती जमण्याचे आवाहन करील. सर्व राष्ट्रे, त्यांनी करायच्या कार्याबद्दल ह्या ‘ध्वजाकडे’ विचारणा करतील तो जेथे असेल तेथे वैभव नांदेल.
ह्यामुळे अश्शूरमध्ये मागे राहिलेल्या त्याच्या लोकांना अश्शूर सोडून जाता येईल. हे देवाने मिसरमधून इस्राएली लोकांना बाहेर काढले, त्या वेळे प्रमाणेच असेल.
परमेश्वर तुमचे कष्ट कमी करून सुख व आराम देईल. पूर्वी तुम्ही गुलाम होता. लोक तुम्हाला राबवून घेत. पण परमेश्वर तुमचे कष्ट नाहीसे करील.
प्रभू, तू माझा परमेश्वर आहेस. मला तुझ्याबद्दल आदर वाटतो व तुझे मी स्तवन करतो. तू आश्चर्य घडवली आहेस. तू पूर्वी केलेले भाकीत पूर्णपणे खरे ठरले आहे. तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी घडली आहे.
तेव्हा लोक म्हणतील, “हा आपला देव आहे. आपण ज्याची वाट पाहत आहोत तोच हा. तो आपले रक्षण करायला आला आहे. आपण त्या आपल्या परमेश्वराची वाट पाहत आहोत, म्हणून जेव्हा परमेश्वर आपले रक्षण करील तेव्हा आनंद साजरा करू आणि सुखी होऊ.”
त्या वेळेस, यहुदात, लोक पुढील गाणे म्हणतील परमेश्वराने आम्हाला तारण दिले आहे. भक्कम तटबंदी व पुरेशी संरक्षणव्यवस्था असलेले आमचे शहर अभेद्द आहे.
भूमी यापुढे मृतांना झाकून ठेवणार नाही. त्या वेळेला लिव्याथान ह्या कपटी सर्पाचा परमेश्वर न्यायनिवाडा करील. वेटोळे घालून बसलेल्या लिव्याथान सर्पाला परमेश्वर आपल्या मोठ्या, कठीण व बलवान तलवारीने शिक्षा करील. समुद्रातील प्रचंड धुडाला तो मारील.
त्या वेळेस परमेश्वर त्याच्या लोकांना इतरांपासून वेगळे करील. परमेश्वर युफ्राटिसपासून सुरवात करून मिसरच्या नदीपर्यंतच्या सर्व लोकांना गोळा करील.एक एक करून तुम्ही इस्राएलचे सर्व लोक एकत्र गोळा व्हाल.
देव त्याच्या लोकांना मुक्त करील आणि ते लोक त्याला शरण येतील. सियोनमध्ये येताना लोक गात येतील. त्यांना कायमचा आनंद मिळेल. तो आनंद त्यांच्या डोक्यावरील मुकुटाप्रमाणे असेल. ते आनंदाने व हर्षांने भारून जातील. दु:ख आणि शोक दूर सरेल.
तुमचा देव म्हणतो,“माझ्या लोकांचे सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा.
हे स्वर्गा आणि हे पृथ्वी, आनंदित व्हा. डोंगरांनो, आनंदाचा कल्लोळ करा. का? कारण परमेश्वर लोकांचे दु:ख हलके करतो. गरिबांवर तो दया करतो.
त्याचप्रमाणे परमेश्वर सियोनचे आणि तिच्या उदध्वस्त ठिकाणांचे सांत्वन करील. परमेश्वराला तिच्याबद्दल आणि तिच्या लोकांबद्दल खूप वाईट वाटेल. तो तिच्यासाठी खूप काही करील. परमेश्वर वाळवटांचे रूप बदलेल. ते एदेनच्या बागेसारखे होईल. ती ओसाड जमीन देवाच्या बागेसारखी होईल. तेथील लोक खूप खूप सुखी होतील. ते आनंद व्यक्त करतील. ते आभाराची व विजयाची गीते गातील.
मला खूप राग आला होता म्हणून मी थोड्या वेळापुरता तुझ्यापासून लपून बसलो. पण मी तुझ्यावर अखंड कृपा करून तुझे दु:ख हलके करीन.” परमेश्वर, तुझा तारणहार असे म्हणाला.
देव अती उच्च व परम थोर आहे. देव चिरंजीव आहे. त्याचे नाव पवित्र आहे. देव म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो हे खरे पण मी दु:खी आणि लीन यांच्याबरोबरही असतो. मनाने नम्र असलेल्यांना आणि दु:खी लोकांना मी नवजीवन देईन.
दुसऱ्या देशातील मुले तुझी तटबंदी पुन्हा बांधतील, राजे तुझी सेवा करतील “मी जेव्हा रागावलो तेव्हा मी तुला फटकावले. पण आता तुझ्यावर दया करण्याची माझी इच्छा आहे. म्हणून मी तुझे दु:ख हलके करीन.
“तुझ्या देशात पुन्हा कधीही हिंसेची वार्ता ऐकू येणार नाही. लोक तुझ्या देशावर पुन्हा कधीही चढाई करणार नाहीत. आणि तुला लुटणार नाहीत. तू तुझ्या वेशीला ‘तारण’ आणि तुझ्या दरवाजांना ‘स्तुती’ अशी नावे देशील.
तुम्ही यरूशलेममध्ये आरामात राहाल. आई जशी मुलाला आराम देते, तसा मी तुम्हाला देईन.”
मग इस्राएलमधील तरुणी आनंदित होऊन नाचतील आणि तरुण व वृद्ध त्यांच्या नाचात सामील होतील. मी त्यांचे दु:खाचे सुखात रुपांतर करीन. मी इस्राएलच्या लोकांना समाधानात ठेवीन. मी त्यांच्या दु:खाचे सुखात रुपांतर करीन.
एफ्राईमला रडताना मी ऐकले आहे. एफ्राईमला मी पुढील गोष्टी बोलताना ऐकले आहे. ‘परमेश्वर तू खरोखरच मला शिक्षा केलीस आणि मी धडा शिकलो. मी बेबंद वासराप्रमाणे होतो. कृपा करुन मला शिक्षा करण्याचे थांबव. मी तुझ्याकडे परत येईन. तू खरोखरच, परमेश्वर, माझा देव आहेस.
त्यांनी पाप केले व स्वत:ला अमंगळ करुन घेतले म्हणून त्यांनी केलेल्या कर्माबद्दल मी त्यांना शिक्षा केली. मी त्यांच्याकडे पाठ फिरविली आणि त्यांना मदत करण्याचे नाकारले.”
“चला! आपण परमेश्वराकडे परत जाऊ या! त्याने आपल्याला दुखविले, पण तोच आपल्याला बरे करील. त्याने आपल्याला जखमी केले, पण तोच त्यावर मलमपट्टी करील.
“एफ्राईम, तुला सोडून देण्याची माझी इच्छा नाही. इस्राएल, तुझे रक्षण करावे असे मला वाटते. अदमाह किवा सबोईम यांच्यासारखी तुझी स्थिती करावी असे मला वाटत नाही. माझे मन:परिवर्तन होत आहे. तुझ्याबद्दलचे माझे प्रेम अतिशय उत्कट आहे.
परमेश्वर म्हणतो, “त्यानी माझा त्याग केली तरी मी त्यांना ह्या गोष्टीबद्दल क्षमा करीन. मी मोकळेपणाने त्यांच्यावर प्रेम करीन. आता मी त्यांच्यावर रागावलो नाही.
मी इस्राएलासाठी दहिवराप्रमाणे होईन. इस्राएल लिलीप्रमाणे फुलेल, लबानोनमधील गंधसरूंप्रमाणे तो फोफावेल.
म्हणून परमेश्वर म्हणतो, “मी यरुशलोमला परत येईन आणि दया करुन तिचे दु:ख हलके करीन.” सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “यरुशलेमची पुन्हा उभारणी केली जाईल आणि तिथे माझे निवासस्थान बांधले जाईल.”