Home Bibles होशेय 14:4 · मराठी बायबल
होशेय 14:4 · मराठी बायबल

परमेश्वर म्हणतो, “त्यानी माझा त्याग केली तरी मी त्यांना ह्या गोष्टीबद्दल क्षमा करीन. मी मोकळेपणाने त्यांच्यावर प्रेम करीन. आता मी त्यांच्यावर रागावलो नाही.

Cross references

निर्गम 15:26

परमेश्वर म्हणाला, “तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा; ज्या गोष्टी चांगल्या आहेत असे तो म्हणतो त्या तुम्ही करा; जर तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा व विधी पाळाल तर तुम्हाला मिसरच्या लोकाप्रमाणे पीडा भोगाव्या लागणार नाहीत आणि मी जो परमेश्वर त्या मी मिसरच्या लोकांवर जे रोग पाठवले ते तुम्हांवर पाठविणार नाही; मी परमेश्वर आहे; तुम्हाला बरे करणारा मीच आहे.”

गणना 25:4

परमेश्वर मोशेला म्हणाला, “त्या सर्व लोकांच्या पुढाऱ्यांना आण, नंतर त्यांना मारून टाक म्हणजे सर्व लोकांना दिसेल.त्यांची प्रेते परमेश्वरासमोर ठेव. नंतर परमेश्वर सर्व इस्राएल लोकांना त्याचा राग दाखवणार नाही.”

गणना 25:11

“माझ्या लोकांविषयी माझ्या भावना तीव्र आहेत. ते फक्त माझेच असावेत असे मला वाटते. एलाजारच्या मुलांने याजक अहरोनच्या नातवाने इस्राएल लोकांना माझ्या रागापासून वाचवले. माझ्या लोकांबद्दलच्या त्या भावना दाखवून त्याने हे केले म्हणून मला आधी वाटत होते त्याप्रमाणे मी आता त्या लोकांना मारणार नाही.

अनुवाद 7:7

परमेश्वराने प्रेमाने तुम्हालाच का निवडले? तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रातील होता म्हणून नव्हे. उलट तुम्ही संख्येने सगळ्यात कमी होता.

स्तोत्रसंहिता 10:14

परमेश्वरा, ते लोक अतिशय दुष्ट आणि वाईट गोष्टी करतात ते तू बघतोस तू त्याकडे लक्ष दे आणि काहीतरी कर. संकटांनी पिडलेले लोक तुझ्याकडे मदतीसाठी येतात. परमेश्वरा, निराधारला मदत करणारा तूच एक आहेस. म्हणून त्यांना मदत कर.

स्तोत्रसंहिता 20:8

त्या दुसऱ्या लोकांचा पराभव झाला. ते युध्दात मारले गेले परंतु आपण जिंकलो आपण विजयी झालो.

स्तोत्रसंहिता 78:38

परंतु देव दयाळू होता. देवाने त्यांना त्यांच्या पापांबद्दल क्षमा केली आणि त्याने त्यांचा नाश केला नाही. देवाने अनेक वेळा स्व:तचा राग आवरला. त्याने स्व:तला खूप राग येऊ दिला नाही.

यशया 12:1

त्या वेळेला तू म्हणशील:“परमेश्वरा, मी तुझे स्तवन करतो तू माझ्यावर रागावला होतास पण आता राग सोड तुझ्या प्रेमाची प्रचिती दे.”

यशया 57:18

इस्राएल कोठे गेला ते मी पाहिले म्हणून मी त्याला बरे करीन. (क्षमा करीन.) मी त्याचे दु:ख हलके करीन आणि त्याला बरे वाटावे म्हणून शब्दांची फुंकर घालीन. मग त्याला व त्याच्या लोकांना वाईट वाटणार नाही.

यिर्मया 3:22

परमेश्वर पुढे म्हणाल, “इस्राएलच्या लोकांनो, तुम्ही माझ्याशी विश्वसघात करता. पण माझ्याकडे परत या. माझ्याकडे परत या. जरी तुम्ही विश्वासघातकी असलात तरी मी तुम्हाला क्षमा करीन.”पण लोकांनी म्हणावे, “हो! आम्ही तुझ्याकडे येऊ तूच परमेश्वर आमचा देव आहेस!”

यिर्मया 5:6

ते देवाच्या विरुद्ध गेले म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करील. जंगलातील लांडगा त्यांना ठार मारील. चित्ता त्यांच्या शहराजवळ लपला आहे. शहरातून बाहेर येणाऱ्या प्रत्येकाचे तो तुकडे तुकडे करील. यहूदातील लोकांनी पुन्हा पापे केल्याने हे घडून येईल. ते, अनेक वेळा, देवापासून दूर भटकत गेले आहेत.

यिर्मया 8:22

गिलादमध्ये नक्कीच काही औषध आहे. तेथे नक्कीच वैद्य आहे. मग माझ्या लोकांच्या जखमा का भरुन येत नाहीत?

यिर्मया 14:7

या गोष्टींना आम्हीच जबाबदार आहोत, हे आम्हाला माहीत आहे. आम्ही आमच्याच पापाचे भोग भोगत आहोत. परमेश्वरा, तुझे नाव राखण्यासाठी आम्हाला मदत कर. कारण आम्ही तुझ्याशी खूप वेळा प्रतारणा केली, हे आम्हाला कबूल आहे. आम्ही तुझ्याशी पापाचरण केले,

यिर्मया 17:14

परमेश्वरा, तू मला बरे केलेस, तर मी पूर्ण बरा होईन. तू मला वाचविलेस, तर मी खरोखच वाचेन. देवा, मी तुझी स्तुती करतो.

यिर्मया 33:6

“पण मग मी त्या नगरीतील लोकांना बरे करीन. मी त्यांना शांती आणि सुरक्षा ह्यांचा आनंद लुटू देईन.

होशेय 2:19

आणि मी (परमेश्वर) तुला माझी चिरंतन वधू करीन. मी चांगुलपणा, न्याय,प्रेम व दया यांच्यासह तुला वधू करून घेईन.

होशेय 6:1

“चला! आपण परमेश्वराकडे परत जाऊ या! त्याने आपल्याला दुखविले, पण तोच आपल्याला बरे करील. त्याने आपल्याला जखमी केले, पण तोच त्यावर मलमपट्टी करील.

होशेय 11:7

“मी परत यावे अशी माझ्या लोकांची अपेक्षा आहे. वरच्या परमेश्वराला ते बोलवतील पण देव त्यांना मदत करणार नाही.”

सफन्या 3:17

परमेश्वर तुझा देव, तुमच्याबरोबर आहे. तो बलवान वीराप्रमाणे आहे. तो तुला वाचवील. तो तुझ्यावर किती प्रेम करतो, हे तो तुला दाखवून देईल. तुझ्याबरोबर तो किती सुखी आहे, हेही तुला दिसेल.

मत्तय 9:12

येशूने त्यांना हे बोलताना ऐकले, तो त्यांना म्हणाला, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही तर जे आजरी आहेत त्यांना आहे.

रोमकरांस 3:24

परंतु त्यांना देवाने त्याच्या कृपेने येशू ख्रिस्ताद्वारे खंडणी भरुन नीतिमान ठरविले आहे.

2 करिंथकरांस 5:19

देव ख्रिस्तामध्ये जगाशी स्वत:चा समेट करीत होता. मनुष्यांची पापे त्यांच्याविरुद्ध मोजत नव्हता. आणि त्याने आम्हांला समेटाचा संदेश दिला आहे.

इफिसकरांस 1:6

त्याने हे त्याच्या गौरवी कृपेची स्तुति व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हांला फुकट दिली.

इफिसकरांस 2:4

पण देव खूप दयाळू आहे. त्याच्या महान प्रीतिने त्याने आमच्यावर प्रेम केले.

2 तीमथ्थाला 1:9

त्याने आम्हांला तारले आणि त्याने आम्हांला समर्पित जीवनासाठी पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वत:च्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा काळाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हांस दिली होती.

तीताला 3:4

पण जेव्हा आमच्या तारणाऱ्या देवाची कृपा व प्रीति मानवाप्रती प्रकट झाली, तेव्हा

Interlinear

Choose Theme