Home Bibles यशया 66:13 · मराठी बायबल
यशया 66:13 · मराठी बायबल

तुम्ही यरूशलेममध्ये आरामात राहाल. आई जशी मुलाला आराम देते, तसा मी तुम्हाला देईन.”

Cross references

स्तोत्रसंहिता 137:6

यरुशलेम मी जर तुला कधी विसरलो, तर मी पुन्हा कधी गाणे म्हणणार नाही, असे मला वाटते. मी तुला कधीही विसरणार नाही असे मी वचन देतो.

यशया 40:1

तुमचा देव म्हणतो,“माझ्या लोकांचे सांत्वन करा, माझ्या लोकांचे सांत्वन करा.

यशया 51:3

त्याचप्रमाणे परमेश्वर सियोनचे आणि तिच्या उदध्वस्त ठिकाणांचे सांत्वन करील. परमेश्वराला तिच्याबद्दल आणि तिच्या लोकांबद्दल खूप वाईट वाटेल. तो तिच्यासाठी खूप काही करील. परमेश्वर वाळवटांचे रूप बदलेल. ते एदेनच्या बागेसारखे होईल. ती ओसाड जमीन देवाच्या बागेसारखी होईल. तेथील लोक खूप खूप सुखी होतील. ते आनंद व्यक्त करतील. ते आभाराची व विजयाची गीते गातील.

यशया 51:12

परमेश्वर म्हणतो, “मीच तो एकमेव ज्याने तुमचे दु:ख हलके केले. मग तुम्ही लोकांना का भ्यावे? ती जन्म मृत्यु पावणारी माणसेच आहेत. ते फक्त मनुष्यप्राणी आहेत. ते गवताप्रमाणे मरतात.”

यशया 65:18

माझे लोक सुखी होतील. ते अखंड आनंदात राहतील का? मी जे निर्माण करीन त्यामुळे असे होईल. मी यरूशेमला आनंदाने भरून टाकीन आणि त्यांना सुखी करीन.

यशया 66:10

यरूशलेम, सुखी हो! यरूशलेमवर प्रेम करणारे तुम्ही लोकहो, सुखी व्हा! यरूशलेमला दु:खकारक गोष्टी घडल्या म्हणून तुमच्यातील काही लोकांना दु:ख झाले आहे. पण आता तुम्ही सुखी व्हावे.

2 करिंथकरांस 1:4

तो आमच्या सर्व कठीण काळात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, आम्ही इतर लोकांचे त्यांच्या अडचणीत सांत्वन करु शकू. देव जे सांत्वन आम्हाला देतो त्याच सांत्वनाने आम्ही इतरांचे सांत्वन करु शकतो.

1 थेस्सलनीकाकरांस 2:7

तरीही आम्ही तुमच्यामध्ये आई जशी प्रेमाने तिच्या मुलाला स्वत:चे दूध पाजते आणि काळजी घेते, तसे आम्ही तुमच्यात सौम्य होतो.

Interlinear

Choose Theme