सुरूवातीला होते त्याप्रमाणे मी न्यायाधीश नेमीन. पूर्वीप्रमाणेच मंत्री नेमीन मग तुला सर्वजण ‘चांगली व निष्ठावंत नगरी म्हणतील.”‘
Cross references
(मोशे फार नम्र माणूस होता. त्याने कधी अभिमान धरला नाही किंवा बढाई मारली नाही पृथ्वीवरील कोणत्याही माणसापेक्षा मोशे अधिक नम्र होता.)
म्हणून मोशेला खूप राग आला. तो परमेश्वराला म्हणाला, “मी या लोकांच्या बाबतीत काहीही वाईट केले नाही. मी त्यांच्या कडून काहीही घेतले नाही-साधा गाढव देखील नाही! परमेश्वरा, त्यांची अर्पणे स्विकारु नकोस.”
तो आता तुमचे नेतृत्व करील. मी आता म्हातारा झालो, थकलो पण माझी मुल तुमच्या बरोबर आहेत. मी अगदी लहान असल्यापासून तुमचे नेतृत्व केले.
देव म्हणतो, “यरूशलेमेकडे पाहा. ही नगरी माझ्यावर श्रध्दा ठेवणारी आणि माझ्या मताप्रमाणे वागणारी होती. आताच तिला असे वारांगनेप्रमाणे वागायला काय झाले? आता ती माझ्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही. यरूशलेमला प्रामणिक बनवली पाहिजे. यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनी देवाच्या इच्छेप्रमाणे राहिले पाहिजे. पण सध्या तेथे खुनी लोक राहतात.
पुष्कळ लोक तेथे जातील. ते म्हणतील, “आपण परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ या. आपण याकोबच्या देवाच्या मंदिरात जाऊ या. मग देव, त्याचा जगण्याचा मार्ग आपल्याला दाखवील. आणि आपण त्या मार्गाने जाऊ.”देवाच्या शिकवणुकीची सुरूवात, परमेश्वराच्या संदेशाचा आरंभ यरूशलेममधील सीयोनच्या डोंगरात होईल. व तो सर्व जगात पोहोचेल.
मी सांगतो ते ऐका सगळीकडे चांगुलपणा नांदावा अशा तऱ्हेने राजाने राज्य करावे. नेत्यांनी लोकांना मार्गदर्शन करताना न्याय निर्णय घ्यावेत.
परमेश्वर महान आहे. तो उच्च स्थानी राहातो. परमेश्वर सियोनमध्ये प्रामाणिकपणा व चांगुलपणा भरतो.
पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील. पूर्वी ज्यांनी तुझा तिरस्कार केला तेच आता तुझ्या पायाशी वाकतील. तेच लोक तुला ‘परमेश्वराची नगरी,’ ‘इस्राएलच्या पवित्र देवाचे सियोन म्हणून संबोधतील.”‘
“आता तुझ्याजवळ तांबे आहे, मी तुला सोने आणीन. आता तुझ्याजवळ लोखंड आहे, मी तुला चांदी आणून देईन. मी तुझ्याजवळील लाकडाचे तांबे करीन. तुझ्या खडकांचे लोखंड करीन. मी तुझ्या शिक्षेचे रूपांतर शांतीत करीन. आता लोक तुला दुखावतात, पण तेच तुझ्यासाठी चांगल्या गोष्टी करतील.
“तुझे सर्व लोक सज्जन असतील. त्यांना कायमची भूमी मिळेल. मी त्या लोकांना निर्माण केले. मी माझ्या स्वत:च्या हातांनी तयार केलेली ती सुंदर रोपटी आहेत.
“मी सियोनवर प्रेम करतो. म्हणून मी तिच्यावतीने बोलेन. मी यरूशलेमवर प्रेम करतो म्हणून मी बोलायचे थांबणार नाही. चांगुलपणा तेजस्वी प्रकाशाप्रमाणे चमकेपर्यंत आणि तारण तेजस्वी ज्योतीप्रमाणे जळायला लागेपर्यंत मी बोलेन.
“सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “यहूदाच्या लोकांसाठी मी पुन्हा चांगल्या गोष्टी करीन. कैदी म्हणून नेलेल्या लोकांना परत आणीन. त्या वेळी, यहूदाच्या शहरांत व गावांत राहणारे सर्व लोक म्हणतील, ‘सदगृह, पवित्र पर्वतावर, परमेश्वर तुझे कल्याण करो!“
यहूदा आणि इस्राएल यांना मी परत आणीन पूर्वीप्रमाणेच मी त्या लोकांना शक्तिशाली करीन.
तेथे सुखाचे व आनंदाचे कल्लोळ उठतील. नव-वर-वधूंचे सुखसंवाद ऐकू येतील. परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी घेऊन परमेश्वराच्या मंदिरात येणाऱ्या लोकांचे आवाज ऐकू येतील. ते लोक म्हणतील, ‘परमेश्वर देवाची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वराची कृपा चिरंतन आहे!’ मी यहूदासाठी चांगल्या गोष्टी करीन. म्हणून लोक असे म्हणतील. ते सर्व सुरुवातीला जसे होते तसे असेल.” देवाने ह्या गोष्टी सांगितल्या.
त्यावेळी दावीदाच्या वंशवृक्षाची एक चांगली शाखा मी वाढवीन ती ‘शाखा’ देशासाठी चांगल्या आणि योग्य गोष्टी करील.
मग मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन. माझा सेवक दावीद, ह्याला मी मेंढपाळ म्हणून नेमीन. तो त्यांना खायला घालील व त्यांच्या मेंढपाळ होईल.
“माझा सेवक, दावीद, हा त्यांचा राजा होईल. त्या सर्वांना मिळून एकच मेंढपाळ असेल. ते माझ्या नियमाप्रमाणे वागतील आणि माझ्या कायद्यांचे पालन करतील. मी त्यांना करायला सांगितलेल्या गोष्टी ते करतील.
ही जमीन म्हणजे राजाची इस्राएलमधील मालमत्ता असेल. त्यामुळे, यापुढे, राजा माझ्या लोकांना कष्ट देणार नाही उलट इस्राएलांना ते त्यांच्या वंशजांसाठी जमीन देईल.”
त्यानंतर इतर देशातील लोकांना मी बदलून टाकीन. मग ते स्पष्ट भाषा बोलतील आणि परमेश्वराचे नाव घेतील. ते सर्वजण खांद्याला खांदा लावून एक होऊन. माझी उपासना करतील.
“इस्राएलमधील जिवंत राहिलेले लोक वाईट कृत्ये करणार नाहीत. ते खोटे बोलणार नाहीत. खोट्याच्या आधारे ते इतरांना फसविणार नाहीत. चरुन आडव्या होणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे ते शांत राहतील त्यांना कोणीही त्रास देणार नाही.”
परमेश्वर म्हणतो, “मी सियोनला परत आलो आहे. मी यरुशलेमला रहात आहे. यरुशलेम “निष्ठावान नगरी म्हणून ओळखली जाईल. सर्व शक्तिमान परमेश्वराचा पर्वत, “पवित्र पर्वत” म्हणून ओळखला जाईल.”
मी त्यांना परत येथे आणि ते यरुशलेममध्ये राहतील. ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा कृपावंत वश्रध्दावान देव होईल.”
जे अशुद्ध आहे, ते त्या नगरात प्रवेश करु शकणार नाही.अथवा लाजिरवाणे काम अगर लबाडी करणाऱ्याचा शिरकाव त्या नगरात होणार नाही. कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्यालोकांची नावे नोंदविली आहेत, केवळ तेच लोक त्या नगरात जाऊ शकतील.