Home Bibles गणना 12:3 · मराठी बायबल
गणना 12:3 · मराठी बायबल

(मोशे फार नम्र माणूस होता. त्याने कधी अभिमान धरला नाही किंवा बढाई मारली नाही पृथ्वीवरील कोणत्याही माणसापेक्षा मोशे अधिक नम्र होता.)

Cross references

गणना 11:10

मोशेने लोकांची कुरकुर ऐकली. प्रत्येक कुटुंबातील लोक आपापल्या तंबूसमोर बसून कुरकुर करीत होते. त्यामुळे परमेश्वराचा राग भयंकर भडकला आणि त्यामुळे मोळे खिन्न झाला.

गणना 20:10

मोशे आणि अहरोन यांनी लोकांना त्या खडकासमोर भेटायला सांगितले. नंतर मोशे म्हणाला, “तुम्ही लोक नेहमी तक्रारी करीत असता. आता माझे ऐका. मी आता या खडकातून पाणी काढीन.”

स्तोत्रसंहिता 106:32

मरीबा येथे लोक खूप रागावले आणि त्यांनी मोशेला काही तरी वाईट करायला लावले.

स्तोत्रसंहिता 147:6

परमेश्वर नम्र लोकांना मदत करतो. परंतु तो वाईट लोकांना अडचणीत टाकतो.

स्तोत्रसंहिता 149:4

परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर सुखी आहे. देवाने त्याच्या विनम्र लोकांसाठी अद्भुत गोष्ट केली, त्याने त्याचा उध्दार केला.

मत्तय 5:5

जे नम्र ते धन्य, कारण त्यांना वचनदत्त भूमीचे वतन मिळेल.

मत्तय 11:29

माझे जू आपणांवर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या आत्म्यास विश्रांति मिळेल.

मत्तय 21:5

सोयोनेच्या कन्येला सांग, पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे! तो लीन आहे आणि नम्र होऊन गाढवावर बसून येत आहे, होय शिंगरावर, कष्ट करणाऱ्या प्राण्याच्या शिंगरावर.”‘ जखऱ्या 9:9

2 करिंथकरांस 10:1

ख्रिस्ताच्या नम्रतेने व सौम्यतेने मी तुम्हांला उत्तेजन देतो. मी, पौल, जेव्हा तुमच्या समोर येतो तेव्हा ‘भित्रा’ असतो पण जव्हा तुमच्यापासून दूर असतो तेव्हा “धीट” असतो!

2 करिंथकरांस 11:5

पण मला वाटते मी अति श्रेष्ठ प्रेषितांपेक्षा कुठल्या प्रकारे कमी आहे असे नाही.

2 करिंथकरांस 12:11

मी स्वत:च मूर्ख झालो पण तसे होण्यास तुम्ही मला भाग पाडले तुमच्याकडून माझी प्रशंसा व्हावयाची होती. जरी मी काही नसलो तरी अतिश्रष्ठ प्रेषितांपेक्षा मी कमी नव्हतो.

1 थेस्सलनीकाकरांस 2:7

तरीही आम्ही तुमच्यामध्ये आई जशी प्रेमाने तिच्या मुलाला स्वत:चे दूध पाजते आणि काळजी घेते, तसे आम्ही तुमच्यात सौम्य होतो.

याकोब 3:2

मी तुम्हाला सावध करीत आहे, कारण आपण पुष्कळ पापे करतो आणि जर कोणी त्याच्या बोलण्यात चुका करीत नाही तर तो परिपूर्ण मनुष्य आहे.

याकोब 3:13

तुमच्यामध्ये कोण शहाणा व ज्ञानाने भरलेला आहे? त्याने त्याचे शहाणपण त्याच्या चांगल्या वागणुकीने दाखवावे. नम्रतेने केल्या जाणाऱ्या कृतीद्वारे त्याने आपले शहाणपण दाखवावे.

1 पेत्र 3:4

त्याऐवजी तुमची सुंदरता अंत:करणाची, जी कधीही नाश पावत नाही, अशी असली पाहिजे ती सौम्य, शांत स्वभावाची असली पाहिजे जी देवाच्या दृष्टीने अतिमौल्यवान आहे.

Interlinear

Choose Theme