Home Bibles यशया 60:21 · मराठी बायबल
यशया 60:21 · मराठी बायबल

“तुझे सर्व लोक सज्जन असतील. त्यांना कायमची भूमी मिळेल. मी त्या लोकांना निर्माण केले. मी माझ्या स्वत:च्या हातांनी तयार केलेली ती सुंदर रोपटी आहेत.

Cross references

2 शमुवेल 7:10

माझ्या इस्राएल लोकांसाठी मी जागेची निवड केली. त्यांना राहायला हक्काची जागा दिली. त्यांना रुजवले. त्यांना जागोजाग भटकंती करायला लागू नये म्हणून मी हे केले. पूर्वी मी त्यांच्यावर शास्ते नेमले पण दुर्जनांनी त्यांना त्रास दिला. आता तसे घडणार नाही. तुझ्या सर्व शंत्रूपासून मी तुला शांती देतो. मी तुला असे अभिवचन देतो की तुझे घराणे कायमचे राजघराणे होईल.

स्तोत्रसंहिता 37:11

विनम्र लोकांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल. आणि ते शांती व समाधानात जगतील.

स्तोत्रसंहिता 37:18

परमेश्वर शुध्द माणसांचे आयुष्यभर रक्षण करतो त्यांचे वतन सदैव त्याच्याजवळ राहाते.

स्तोत्रसंहिता 37:22

जर चांगल्या माणसाने लोकांना आशीर्वाद दिले तर त्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल परंतु जर त्याने त्यांच्या वाईटाची इच्छाप्रकट केली तर त्यांचा नाश होईल.

स्तोत्रसंहिता 37:29

चांगल्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल ते सतैव त्या जमिनीवर राहातील.

यशया 4:3

त्यावेळी सीयोन व यरूशलेम येथे जे लोक राहत असतील त्यांना पवित्र मानले जाईल. देवाची कृपा झाल्याने त्यांची नावे खास यादीत समाविष्ट केली गेली आहेत. त्या सर्व लोकांच्या बाबतीत हे घडेल. त्या सर्व यादीतील लोकांना जिवंत राहण्याची संमत्ती दिली जाईल.

यशया 19:25

सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या देशांवर कृपा करील. तो म्हणेल, “मिसरवासीयांनो, तुम्ही माझे आहात अश्शूरच्या रहिवाशांनो, तुम्हाला तर मीच घडवलय्! इस्राएलच्या लोकांनो, मी तर तुमचा स्वामी आहे. तुम्हासर्वांना माझे आशीर्वाद!”

यशया 29:23

तो त्याची सर्व मुले पाहील आणि तो माझ्या नावाला पवित्र म्हणेल. मी ह्या मुलांना स्वत:च्या हाताने घडविले आहे आणि ही मुले म्हणतील की याकोबाचा पवित्र देव हा असामान्य आहे. ही मुले इस्राएलाच्या देवाचा आदर करतील.

यशया 43:7

जी माणसे माझी आहेत, जी माझे नाव लावतात, त्या सर्वांना माझ्याकडे आण. मी त्या लोकांना माझ्यासाठी निर्मिले आहे मीच त्यांना घडविले व ते माझे आहेत.”

यशया 43:21

ह्या लोकांना मी निर्मिले आहे. ते माझी स्तुतिस्तोत्रे गातील.

यशया 44:23

परमेश्वराने महान गोष्टी केल्या म्हणून आकाश आनंदात आहे खोलवरची भूमीसुध्दा सुखात आहे. डोंगर गाण्यातून देवाचे आभार मानीत आहेत. रानातील सर्व वृक्ष आनंदात आहेत. का? कारण परमेश्वराने याकोबला वाचविले. परमेश्वराने इस्राएलसाठी फार मोठ्या गोष्टी केल्या.

यशया 45:11

परमेश्वर इस्राएलचा पवित्र देव आहे, त्याने इस्राएलची निर्मिती केली. परमेश्वर म्हणतो,“माझ्या मुलांनो, तुम्ही मला काही खूण दाखविण्यास सांगितले. मी केलेल्या गोष्टी दाखविण्याचा तुम्ही मला हुकूम दिला.

यशया 49:3

परमेश्वर मला म्हणाला, “इस्राएल, तू माझा सेवक आहेस. मी तुझ्याबाबत विस्मयकारक गोष्टी करीन.”

यशया 51:2

अब्राहाम तुमचा पिता आहे. तुम्ही त्याच्याकडे पाहावे. जिने तुम्हाला जन्म दिला त्या साराकडे तुम्ही पाहावे. मी बोलाविले तेव्हा अब्राहाम एकटा होता. मी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याने मोठ्या वंशाचा आरंभ केला. त्याचा वंश खूप वाढला.”

यशया 52:1

ऊठ, सियोन ऊठ. कपडे घालून तयार हो. बलशाली हो. पवित्र यरूशलेम, तुझी सुंदर वस्त्रे परिधान कर. ज्यांनी देवाला अनुसरायचे नाकारले आहेअसे लोक पुन्हा कधीही तुझ्यात प्रवेश करणार नाहीत. ते लोक शुध्द आणि निर्मळ नाहीत.

यशया 54:17

“लोक तुझ्याविरूध्द लढण्यासाठी शस्त्रे तयार करतील. पण ती शस्त्रे तुझा पराभव करणार नाहीत. काही लोक तुझ्याविरूध्द बोलतील पण जो असे बोलेल त्याला त्याची चूक दाखवून दिली जाईल.”देव म्हणतो, “देवाच्या सेवकांना काय मिळेल? त्यांना माझ्याकडून आलेल्या चांगल्या गोष्टी मिळतील.”

यशया 57:13

जेव्हा तुम्हाला मदतीची जरूर असते, तेव्हा तुम्ही तुमच्याभोवती जमविलेल्या खोट्या देवांची करूणा भाकता. पण मी तुम्हाला सांगतो की वाऱ्याची फुंकर सुध्दा त्या देवाना दूर उडवून देईल. झंझावात त्यांना तुमच्यापासून दूर नेईल. पण माझ्यावर विसंबणाऱ्याला जमीन मिळेल. माझा पवित्र डोंगर त्याचा होईल.

यशया 61:3

सियोनच्या दु:खी लोकांकडे देवाने मला पाठविले. मी त्यांना उत्सवासाठी तयार करीन. त्यांच्या डोक्यांवरची राख मी झटकून टाकीन आणि मी त्यांना मुकुट देईन. मी त्याचे दु:ख दूर करीन. त्यांना सुखाचे तेल देईन. मी त्यांचा शोक नाहीसा करीन आणि त्यांना सणासुदीची वस्त्रे घालायला देईन. देवाने मला त्या लोकांना ‘चांगले वृक्ष’ आणि ‘परमेश्वराची सुंदर रोपटी’ अशी नावे ठेवण्यासाठी पाठविले आहे.

यशया 61:7

“पूर्वीच्या काळी लोकांनी तुमची अप्रतिष्ठा केली, तुमची निंदा केली. इतर लोकांपेक्षा तुमची अप्रतिष्ठा जास्त झाली. म्हणून तुमच्या जमिनीतून तुम्हाला इतरांपेक्षा दुप्पट पीक मिळेल. तुम्हाला अखंड आनंद मिळेल.

यशया 62:4

‘देवाने त्याग केलेली माणसे’ असे तुम्हाला कधीही कोणी म्हणणार नाही. तुमच्या भूमीला ‘देवाने नाश केलेली’ असे कोणी केव्हाही म्हणणार नाही. उलट, तुम्हाला ‘देवाची आवडती माणसे’ असे म्हणतील तुमच्या भूमीला ‘देवाची वधू’ म्हणतील. का? कारण परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमची भूमी त्याच्या मालकीची आहे.

यशया 65:9

मी याकोबच्या (इस्राएलच्या) काही लोकांना ठेवीन. यहूदातील काही लोकांना माझा डोंगर मिळेल. माझे सेवक तेथे राहतील. तेथे राहण्यासाठी मी लोकांची निवड करीन.

यिर्मया 24:6

मी त्यांचे रक्षण करीन. मी त्यांना यहूदाला परत आणीन. मी त्यांचा नाश होऊ देणार नाही मी त्यांना परत उभे करीन. मी नुसतेच त्यांना वर काढणार नाही, तर त्यांना रुजवीन म्हणजे ते वाढू शकतील.

यिर्मया 32:41

ते मला प्रसन्न ठेवतील. त्यांचे भले करण्यात मला मौज वाटेल. मी त्यांना ह्या भूमीत रुजवीन आणि वाढवीन. मी माझ्या अंत:करणापासून हे करीन.”‘

यहेज्केल 11:17

म्हणून, परमेश्वर, त्यांचा प्रभू, त्यांना परत आणेल हे तू त्याना सांगितले पाहिजे. मी तुम्हाला इतर राष्ट्रांत विखुरले पण तुम्हाला एकत्र करीन आणि परत आणीन. इस्राएलची भूमी मी तुम्हाला परत देईन.

यहेज्केल 37:25

माझा सेवक, याकोब, याला मी दिलेल्या भूमीवर ते राहतील. तुमचे पूर्वज तेथेच राहात होते. आता माझी माणसे तेथे राहतील. ते, त्यांची मुले, नातवंडे कायमची तेथे राहतील. दावीद हा माझा सेवक त्यांचा कायमचा नेता असेल.

आमोस 9:15

मी माझ्या लोकांना त्यांच्या देशात रुजवीन. आणि मी त्यांना दिलेल्या भूमीतून ते पून्हा उपटले जाणार नाहीत. परमेश्वराने, तुमच्या परमेश्वराने, हे सांगितले आहे.

ओबद्या 1:17

पण सियोन पर्वतावर काही वाचलेले असतील. ते माझे खास लोक असतील. याकोबाचे राष्ट्रत्याच्या मालकीच्या गोष्टी परत स्वत:कडे घेईल.

सफन्या 3:13

“इस्राएलमधील जिवंत राहिलेले लोक वाईट कृत्ये करणार नाहीत. ते खोटे बोलणार नाहीत. खोट्याच्या आधारे ते इतरांना फसविणार नाहीत. चरुन आडव्या होणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे ते शांत राहतील त्यांना कोणीही त्रास देणार नाही.”

जखऱ्या 14:20

त्यावेळी, सर्व गोष्टी देवाच्या मालकीच्या असतील अगदी घोड्यांच्या सरंजामावरसुध्दा परमेश्वरासाठी पवित्र अशी चिठ्ठी असेल. परमेश्वराच्या मंदिरात वापरली जाणारी भांडी, वेदीवर वापरल्या जाणाऱ्या कटोऱ्यांइतकीच महत्वाची असतील.

मत्तय 5:5

जे नम्र ते धन्य, कारण त्यांना वचनदत्त भूमीचे वतन मिळेल.

मत्तय 15:13

पण त्याने उत्तर देऊन म्हटले, प्रत्येक रोपटे जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल.

योहान 15:2

तो माझ्यातील फळ न देणारी प्रत्येक फांदी तोडून टाकतो. ज्या प्रत्येक फांद्या फळ देतात त्यांनी अधिक फळ घावे म्हणून त्या द्राक्षवेलीला तो साफ करतो.

इफिसकरांस 1:6

त्याने हे त्याच्या गौरवी कृपेची स्तुति व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हांला फुकट दिली.

इफिसकरांस 1:12

यासाठी की, ज्या आम्ही ख्रिस्तावर अगोदरच आशा ठेवली होती, त्या आम्हांकडून त्याच्या गौरवाची स्तुति व्हावी.

इफिसकरांस 2:7

देवाने हे केले यासाठी की, येणाऱ्या युगात त्याच्या अतुलनीय कृपेची संपत्ती दाखविता यावी आणि ख्रिस्त येशूमध्ये आम्हांविषयीची ममता व्यक्त करावी.

इफिसकरांस 2:10

कारण आम्ही देवाच्या हाताने घडविलेले आहोत. ख्रिस्तामध्ये आम्हांला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अगोदरच तयार केले होते. यासाठी की, त्यामध्ये चालणे आम्हांला शक्य व्हावे.

2 थेस्सलनीकाकरांस 1:10

त्या दिवशी जेव्हा तो त्याच्या पवित्र लोकांत गौरविला जाण्यासाठी सर्व विश्वासणाऱ्याकडून आश्चर्यचकित केले जाण्यासाठी येईल तेव्हा त्यात तुमचाही समावेश आहे कारण त्याविषयी आम्ही सांगितलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला.

2 पेत्र 3:13

पण देवाच्या वचनाप्रमाणे, जथेचांगुलपणा वास करतो असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची आपण वाट पाहू.

प्रकटीकरण 5:10

तू त्यांना राज्य आणि पृथ्वीवर आपल्या देवासाठी याजक बनविले आणि नंतर ते पृथ्वीवर सत्ता गाजवितील”

Interlinear

Choose Theme