Home Bibles होशेय 8:10 · मराठी बायबल
होशेय 8:10 · मराठी बायबल

इस्राएल लोक इतर राष्ट्रांतील आपल्या ‘प्रियकरांकडे’ गेले. पण मी इस्राएलींना एकत्र गोळा करीन. पण त्या सामर्थ्यवान राजाच्या ओझ्यामुळे त्यांना थोडासा त्रास झालाच पाहिजे.

Cross references

2 राजे 14:26

इस्राएलचे दास काय किंवा स्वतंत्र माणसे काय, सर्वच अडचणीत आलेले आहेत, हे परमेश्वराने पाहिले. यातला कोणीच इस्राएलला वर आणण्याच्या पात्रतेचा नाही हे त्याने ओळखले

2 राजे 15:19

अश्शूरचा राजा पूल इस्राएलवर चाल करुन आला. तेव्हा पूलने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपले राज्य बळकट करावे या इराद्याने मनहेमने पूलला पंचाहत्तर पौंड चांदी दिली.

2 राजे 17:3

अश्शूरचा राजा शल्मनेसर होशेवर चाल करुन आला. तेव्हा होशे शल्मनेसरचा मांडलीक बनला. त्याला होशेने आपले रक्षण करावे म्हणून कर दिला.

2 राजे 17:4

पण होशेचे आपल्याविरुध्द कटकारस्थान चालू आहे हे अश्शूरच्या या राजाच्या लक्षात आले, कारण होशेने मिसरचा राजा सो याच्याकडे आपले दूत पाठवले होते. तसेच दरवर्षीप्रमाणे त्या वर्षी होशेने करही भरला नव्हता. तेव्हा अश्शूरच्या राजाने त्याला अटक करुन कैदेत टाकले.

1 इतिहास 5:26

इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल याच्या मनात लढाईवर जाण्याची इच्छा जागवली. पूल म्हणजेच तिल्गथ -पिल्नेसर. त्याने मनश्शे, रऊबेन आणि गाद घराण्यातील लोकांशी लढाई केली. त्यांना त्याने ते होते तिथून हुसकावून लावले आणि कैदी केले. पूलने मग त्यांना हलह, हाबोर, हारा आणि गोजान नदीजवळ आणले. तेव्हा पासून आजतागायत इस्राएलाच्या त्या घराण्यांतील लोक तेथे राहत आहेत.

यशया 10:8

कदाचित् आपण जिंकलेल्या आणि त्याच्या हुकमतीखाली असलेल्या प्रदेशांच्या राजांचा अश्शूर येथे निर्देश करत असेल. अश्शूर स्वत:शीच म्हणतो, ‘माझे सर्व राजपुत्र राजेच नाहीत का?

यशया 30:2

ही मुले मिसरकडे मदत मागायला जात आहेत. पण ते जे करीत आहेत, ते योग्य आहे का; असे मला विचारावे, असे त्यांना वाटत नाही. फारो त्यांचा बचाव करील असे त्यांना वाटते. मिसरने त्यांचे रक्षण करावे अशी त्यांची इच्छा आहे.

यशया 36:13

नंतर सेनापती उभा राहिला व खूप मोठ्या आवाजात यहुदी भाषेत बोलला.

यिर्मया 42:2

ते सर्वजण यिर्मयाला म्हणाले, “यिर्मया, कृपया आमची विनंती मान्य कर. यहूदाच्या कुळातील वाचलेल्या सर्व लोकांसाठी परमेश्वराकडे तुझ्या परमेश्वराकडे प्रार्थना कर. यिर्मया, आमच्यापैकी फारच थोडे वाचले आहेत, हे तुला दिसतेच आहे. एकेकाळी आम्ही संख्येने जास्त होतो.

यहेज्केल 16:33

बहुतेक वेश्या पुरुषांना पैसे देण्यास भाग पाडतात. पण तूच सर्व प्रियकरांना पैसे दिलेस. तू व्यभिचारासाठी तुझ्याकडे बोलविलेल्या सर्व पुरुषांना पैसे दिलेस.

यहेज्केल 16:37

म्हणून मी तू ज्यांच्यावर प्रेम केलेस, त्या तुझ्या सर्व प्रियकरांना आणि ज्यांचा तू तिरस्कार करतेस त्यांना, एकत्र आणीन आणि तुझे नग्न शरीर पाहू देईन.तुझे संपूर्ण नग्न शरीर ते पाहतील.

यहेज्केल 22:20

कामगार चांदी, कास्य, लोखंड, शिसे व कथील आगीत टाकतात. फुंकून विस्तव फुलवितात. मग घातू वितळू लागतो. त्याचप्रमाणे, मी तुम्हाला माझ्या आगीत टाकून वितळवीन. माझा भयंकर क्रोध हीच ती आग होय.

यहेज्केल 23:9

मी तिच्या प्रियकरांना तिच्या बरोबर व्यभिचार करु दिला. तिला अश्शुरी पाहिजे होते, म्हणून मी तिला त्यांच्या स्वाधीन केले.

यहेज्केल 23:22

म्हणून, अहलीबा, परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो ‘तुला तुझ्या प्रियकरांची किळस वाटते. पण मी त्यांना येथे आणीन. ते तुझ्याभोवती कोंडाळे करतील.

यहेज्केल 23:46

परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला, “लोकांना एकत्र करा. मग त्या लोकानाच अहला व अहलीबा यांना शिक्षा करु द्या. लोकांचा जमाव त्यांना शिक्षा करील व त्या दोघींची चेष्टा करील.

यहेज्केल 26:7

परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो, “सोरवर उत्तरेकडून शत्रू आणीन. तो म्हणजेच बाबेलचा राजाधिराज नबुखद्नेस्सर होय. तो प्रंचड सैन्य घेऊन येईल. त्यात घोडे, रथ, घोडेस्वार व इतर पुष्कळ सैनिक असतील. ते सैनिक पुष्कळ वेगवेगळ्या राष्ट्रांतील असतील.

दानीएल 2:37

राजा तू सर्वांमध्ये मोठा राजा आहेस. स्वर्गातल्या देवाने तुला राज्य, सत्ता, सामर्थ्य व वैभव दिले आहे.

होशेय 10:10

मी त्यांना शिक्षा करण्यासाठी येईन सैन्ये त्यांच्या विरोधात गोळा होतील. ती इस्राएलींच्या दोन्ही पापाबंद्दल त्यांना शिक्षा करतील.

होशेय 12:2

परमेश्वर म्हणतो, “माझे इस्राएलशी भांडण आहे. याकोबला त्याच्या कर्मांबद्दल सजा मिळालीच पाहिजे. त्याने केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे.

हाग्गय 2:6

का? कारण सर्वशक्तिमान परमेश्वर हे सांगत आहे. अगदी थोड्या वेळात मी पुन्हा एकदा सर्व गोष्टी हलवून सोडीन आकाश आणि पृथ्वी कंपित करीन समुद्र आणि कोरडी जमीन यांना कंपित करीन.

Interlinear

Choose Theme