Home Bibles 1 इतिहास 5:26 · मराठी बायबल
1 इतिहास 5:26 · मराठी बायबल

इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल याच्या मनात लढाईवर जाण्याची इच्छा जागवली. पूल म्हणजेच तिल्गथ -पिल्नेसर. त्याने मनश्शे, रऊबेन आणि गाद घराण्यातील लोकांशी लढाई केली. त्यांना त्याने ते होते तिथून हुसकावून लावले आणि कैदी केले. पूलने मग त्यांना हलह, हाबोर, हारा आणि गोजान नदीजवळ आणले. तेव्हा पासून आजतागायत इस्राएलाच्या त्या घराण्यांतील लोक तेथे राहत आहेत.

Cross references

2 शमुवेल 24:1

इस्राएलवर परमेश्वराचा पुन्हा एकदा कोप झाला. आणि त्याने दावीदाला इस्राएलांविरुध्द चेतवले. दावीद म्हणाला, “आधी इस्राएल आणि यहूदा यांची शिरगणती करा.”

2 राजे 15:19

अश्शूरचा राजा पूल इस्राएलवर चाल करुन आला. तेव्हा पूलने आपल्याला पाठिंबा द्यावा आणि आपले राज्य बळकट करावे या इराद्याने मनहेमने पूलला पंचाहत्तर पौंड चांदी दिली.

2 राजे 15:29

अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करुन आला. पेकह इस्राएलचा राजा होता तेव्हा हे घडले. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल, बेथ माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांना कैद करुन अश्शूरला नेले.

2 राजे 16:7

अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याच्याकडे आहाजने दूतामार्फत संदेश पाठवला की, “मी तुझा दास आहे, तुझ्या मुलासारखाच आहे. अराम आणि इस्राएलचे राजे माझ्यावर चाल करुन आले आहेत. तेव्हा माझ्या मदतीला ये आणि मला वाचव.” यहूदाचा राजा आहाज

2 राजे 17:6

होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन हस्तगत केले. इस्राएल लोकांना त्याने कैद करुन अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे तसेच गोजानमधील हाबोर नदीजवळ आणि मेदीलोकांच्या नगरात ठेवले.

2 राजे 18:11

अश्शूरच्या राजाने इस्राएल लोकांना कैद करुन अश्शूरला नेले. त्यांना त्याने हलहा येथे, गोजनमधील हाबोर नदीजवळ आणि मेदी नगरांमध्ये ठेवले.

2 राजे 19:12

त्या राष्ट्रांच्या देवतांनी त्यांचे रक्षण केले नाही. माझ्या पुर्वजांनी त्यांची धूळधाण केली. गोजान, हारान, रेसफ आणि तलस्सरातील एदेन हे त्यांनी नष्ट केले.

1 इतिहास 5:6

बालचा मुलगा बैरा. अश्शूरचा राजा तिल्गथ-पिल्नेसर याने बैराला आपल्या घरातून पिटाळून लावले. आणि कैद केले. बैरा हा रऊबेनी घराण्याचा अधिकारी पुरुष होता.

1 इतिहास 5:22

बरेच हग्री लोक मारले गेले कारण देवाने रऊबेनींना लढाई जिंकायला मदत केली. यानंतर मनश्शे, रऊबेन आणि गाद लोक हग्री लोकांच्या भूप्रदेशात राहू लागले. बाबिलोन लोकांनी इस्राएलांवर विजय मिळवून त्यांना कैद करुन नेईपर्यंत हे लोक तिथेच राहिले.

2 इतिहास 30:6

त्यामुळे निरोप्यांनी राजाचा संदेश इस्राएल आणि यहूदाभर फिरवला. त्याचा मसुदा असा होता:इस्राएल लोक हो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल (याकोब) यांच्या परमेश्वर देवाकडे परत फिरा. म्हणजे अश्शूर राजांच्या तावडीतून सुटून जे सुखरुप राहिले आहेत त्यांना परमेश्वर जवळ करील.

2 इतिहास 33:11

तेव्हा अश्शूरच्या राजाच्या सेनापतीकरवी परमेश्वराने यहूदावर हल्ला केला. या सेनापतींनी मनश्शेला आकड्यांनी जखडून पकडले. त्याच्या हातात पितळी बेड्या ठोकल्या. अशा रितीने मनश्शेला कैद करुन त्यांनी बाबेलला नेले.

एज्रा 1:5

तेव्हा यहूदा व बन्यामीनच्या घराण्यातील वडीलधाऱ्यांनी यरुशलेमला निघायची तयारी केली; मंदिर बांधण्यासाठी ते यरुशलेमला चालले होते. ज्यांना ज्यांना देवाने प्रेरणा दिली होती असे सगळेच यरुशलेमला जायला तयार झाले.

यशया 10:5

देव म्हणेल, “मी अश्शूरचा उपयोग छडीप्रमाणे करीन. रागाच्या भरात मी अश्शूरकडून इस्राएलला शिक्षा करीन.

यशया 13:2

देव म्हणाला,“जेथे काहीही उगवत नाही अशा ओसाड डोंगरावर ध्वज उभारा. लोकांना हाका मारा. हातांनी खुणा करा. त्यांना प्रतिष्ठितासाठी असलेल्या दारातून प्रवेश करायला सांगा.”

यशया 37:12

त्या सर्व पराभूत झालेल्या लोकांना त्यांच्या देवांनी वाचविले का? नाही माझ्या पूर्वजांनी त्यांचा नाश केला. माझ्या सैन्याने गोजान, हारान, रेसफ व तलस्सारातील एदेनमध्ये राहणाऱ्या लोकांचा पराभव केला.

Interlinear

Choose Theme