Home Bibles हाग्गय 2:6 · मराठी बायबल
हाग्गय 2:6 · मराठी बायबल

का? कारण सर्वशक्तिमान परमेश्वर हे सांगत आहे. अगदी थोड्या वेळात मी पुन्हा एकदा सर्व गोष्टी हलवून सोडीन आकाश आणि पृथ्वी कंपित करीन समुद्र आणि कोरडी जमीन यांना कंपित करीन.

Cross references

ईयोब 9:6

पृथ्वीचा थरकाप करण्यासाठी देव भूकंप पाठवतो. देव पृथ्वीचा पायाच हलवून टाकतो.

स्तोत्रसंहिता 37:10

थोड्याच काळानंतर इथे दुष्ट लोक राहाणार नाहीत. तू त्यांना शोधण्याचा प्रयत्न करु शकतोस पण ते निघून गेलेले असतील.

यशया 10:25

पण थोड्या काळात माझा राग शांत होईल. अश्शूरने तुम्हाला दिलेली शिक्षा मला पुरेशी वाटेल.”

यशया 13:13

माझ्या रागाने मी आकाशाला हलवेन व पृथ्वी तिच्या स्थानावरून ढळविली जाईल.”हे सर्व, सर्वशक्तिमान परमेश्वर रागावेल तेव्हा घडून येईल.

यशया 29:17

हे सत्य आहे: काही काळानंतर कर्मेलच्या डोंगरावरील भूमीप्रमाणे लबानोनची भूमी सुपीक होईल आणि कर्मेलच्या भूमीवर घनदाट जंगल माजेल.

यशया 34:4

आकाश कागदाच्या गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल. द्राक्षाच्यावेलीवर ची सुकलेलीपाने वा सुकलेलीअंजिरे अंजिराच्या झाडावरून गळून पडावीत त्या प्रमाणे तारे गळून पडतील. आकाशातील सर्व तारे वितळून जातील.

यिर्मया 4:23

मी पृथ्वीकडे पाहिले. पृथ्वी उजाड आणि अस्ताव्यस्त होती. पृथ्वीवर काहीही नव्हते. मी आकाशाकडे पाहिले त्याचा प्रकाश गेला होता.

यिर्मया 51:33

सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव म्हणतो, “बाबेल म्हणजे जणू काही खळे आहे. सुगीच्या वेळी लोक फोलकटापासून दाणे वेगळे करण्यासाठी धान्य झोडपतात आणि बाबेलला झोडपण्याची वेळ लवकरच येत आहे.”

यहेज्केल 38:20

त्या वेळी सर्व सजीव भीतीने कापतील. समुद्रातील मासे, हवेत भराऱ्या मारणारे पक्षी, रानातील हिंस्र प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे पक्षी, रानातील हिंस्र प्राणी आणि जमिनीवर सरपटणारे सर्व छोटे जीव आणि सर्व माणसे ह्यांच्या भीतीने थरकाप उडेल. पर्वत व कडे कोसळतील. प्रत्येक भिंत जमीनदोस्त होईल.”

योएल 2:30

मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक खुणा दाखवीन तेथे रक्त, आग व दाट धूर दिसेल.

योएल 3:16

परमेश्वर देव सियोनेहून गर्जना करील तो यरुशलेमहून ओरडेल. आणि आकाश व पृथ्वी कापेल पण परमेश्वराच्या लोकांना तो सुरक्षित स्थान असेल. इस्राएलच्या लोकांना तो सुरक्षित जागा असेल.

हाग्गय 2:21

“राज्यपाल जरुब्बाबेलकडे जा. त्याला सांग की मी आकाश-पृथ्वी हालवीन.

मत्तय 24:29

“छळानंतर लगेच, असे घडेल:‘सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही. आकाशातील तारे व नक्षत्रे गळून पडतील आकाशातील सर्व शक्ती डळमळतील. आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.

मार्क 13:24

“परंतु त्या दिवसांत ही संकट येऊन गेल्यावर, ‘सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही.

लूक 21:25

“सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील.

प्रेषितांचीं कृत्यें 2:19

वर आकाशात मी अद्भुत गोष्टी दाखवीन, खाली पृथ्वीवर मी पुरावे देईन. तेथे रक्त, अग्नि आणि दाट धूर असतील.

इब्री लोकांस 10:37

आता अगदी थोडक्या अवधीनंतर,“जो येणारा आहे, तो येईल, तो उशीर लावणार नाही.

इब्री लोकांस 12:26

त्यावेळेस त्याच्या आवाजाने भूमि हादरली पण आता त्याने असे अभिवचन दिले आहे की, “पुन्हा एकदा मी केवळ पृथ्वीच नव्हे तर आकाशही हादरवून टाकीन.”

प्रकटीकरण 6:2

मी पाहिले आणि तेथे माइयासमोर पांढरा घोडा होता. घोडेस्वारानेधनुष्य धरले होते. त्याला मुगुट देण्यात आला होता. तो निघाला, शत्रूचा पराभव करीत निघाला, तो विजयमिळविण्यासाठी निघाला.

प्रकटीकरण 8:5

मग देवदूताने धुपाटणे घेऊन, वेदीवरील अग्नीने ते भरले व ते पृथ्वीवर टाकले तेव्हा विजा चमकूलागल्या. मेघांचा गडगडाट व इतर आवाज झाले. आणि भूकंप झाला.

प्रकटीकरण 11:9

साडेतीन दिवसांपर्यंत प्रत्येक वंशाचे. जमातीचे, भाषेचे आणि राष्ट्राचे लोक त्या साक्षीदारांच्याशरीरांकडे पाहतील. पण त्यांना पुरण्यास नकार देतील.

Interlinear

Choose Theme