Home Bibles होशेय 4:2 · मराठी बायबल
होशेय 4:2 · मराठी बायबल

लोक शपथ घेतात, खोटे बोलतात, ठार मारतात आणि चोरी करतात ते व्यभिचाराचे पाप करतात आणि त्यांना मुले होतात ते पून्हा पून्हा खून करतात.

Cross references

यशया 24:5

ह्या देशातील लोकांनी देशाला ओंगळ केले. हे कसे झाले? देवाच्या शिकवणुकी विरूध्द जाऊन त्यांनी चुकीचे आचरण केले. देवाचे नियम त्यांनी मानले नाहीत. पूर्वी लोकांनी देवाबरोबर करार केला पण ती त्यांनीच मोडला.

यशया 48:1

परमेश्वर म्हणतो, “याकोबाच्या वंशजांनो, माझे ऐका. तुम्ही, जे ‘इस्राएलच्या’ नावाने ओळखले जाता. तुम्ही यहुदाच्या वंशातील आहात. तुम्ही वचने देताना परमेश्वराचे नाव घेता. तुम्ही इस्राएलच्या देवाची स्तुती करता. पण हे तुम्ही सच्चे पणाने आणि खरेपणाने करीत नाही.”

यशया 59:2

तुमच्या पापांनी देवाचे तोंड लपवले आहे. त्यामुळे तो तुमचे बोलणे ऐकत नाही.

यशया 59:12

का? कारण आम्ही देवाविरूध्द वागून खूप खूप पापे केली. आपली पापे आम्ही चुकलो ते दाखवितात. ह्या गोष्टी करून आम्ही अपराध केला हे आम्हाला माहीत आहे.

यिर्मया 5:1

परमेश्वर म्हणतो, “यरुशलेमच्या रस्त्यावरुन चाला. सभोवती पाहा आणि या गोष्टींचा विचार करा. नगरातील चव्हाटे शोधा. जो सत्याचा शोध घेतो, जो सच्चेपणाने वागतो असा एखादा सज्जन माणूस सापडू शकतो का ते पाहा. जर तुम्हाला एक तरी सज्जन व सत्यशील माणूस सापडला तरी मी यरुशलेमला क्षमा करीन.

यिर्मया 5:2

लोक शपथ घेतात आणि म्हणतात, ‘परमेश्वर असेपर्यंत.’ पण ते काही त्यांच्या मनात नसते.”

यिर्मया 5:7

देव म्हणाला, “यहूदा, मी तुला क्षमा करावी म्हणून तू मला एक तरी सबळ कारण सांग. तुझ्या मुलांनी माझा त्याग केला. त्यांनी मूर्तींपुढे शपथा वाहिल्या. पण त्या मूर्ती म्हणजे खरे देव नव्हेत. तुझ्या मुलांना पाहिजे ते सर्व मी दिले. पण तरी त्यांनी माझा विश्वासघात केला. त्यांनी आपला बराच वेळ वारांगनेबरोबर घालविला.

यिर्मया 5:26

माझ्या माणसांत काही दुष्ट आहेत. ते फासेपारध्यांप्रमाणे आहेत. हे लोक जाळे पसरवितात, पण पक्ष्यांना पकडण्या ऐवजी ते माणसांना पकडतात.

यिर्मया 6:7

जशी विहीर आपले पाणी ताजे ठेवते, तशीच यरुशलेम आपला दुष्टपणा ताजा ठेवते. मी नेहमीच येथील लूटमार व हिंसाचार याबद्दल ऐकतो. मी येथे सदोदित पीडा आणी घृणा पाहतो.

यिर्मया 7:6

तुम्ही अपरिचिताशीसुध्दा प्रामाणिकपणे वागले पाहिजे. विधवांसाठी आणि अनाथांसाठी तुम्ही योग्य गोष्टी केल्या पाहिजेत. निरपराध्यांना मारु नका. दुसऱ्या देवांना अनुसरु नका. का? कारण ह्या गोष्टी तुमच्या आयुष्याचा नाश करतील.

यिर्मया 9:2

जर वाळवंटात माझी धर्मशाळा असती तर मी माझ्या लोकांना सोडून त्यांच्यापासून खूप दूर जाऊ शकलो असतो. का? कारण त्यांनी सर्वांनी देवाचा विश्वासघात केला आहे. ते देवाच्या विरुद्ध गेले आहेत.

यिर्मया 23:10

व्यभिचाराचे पाप केलेल्या लोकांनी यहूदा भरुन गेला आहे. लोकांनी अनेक मार्गांनी निष्ठेचा त्याग केला आहे. परमेश्वराने शाप दिला आणि ही भूमी ओसाड झाली. कुरणातील हिरवळ वाळून मरत आहे. शेते वाळवंटाप्रमाणे झाली आहेत. संदेष्टे दुष्ट आहेत ते त्यांचे बळ (वजन) व शक्ती चुकीच्या पद्धतीने वापरतात.

विलापगीत 4:13

यरुशलेमच्या संदेष्ट्यांनी पाप केले, धर्मगुरुंनी दुष्कृत्ये केली, लोकांनी प्रामाणिक माणसांचे रक्त यरुशलेममध्ये सांडले, म्हणूनच असे घडले.

यहेज्केल 22:2

“मानवपुत्रा, तू न्याय करशील का? खुन्यांच्या नगरीचा यरुशलेमचा तू न्यायनिवाडा करशील का? तिने केलेल्या भयंकर गोष्टीबद्दल तू तिला सांगशील का?

यहेज्केल 22:25

यरुशलेममधील संदेष्टे कट करीत आहेत. ते संदेष्टे सिंहासारखे आहेत. शिकारीचा समाचार घेताना तो गर्जना करतो. त्या संदेष्टांनी खूप आयुष्यांचा नाश केला, त्यांनी पुष्कळ किंमती वस्तू बळकावल्या आहेत, यरुशलेममधील अनेक स्त्रियांच्या वैधव्याला ते कारणीभूत झाले.

होशेय 5:2

तुम्ही पुष्कळ वाईट कृत्ये केली आहेत, म्हणून मी तुम्हा साऱ्याना शिक्षा करीन.

होशेय 6:9

लुटारू ज्याप्रमाणे कोणावर तरी हल्ला करण्यासाठी वाट बघत लपून बसतात, त्याचप्रमाणे धर्मगुरु शेखमला जाणाव्या रस्त्यावर वाटसंरूची वाट बघतात. त्यांनी दुष्कृर्त्ये केली आहेत.

होशेय 7:1

“मी इस्राएलला बरे करीन.मगच लोकांना एफ्राईमच्या पापाविषयी कळून येईल. लोकांना शोमरोनाचा खोटेपणाही समजेल. त्या नगरीत ये जा करणाऱ्या चोरांबद्दलही लोकांना समजेल.

होशेय 7:3

त्यांची दुष्कृत्ये त्यांत्या राजाला आनंद देतात. त्यांची दैवते त्यांच्या नेत्यांना खूश करतात.

होशेय 10:4

ते वचने देतात पण ते फक्त खोटो बोलत असतात. ते आपला शब्द पाळत नाहीत. ते दुसऱ्या देशांबरोबर करार करतात. परमेश्वराला ते करार आवडत नाहीत. न्यायाधीश नांगरलेल्या शेतात वाढणाऱ्या विषारी तणाप्रमाणे आहेत

होशेय 12:14

पण एफ्राईम परमेश्वराच्या रागास कारणीभूत झाला एफ्राईमने अनेक लोकांना ठार केले. म्हणून त्याला त्याच्या अपराधांबद्दल शिक्षा होईल. त्याचा प्रभू (परमेश्वर) त्याला अपमान सहन करायला लावील.”

मीखा 2:1

पाप करण्याचे बेत करणाऱ्यांवर संकट येईल. ते लोक आपल्या शय्येवर दुष्ट बेत करीत पडतात आणि सकाळी फटफटताच, योजलेली वाईट कर्मे करतात. का? कारण त्यांच्या इच्छेप्रमाणे करण्याचे सामर्थ्य त्यांच्या हाती आहे म्हणून.

मीखा 3:2

पण तुम्ही चांगल्याचा तिरस्कार करता आणि वाईटावर प्रेम करता. तुम्ही लोकांची चामडी सोलता. त्यांच्या हाडांवरुन मांस ओढून काढता.

मीखा 3:9

याकोबच्या नेत्यांनो आणि इस्राएलच्या शास्त्यांनो, माझे ऐका! तुम्ही योग्य चालीरीतीचा तिरस्कार करता. सरळ गोष्टीला तुम्ही वाकडी करता.

मीखा 6:10

वाईट माणसे, त्यांनी चोरलेली संपत्ती, अजून लपवितात का? ज्यांच्या टोपल्या अतिशय लहान आहेत, त्यांना हे वाईट लोक अजूनही फसवितात का? होय या सर्व गोष्टी अजूनही होत आहेत.

मीखा 7:2

ह्याचाच अर्थ, सर्व प्रामाणिक लोक गेलेत. ह्या देशात चांगले लोक उरले नाहीत. प्रत्येकजण कोणाला तरी ठार मारण्यासाठी टपला आहे. प्रत्येकजण आपल्या भावाला सापळ्यात अडकविण्याच्या प्रयत्नात आहे.

सफन्या 3:1

यरुशलेम, तुझे लोक देवाविरुध्द लढले. त्यांनी दुसऱ्यांना दुखाविले आणि तुला पापाचा डाग लागला.

जखऱ्या 5:3

तेव्हा देवदूताने मला सांगितले, “त्या पटावर एक शाप लिहिला आहे. पटाच्या एका बाजूवर जे लोक चोरी करतात त्यांच्यासाठी शाप आहे. आणि दुसऱ्या बाजूवर जेलोक वचन देताना खोटे बोलतात त्यांच्यासाठी शाप आहे.

जखऱ्या 7:9

सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की “जे योग्य व न्याय्य आहे तेच तुम्ही करा. एकमेकांवर दया करा. एकमेकांना करुणा दाखवा.

मत्तय 23:35

म्हणून ज्या चांगल्या लोकांचा वध या पृथ्वीवर झाला त्या सर्वांसाठी तुम्ही दोषी ठराल. हाबेल या चांगल्या मनुष्याच्या वधासाठी तुम्ही दोषी ठराल. आणि तुम्ही बरख्याचा पुत्र जखऱ्याला जिवे मारण्याविषयी दोषी ठराल. त्याला मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये मारले होते. हाबेलाच्या काळापासून ते जखऱ्याच्याकाळापर्यंत जे जे चांगले लोक मारण्यात आले, त्यांच्या वधाविषयी तुम्ही दोषी ठराल.

प्रेषितांचीं कृत्यें 7:52

तुमच्या वाडवडिलांनी छळ केला नाही, असा कोणी एखादा भविष्यवादी होऊन गेला काय? एक धार्मिक (रिव्रस्त) येणार अशी घोषणा करणाऱ्यांचा त्यांनी वध केला. आणि आता तर तुम्ही त्याचा ही (रिव्रस्ताचा) विश्वासघात व खून केलात.

1 थेस्सलनीकाकरांस 2:15

त्यांनी प्रभु येशूला आणि संदेष्ट्यांना मारले, त्यांनी आम्हांला बाहेर हाकलून लावले, ते देवाला संतोष देत नाहीत आणि ते सर्व लोकांच्या विरुद्ध आहेत.

प्रकटीकरण 17:6

मी पाहिले ती स्त्री रक्तसेवनाने मस्त झाली होती. ती देवाच्या पवित्र लोकांचे रक्त प्याली होती. ज्या लोकांनी येशूविषयीसांगितले त्याचे रक्त ती प्याली होती.जेव्हा मी तिला पाहिले तेव्हा फार आश्चर्यचकित झालो.

Interlinear

Choose Theme