Home Bibles प्रेषितांचीं कृत्यें 7:52 · मराठी बायबल
प्रेषितांचीं कृत्यें 7:52 · मराठी बायबल

तुमच्या वाडवडिलांनी छळ केला नाही, असा कोणी एखादा भविष्यवादी होऊन गेला काय? एक धार्मिक (रिव्रस्त) येणार अशी घोषणा करणाऱ्यांचा त्यांनी वध केला. आणि आता तर तुम्ही त्याचा ही (रिव्रस्ताचा) विश्वासघात व खून केलात.

Cross references

1 शमुवेल 8:7

परमेश्वर त्याला म्हणाला, “लोक म्हणतात तसे कर. त्यांनी काही तुला नाकारलेले नाही. त्यांनी माझा धिक्कार केला आहे. त्यांना मी राजा म्हणून नको आहे.

1 राजे 19:10

एलीया म्हणाला, “सर्व शक्तिमान परमेश्वर देवा, मी आतापर्यंत तुझीच सेवा करत आलेलो आहे. माझ्याकडून होईल तितके मी केले पण इस्राएलच्या लोकांनी तुझ्याशी केलेल्या कराराचा भंग केलेला आहे. त्यांनी तुझ्या वेदीचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना मारले. मीच एकटा काय तो अजून जिवंत आहे. पण आता ते माझ्याही जिवावर उठले आहेत.”

1 राजे 19:14

एलीया म्हणाला, “सर्व शक्तिमान परमेश्वर देवा, आतापर्यंत मी तुझ्याच सेवेत आयुष्य घालवले आहे. पण इस्राएल लोकांनी आपला करार मोडला आहे. त्यांनी तुझ्या वेदींचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना ठार केले. मीच काय तो अजून जिवंत आहे. आणि आता ते माझ्या जिवावर उठलेत.”

2 इतिहास 24:19

लोकांना परत आपल्याकडे वळवायला परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्ट्यांना पाठवले. संदेष्ट्यांनी लोकांना परमेश्वराच्या क्रोधाची पूर्वकल्पना दिली पण लोक ऐकेनात.

2 इतिहास 36:16

पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले.

नहेम्या 9:26

आणि मग ते तुझ्यावर उलटले. तुझ्या शिकवणीचा त्यांनी त्याग केला, त्यांनी तुझ्या संदेष्ठ्यांचा वध केला. या संदेष्ट्यांनी लोकांना सावध केले होते. त्यांना ते परत तुझ्या मार्गावर आणू पाहात होते. पण आमच्या पूर्वजांनी मात्र तुझ्याविरुद्ध भयंकर दुराचरण केले.

यिर्मया 2:30

“यहूदातील लोकांनो, मी तुम्हाला शिक्षा केली, पण त्याचा काही फायदा झाला नाही. तुम्हाला शिक्षा झाल्यावरही तुम्ही परत आला नाहीत तुमच्याकडे आलेल्या संदेष्ट्यांना तुम्ही तलवारीने मारले. तुम्ही धोकादायक सिंहासारखे होता. तुम्ही संदेष्ट्यांना ठार मारले.”

यिर्मया 20:2

म्हणून त्यांने यिर्मया या संदेष्ट्याला मारले व लाकडाच्या मोठ्या ठोकळ्यात त्याचे हातपाय अडकविले. मंदिराच्या वरच्या प्रवेशद्वाराजवळ बन्यामीनच्या प्रवेशद्वाराजवळ हे घडले.

यिर्मया 26:15

पण तुम्ही मला ठार मारलेत, तर एका गोष्टीची खात्री बाळगा. निरपराध माणसाला मारल्याबद्दल तुम्ही अपराधी ठराल. तुम्ही ह्या नगरीला आणि तिच्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसालाही अपराधी बनवाल. परमेश्वराने खरोखरीच मला तुमच्याकडे पाठविले आहे. तुम्ही ऐकलेला संदेश खरेच परमेश्वराकडूनच आलेला आहे.”

यिर्मया 26:23

त्या माणसांनी उरीयाला मिसरहून परत आणले. ते त्याला यहोयाकीम राजाकडे घेऊन गेले. यहोयाकीमने उरीयाला तलवारीने मारण्याचा हुकूम दिला. नंतर गरीब लोकांच्या दफनभूमीत त्याचे प्रेत फेकण्यात आले.

जखऱ्या 9:9

सियोन, आनंदोत्सव कर! यरुशलेमवासीयांनो, आनंदाने जल्लोश करा! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे येत आहे. तो विजयी व चांगला राजा आहे. पण तो विनम्र आहे. एका गाढवीच्या शिंगरावर, तो स्वार झाला आहे.

मत्तय 5:12

आनंद करा आणि उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण जे संदेष्टे तुमच्यापूर्वी होते त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.(मार्क 9:50; लूक 14:34-35)

मत्तय 21:35

परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या नोकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले.

मत्तय 23:31

पण ज्यांनी ज्यानी त्यांना जिवे मारले. त्यांचेच तुम्ही वंशज आहात याचा पुरावा तुम्ही देता.

लूक 11:47

तुमचा धिक्कार असो, कारण तुमच्या पूर्वजांनी ठार केलेल्या भविष्यवाद्यांसाठी तुम्ही कबरा बांधता.

लूक 13:33

तरीही आज, उद्या आणि परवा मला पुढे गेले पाहिजे कारण संदेष्टयांने यरुशलेमाबाहेर मरणे ह्याचा विचार करणे चूक आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 2:23

तुमच्याकरिता येशूला देण्यात आले आणि तुम्ही त्याला जिवे मारले. वाईट लोकांच्या मदतीने तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले. परंतु हे सर्व होणार हे देव जाणून होता, ती देवाचीच याजना होती. फार पूर्वीच देवाने ही योजना तयार केली होती.

प्रेषितांचीं कृत्यें 3:14

येशू शुद्ध आणि चांगला (निष्पाप) होता. परंतु तुम्ही म्हणाला तुम्हाला तो नको, तुम्ही पिलाताला सांगितले की येशूऐवजी आम्हांला एक खुनी दे.

प्रेषितांचीं कृत्यें 3:18

देवाने सांगितले या गोष्टी घडतील. देवाने भविष्यवाद्यांकरवी हे सांगितले की, त्याचा ख्रिस्त दु:खसहन करील व मरेल. मी तुम्हांला सांगितलेले आहे की, देवाने हे कसे घडवून आणले.

प्रेषितांचीं कृत्यें 3:24

शमुवेल व इतर संदेष्टे (भविष्यावादी) जे शमुवेलानंतर झाले, जे देवासाठी बोलले, ते या आताच्या काळाविषयी बोलले.

प्रेषितांचीं कृत्यें 4:10

तुम्ही सर्वांनी आणि यहूदी लोकांनी समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे, ती ही की, नासरेथच्या येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने हा मनुष्य बरा झाला! तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले. देवाने त्याला मरणातून उठविले. हा मनुष्य लंगडा होता, पण आता तो चांगला झाला आहे. आणि येशूच्या सामर्थ्यामुळे तुमच्यासमोर उभा राहू शकत आहे!

प्रेषितांचीं कृत्यें 5:28

तो म्हणाला, “आम्ही तुम्हांला (येशू) या मनुष्याच्या नावाने शिक्षण देऊ नका म्हणून ताकीद दिली होती. आणि तरीही तुम्ही तुमच्या शिकवणुकीचा प्रसार सर्व यरुशलेमभर केलात. आणि या मनुष्याच्या (येशूच्या) मरणाचा दोष आमच्यावर ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात.”

प्रेषितांचीं कृत्यें 22:14

तो म्हणाला, ‘आपल्या पूर्वजांच्या (वाडवडिलांच्या) देवाने तुला निवडले आहे, यासाठी की त्याची इच्छा तुला कळावी. त्या धार्मिकाला तू पहावेस. आणि त्याच्या तोंडचे शब्द तुला ऐकायला मिळावेत.

1 थेस्सलनीकाकरांस 2:15

त्यांनी प्रभु येशूला आणि संदेष्ट्यांना मारले, त्यांनी आम्हांला बाहेर हाकलून लावले, ते देवाला संतोष देत नाहीत आणि ते सर्व लोकांच्या विरुद्ध आहेत.

1 पेत्र 1:11

ख्रिस्ताचा आत्मा त्यांच्यामध्ये राहात होता. ते शोध घेत होते की कोणत्या वेळी व कोणत्या परिस्थितीत ख्रिस्ताच्या दु:खाचा व गौरवाचा शोध घेण्यास आत्मा सुचवीत आहे.

1 योहान 2:1

माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करु नये यासाठी मी तुम्हांला या गोष्टी लिहीत आहे, पण जर एखादा पाप करतो तरपित्याकडे आमच्या वतीने विनवणी करणारा मध्यस्थ आमच्याकडे आहे. तो येशू ख्रिस्त आहे, जो नीतिमान आहे.

प्रकटीकरण 3:7

“फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिही:“जो पवित्र, सत्य, जो दाविदाची किल्ली ठेवतो त्याचे हे शब्द आहेत, जे तो उघडतो, ते कोणी बंद करु शकणार नाहीआणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.

प्रकटीकरण 19:10

यावर मी देवदूताच्या पायावर डोके ठेवून त्याची उपासना करु लागलो; परंतु देवदूत म्हणाला, “असे करु नको, मी तरतुझ्याबरोबरीचा आणि येशूच्या सत्याबाबत साक्ष देण्याची जबाबदारी तुझ्या ज्या भावांवर आहे, त्यांच्या बरोबरीचा एक सेवकमात्र आहे. देवाची उपासना कर! येशूच्या सत्याचे शिक्षण देणे हाच देवाच्या संदेशाचा आत्मा आहे.”

Interlinear

Choose Theme