Home Bibles मीखा 7:2 · मराठी बायबल
मीखा 7:2 · मराठी बायबल

ह्याचाच अर्थ, सर्व प्रामाणिक लोक गेलेत. ह्या देशात चांगले लोक उरले नाहीत. प्रत्येकजण कोणाला तरी ठार मारण्यासाठी टपला आहे. प्रत्येकजण आपल्या भावाला सापळ्यात अडकविण्याच्या प्रयत्नात आहे.

Cross references

1 शमुवेल 24:11

हा तुकडा पाहा तुमच्या अंगरख्याचा हा तुकडा मी कापून घेतला. मी तुमचा जीव घेऊ शकलो असतो पण मी तसे केले नाही. हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्याविरुद्ध माझे कसलेही कारस्थान चाललेले नाही हे कृपया घ्यानात घ्या. मी तुमचे काहीही वाकडे केलेले नाही. पण तुम्ही मात्र माझा जीव घेण्यास सारखे टपलेले आहात.

1 शमुवेल 26:20

आता मरताना तरी परमेश्वराचे सान्निध्य मला लाभू द्या. इस्राएलचा राजा तर जणू क्षुल्लक पिसवेच्या शिकारीला निघालाय. डोंगरात तितराची पारध करतोय!

स्तोत्रसंहिता 10:9

ते दुष्ट लोक खाण्यासाठी एखादा प्राणी पकडणाऱ्या सिंहासारखे असतात. ते गरीबांवर हल्ला करतात. दुष्टांनी तयार केलेल्या सापळड्यात गरीब अडकतात.

स्तोत्रसंहिता 12:1

परमेश्वरा, मला वाचव! सर्व चांगले लोक आता गेले आहेत. आता पृथ्वीवर खराखूरा भक्त उरलेला नाही.

स्तोत्रसंहिता 12:2

लोक त्यांच्या शेजाऱ्यांशी खोटे बोलतात. प्रत्येकजण शेजाऱ्याची खोटी स्तुती करुन त्याला चढवतो.

स्तोत्रसंहिता 14:1

दुष्ट माणूस मनातल्या मनात म्हणतो, “देव नाही” पापी लोक फार भयानक आणि कुजक्या गोष्टी करतात त्यांच्यातला एकही जण चांगल्या गोष्टी करीत नाही.

स्तोत्रसंहिता 57:6

माझ्या शत्रूंनी माझ्यासाठी सापळा रचला. ते मला सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न करतात. मी त्यात पडेन परंतु शेवटी तेच त्या खड्‌यात पडतील.

नीतिसूत्रे 1:11

ते पापी म्हणतील, “आमच्याबरोबर चल. आपण लपू आणि कोणाला तरी मारण्याची वाट बघू.

नीतिसूत्रे 12:6

दुष्ट लोक दुसऱ्यांना दु:ख देण्यासाठी आपल्या शब्दांचा वापर करतात. पण चांगल्या माणसाचे शब्द एखाद्याला संकटापासून वाचवू शकतात.

यशया 3:5

प्रत्येकजण दुसऱ्याविरूध्द उभा राहील, लहान थोरांचा मान राखणार नाहीत व सामान्य प्रतिष्ठितांचा आदर करणार नाहीत.”

यशया 57:1

सर्व सज्जन माणसे नष्ट झाली. ह्याची कोणी साधी दखलही घेतली नाही. सज्जन लोक एकत्र जमले पण का ते त्यांना कळत नाही, तेव्हा संकटापासून वाचविण्यासाठी सज्जनांना दूर नेले गेले हे कोणालाही समजले नाही.

यशया 59:7

आपल्या पायांचा उपयोग ते पापांकडे पळण्यासाठी करतात. निष्पाप लोकांना मारण्याची त्यांना घाई असते. ते दुष्ट विचार करतात. मारामारी आणि चोरी हेच त्यांच्या जगण्याचे मार्ग असतात.

यिर्मया 5:16

त्यांचे भाते उघड्या थडग्यांप्रमाणे आहेत. त्यांची सर्व माणसे शक्तिशाली सैनिक आहेत.

यिर्मया 5:26

माझ्या माणसांत काही दुष्ट आहेत. ते फासेपारध्यांप्रमाणे आहेत. हे लोक जाळे पसरवितात, पण पक्ष्यांना पकडण्या ऐवजी ते माणसांना पकडतात.

यिर्मया 16:16

“लवकरच मी पुष्कळ कोळ्यांना येथे बोलावीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “ते कोळी यहूदाच्या लोकांना पकडतील असे झाल्यावर मी पुष्कळ शिकाऱ्यांना आणीन. ते शिकारी प्रत्येक डोंगर, टेकड्या व कपारी यांमधून यहूदाच्या लोकांची शिकार करतील.

विलापगीत 4:18

सर्वकाळ, आमच्या शत्रूंनी आमची शिकार केली. आम्ही रस्त्यांवरसुध्दा जाऊ शकलो नाही. आमचा शेवट जवळ आला! आमचे आयुष्य सरले होते! आमचा अंत आला!

होशेय 6:9

लुटारू ज्याप्रमाणे कोणावर तरी हल्ला करण्यासाठी वाट बघत लपून बसतात, त्याचप्रमाणे धर्मगुरु शेखमला जाणाव्या रस्त्यावर वाटसंरूची वाट बघतात. त्यांनी दुष्कृर्त्ये केली आहेत.

मीखा 3:10

लोकांना मारुन तुम्ही सियोनची उभारणी केली. तुम्ही लोकांना फसवून यरुशलेम उभे केले.

हबक्कूक 1:15

शत्रू त्यांना गळाच्या आणि जाळ्याच्या साहाय्याने पकडतो तो त्यांना आत ओढतो. आपण पकडलेल्या सावजावर, शत्रु असतो.

प्रेषितांचीं कृत्यें 24:9

इतर यहूदी लोकांनी याला मान्यता दिली व सांगितले की, “हे सर्व खरे आहे!”

रोमकरांस 3:10

शास्त्रात असे लिहिले आहे:“पापाशिवाय असा कोणीही नाही. एकही नाही.

Interlinear

Choose Theme