Home Bibles योएल 2:30 · मराठी बायबल
योएल 2:30 · मराठी बायबल

मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक खुणा दाखवीन तेथे रक्त, आग व दाट धूर दिसेल.

Cross references

उत्पत्ति 19:28

त्याने तेथून सदोम व गमोरा नगराकडे व संबंध खोऱ्यातील तळवटीच्या प्रदेशाकडे नजर टाकली तेव्हा तो अवघा प्रदेश म्हणजे भल्यामोठ्या अग्नीच्या ज्वालांनी व धुराच्या लोटांनी भरलेला त्याला दिसला.

यहोशवा 8:20

आयचे लोक मागे वळून पाहतात तो त्यांना नगर जळताना दिसले. धूर आकाशात चढत होता. हे पाहून त्यांचे अवसान गळाले. इस्राएलांचा पाठलाग त्यांनी सोडून दिला. त्याबरोबर इस्राएल लोकांनी धावायचे थांबले. माघारे फिरून ते आयच्या लोकांबर तुटून पडले. आता आयच्या लोकांना पळता भुई थोडी झाली.

शास्ते 20:38

हे काम झाल्यावर मोठ्ठा धूर करायचा असे त्यांचे ठरले होते. धुराचा लोट पाहून काम फते झाल्याचे बाकी इस्राएलांना कळेल असा संकेत ठरला होता.

गीतरत्न 3:6

खूप लोकांच्या समूहाबरोबर वाळवंटातूनयेणारी ही स्त्री कोण आहे? गंधरस व ऊद आणि इतर धूवासिक द्रव्ये गाळल्यानंतर होणाऱ्या घुरासारखे त्यांच्या मागे धुळीचे लोट उडत आहेत.

मत्तय 24:29

“छळानंतर लगेच, असे घडेल:‘सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही. आकाशातील तारे व नक्षत्रे गळून पडतील आकाशातील सर्व शक्ती डळमळतील. आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल.

मार्क 13:24

“परंतु त्या दिवसांत ही संकट येऊन गेल्यावर, ‘सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही.

लूक 21:11

मोठे भूंकप होतील, दुष्काळ पडतील, आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील. आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.

लूक 21:25

“सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील.

प्रेषितांचीं कृत्यें 2:19

वर आकाशात मी अद्भुत गोष्टी दाखवीन, खाली पृथ्वीवर मी पुरावे देईन. तेथे रक्त, अग्नि आणि दाट धूर असतील.

प्रकटीकरण 6:12

मग कोकऱ्याला सहावा शिक्का उघडताना मी पाहिले. तेव्हा मोठा भूकंप झाला, सूर्य मेंढीच्या केसांपासून बनविलेल्याकाळ्या कापडासारखा झाला, पूर्ण चंद्र रक्तासारखा लाल झाला.

प्रकटीकरण 18:9

पृथ्वीवरील ज्या राजांनी त्या स्त्रीशी व्यभिचार केला, आणि जे तिच्या विलासाच्या दिवसाचे भागीदार झाले, ते ती जळतअसताना निघणारा धूर पाहून रडतील आणि तिच्याबद्दल शोक करतील.

प्रकटीकरण 18:18

आणि ती जळत आसताना तिचा धूर ते पाहतील तेव्हा ते ओरडून म्हणतील, “या नगरीसारखी दुसरी एवढी महान नगरीझाली नाही.”

Interlinear

Choose Theme