आता अगदी थोडक्या अवधीनंतर,“जो येणारा आहे, तो येईल, तो उशीर लावणार नाही.
Cross references
माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यांत जा. दारे लावून घ्या. थोडा्या वेळ खोलीतच लपून बसा. देवाचा राग शांत होईपर्यंत लपून राहा.
सर्वात लहान कुटुंबाचा मोठा समूह होईल. सर्वांत लहान कुटुंबाचे मोठे बलवान राष्ट्र होईल. योग्य वेळी मी, परमेश्वर, त्वरेने येईन. मी ह्या गोष्टी घडवून आणीन.”
हा संदेश भविष्यातील विशिष्ट काळासाठी आहे. हा अंताबद्दलचा संदेश आहे आणि तो खरा ठरेल ती वेळ कदाचित कधीच येणार नाही असे वाटेल, पण धीर धरा आणि वाट पाहा! ती वेळ येईल ती येण्यास फार विलंब लागणार नाही.
आणि त्याला विचारले, “जो येणार होता, तो तूच आहेस? किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?”
मी तुम्हांस सांगतो, तो त्यांना न्याय देईल. तरीही जेव्हा मनुष्याचा पुत्र येतो, तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
यासाठी बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो.
परंतु, प्रिय मित्रांनो, ही एक गोष्ट विसरु नका की, प्रभूला एक दिवस एक हजार वर्षांसारखा आणि एक हजार वर्षे एकादिवसासारखी आहेत.
जो येशू या गोष्टीविषयीसाक्ष देतो, तो म्हणतो, “होय, मी लवकर येतो.”आमेन, ये प्रभु येशू, ये!