तुला पाहून पर्वत कापले भूमीतून पाणी उसळले. समुद्राच्या पाण्याने प्रचंड गर्जना केली. जणू काही त्याने आपली भूमीवरील सत्ता गमावल्यामुळे ते आकांत करीत होते.
Cross references
आणि इस्राएल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंती सारखे उभे राहिले.
तीन दिवसानंतर पर्वतावर विजांचा लखलखाट व गडगडाट झाला; पर्वतावर एक दाट ढग उतरला आणि रणशिंगाचा फार मोठा आवाज झाला. तेव्हा छावणीत राहाणारे सर्व लोक घाबरले.
(सुगीच्या दिवसात यार्देन दुथडी भरून वाहात असते त्याप्रमाणे तिचा प्रवाह फुगलेला होता.) कोश वाहणारे याजक नदीकाठी आले. त्यांनी पाण्यात पाऊल टाकले.
यहोशवाचे ऐकून याजक करारकोश घेऊन नदीच्या पात्रातून बाहेर आले. याजकांचे पाय जमिनीला लागताच पाणी पुन्हा पूर्ववत वाहू लागले. नदी पुन्हा पहिल्यासारखी दुथडी भरून वाहू लागली.
““तेव्हा तुमच्या परमेश्वर देवाने नदीचा प्रवाह रोखला होता. आम्ही तांबडा समुद्र ओलांडला त्यावेळी झाले तसेच येथेही लोकांनी नदी ओलांडेपर्यंत नदीचे पात्र कोरडे होते. तांबडा समुद्रही परमेश्वराने असाच आटवला होता.’
परमेश्वरा. पूर्वी जेव्हा तू सेईरमधून आलास, अदोम भूमीतून तू कूच केलेस. तेव्हा पृथ्वी थरारली. आकाशाने वर्षाव केला ढगातून वृष्टी झाली.
त्यांच्या डोळयादेखत तू तांबडा समुद्र दुभंगून दाखवलास. आणि ते कोरड्या जमिनीरुन चालत गेले. मिसरचे सैन्य त्यांचा पाठलाग करत होते पण तू त्या शत्रूला समुद्रात फेकून दिलेस आणि ते समुद्रात दगड बुडावा तसे बुडुन गेले.
परमेश्वरा, तू धमकावून बोललास आणि सोसाट्याचा वारा तुझ्या मुखातून बाहेर पडला पाणी हटवले गेले आणि आम्हाला समुद्राचा तळ दिसू शकला. आम्हाला पृथ्वीचा पाया बघता आला.
आणि कुरणे मेंढ्यांनी झाकली गेली आहेत. दऱ्या धान्यांनी भरल्या आहेत. प्रत्येक जण आनंदाने गात आहे आणि ओरडत आहे.
देवाने समुद्राचे कोरडे वाळवंट बनवले त्याची आनंदी माणसे चालत नदीच्या पलिकडे गेली.
देवा, तू तुझ्या माणसांना मिसरमधून बाहेर काढलेस. तू वाळवंटातून चालत गेलास.
देवा, लाल समुद्र दुभागण्यासाठी तू तुझ्या शक्तीचा उपयोग केलास.
देवा, पाण्याने तुला पाहिले आणि ते घाबरले, खोल पाणी भयाने थरथरले.
दाट ढगांनी पाणी खाली सोडले, लोकांनी वरच्या उंच ढगातला गडगडाट ऐकला. नंतर तुझे विजांचे बाण ढगातून चमकू लागले.
परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे. आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.
स्वर्गांनो, सुखी राहा! पृथ्वीमाते आनंदोत्सव कर. समुद्र आणि त्यातील प्राण्यांनो आनंदोत्सव करा.
त्याची वीज आकाशात चमकते. लोक ती बघतात आणि घाबरतात.
कर्णे आणि शिंग वाजवून आपल्या राजाचे, परमेश्वराचे गुणवर्णन करा.
लाल समुद्राने हे पाहिले आणि तो पळून गेला. यार्देन नदी वळली आणि पळाली.
देवाने लाल समुद्र दोन भागात विभागला. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
पूर्वी परमेश्वराला राग आला व त्याने समुद्र दुभंगून आपल्या माणसांना मिसरमधून बाहेर काढले आता पण तसेच होईल परमेश्वर युफ्राटिस नदी दुभंगवेल. तो नदीवर हातातील दंड मारील आणि तिचे सात लहान नद्यांत विभाजन करील. त्या नद्या खोल नसतील. लोक त्या चालत सहज पार करू शकतील.
हिंस्र पशुसुध्दा माझे आभार मानतील. मोठे प्राणी आणि पक्षी मला मान देतील. मी जेव्हा वाळवंटात पाणी आणि कोरड्या जमिनीवर नद्या निर्माण करीन तेव्हा ते माझा आदर करतील. मी निवडलेल्या. माझ्या लोकांना पाणी मिळावे म्हणून मी हे करीन.
माझे शब्द आनंदाने बाहेर जातील आणि शांती घेऊन येतील. डोंगर आणि टेकड्या आनंदाने नाचू लागतील. शेतांतील झाडे आनंदाने टाळ्या वाजवतील.
पण पूर्वी काय घडले याची परमेश्वराला अजून आठवण आहे. मोशे आणि त्याची माणसे त्याला आठवतात. त्यांना समुद्रपार करणारा तोच एकमेव परमेश्वर आहे. परमेश्वराने त्याच्या मेंढपाळांना (संदेष्ट्यांना) कळप (माणसे) वळवायला लावले. पण मोशेला आपला आत्मा देणारा तो परमेश्वर आता कोठे आहे?
जर तू आकाश फाडून खाली पृथ्वीवर उतरलास तर प्रत्येक गोष्ट बदलेल. डोंगर तुझ्यासमोर वितळतील.
मी डोंगराकडे पाहिले ते कापत होते. सर्व टेकड्या थरथरत होत्या.
विस्तवाजवळ ठेवल्यास मेण वितळते, तसे त्याच्या पायाखाली पर्वत वितळतील. दऱ्या दुभंगतील आणि उंच टेकड्यावरुन वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे वाहू लागतील.
परमेश्वर येईल तेव्हा पर्वतांचा भीतीने थरकाप होईल टेकड्या वितळून जातील परमेश्वर येईल तेव्हा धरणी भयभीत होऊन थरथर कापेल. एवढेच नाही तर, हे जग आणि त्यातील प्रत्येक माणूस भीतीने कापेल.
परमेश्वराने स्वत: उभे राहून, पृथ्वीला न्याय दिला त्याने राष्ट्रांतील लोकांवर नजर टाकली आणि त्या लोकांचा भीतीने थरकाप झाला. पुष्काळ वर्षे पर्वत घटृपणे उभे होते पण त्यांचा चक्काचूर झाला. अती प्राचीन टेकड्या खाली कोसळल्या देवाचे नेहमीच हे असे असते.
त्याचवेळी, येशू मेल्याबरोबर मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत दुभागला गेला, भूकंप झाला, खडक फुटले.
विश्वासाने त्यांनी जणू काय कोरड्या जमिनीवरुन चालावे, तसा तांबडा समुद्र पार केला. पण जेव्हा इजिप्तच्या लोकांनी तसे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते बुडाले.
जसे गुंडाळी गुंडाळतात तसे, आकाश गुंडाळले गेले, आणि प्रत्येक पर्वत वबेट त्याच्या स्थानावरुन हलविले गेले.
सहाव्या देवदूताने त्याची वाटी फरात नदीवर ओतली. नदीतील पाणी सुकून गेले. त्यामुळे पूर्वेकडून येणाऱ्या राजांसाठीरस्ता तयार झाला.
नंतर एक मोठे पांढरे सिंहासन आणि त्याच्यावर जो बसला होता. त्याला मीपाहिले. त्याच्या समोरुन पृथ्वी आणि आकाश ही पळून गेली. आणि त्याच्यासाठी कोठेच जागा नव्हती.