Cross references
गव्हाच्या हंगामाच्या दिवसात रुबेन शेतात गेला असता त्याला काही विशेष प्रकारची फुले सांपडलीत्याने ती फुले आपली आई लेआ हिच्याकडे आणून दिली; परंतु राहेल लेआला म्हणाली, “तुझा मुलगा रुबेन याने आणलेल्या पुत्रदात्रीच्या फुलातून काही फुले कृपा करुन मला दे.”
लेआ हिचे मुलगे - याकोबाचा पाहिला मुलगा रऊबेन आणिशिमोन, लेवी, यहुदा, इस्साखार व जबुलून;
“इस्साखार अतिशय कष्टाने काम करणाऱ्या गाढवासारखा होईल; जड वजनाचे सामान वाहून नेल्यावर तो विश्रांती घेईल.
इस्साखार वंशातला सुवाराचा मुलगा नथनेल;
इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वाची नोंद करण्यात आली;
इस्साखारच्या कुळातील काही कुळे अशी:तोलाचे तोलाई कूळ पूवाचे पुवाई कूळ.
याशूबचे याशूबी कूळ, शिम्रोनचे शिम्रोनी कूळ.
मोशे जबुलूनबद्दल म्हणाला,“जबुलूना, बाहेर जाल तेव्हा आनंद करा. इस्साखारा आपल्या डेऱ्यात आनंदाने राहा.
रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून,
स्साखारला चार मुलगे होते. त्यांची नावे अशी: तोला, पुवा, याशूब आणि शिम्मोन.
इस्साखारच्या घराण्यातील 200 जाणती, जबाबदार माणसे आली. इस्राएलने केव्हा काय करणे योग्य आहे याचे त्यांना चांगले भान होते. त्यांचे भाऊबंद त्यांच्या सोबत, त्यांच्या आज्ञेत होते.