Home Bibles उत्पत्ति 43:18 · मराठी बायबल
उत्पत्ति 43:18 · मराठी बायबल

योसेफाच्या घरी नेल्यावर ते भाऊ फार घाबरले. ते म्हणाले, “मागच्या वेळी आपल्या पोत्यात आपण दिलेले पैसे परत ठेवण्यात आले म्हणून आपणास येथे आणले आहे, त्यावरुन आपणास दोषी ठरवून ते आपली गाढवे घेतील व आपल्याला गुलाम करतील असे वाटते.”

Cross references

उत्पत्ति 42:21

ते एकमेकांस म्हणाले, “आपला धाकटा भाऊ योसेफ याच्याशी आपण वाईट रीतीने वागलो त्याचा बदला म्हणून आपणास ही शिक्षा होत आहे. त्याने त्याला सोडून द्यावे व त्याचा जीव वाचवावा म्हणून काकुळतीने रडून आपणास विनंती केली परंतु आपण त्याचे ऐकले नाही म्हणून आता आपणास हे भोगावे लागत आहे.”

उत्पत्ति 42:27

ते भाऊ रात्रीच्या मुक्कामासाठी एका ठिकाणी थांबले. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्याच्या गाढवाला थोडेसे धान्य देण्यासाठी आपली गोणी उघडली तेव्हा त्याने धान्यासाठी दिलेल पैसे त्याला त्या गोणीत आढळले.

उत्पत्ति 42:28

तेव्हा तो आपल्या इतर भावांना म्हणाला, “पाहा! धान्यासाठी मी दिलेले हे पैसे कोणीतरी पुन्हा माझ्या गोणीत ठेवले आहेत!” तेव्हा ते भाऊ अतिशय घाबरले, ते एकमेकांस म्हणाले, “देव आपल्याला काय करत आहे.”

उत्पत्ति 42:35

मग ते भाऊ आपापल्या पोत्यातून धान्य काढावयास गेले; तेव्हा प्रत्येकाच्या पोत्यात पैशाची पिशवी मिळाली. त्या पैसाच्या पिशव्या पाहून ते भाऊ व त्यांचा बाप हे अतिशय घाबरले.

उत्पत्ति 44:8

मागे आमच्या पोत्यात मिळालेले पैसे आम्ही आता येताना आठवणीने आणले; तेव्हा खात्रीने आपल्या स्वामीच्या घरातून आम्ही सोने किंवा चांदी चोरणार नाही.

अनुवाद 22:14

“मी या बाईशी लग्र केले पण ती कुमारी नसल्याचे आमच्या शरीरसंबंधाच्या वेळी मला आढळून आले’ असा खोटा आरोप त्याने तिच्यावर ठेवला तर लोकांमध्ये तिची बदनामी होईल.

अनुवाद 22:17

त्याने तिच्यावर भलते सलते आरोप केले आहेत. आणि हा म्हणतो की कौमार्याची लक्षणे तिच्या ठायी आढळली नाहीत. पण हा घ्या माझ्या मुलीच्या कौमार्याचा पुरावा,’ असे मुलीच्या वडलांनी नेथे सांगून, त्या मंडळींना ती चादर दाखववावी.

शास्ते 13:22

मानोहा बायकोला म्हणाला, “आपण आता खात्रीने मरणार. कारण आपण प्रत्यक्ष देवाला पाहिले आहे.”

शास्ते 14:4

(परमेश्वराच्या मनात तसेच आहे हे शमशोनच्या आईवडीलांना ठाऊक नव्हते. पलिष्टी तेव्हा इस्राएलींवर सत्ता गाजवत होते. त्यांच्या विरुद्ध काहीतरी करायची संधी परमेश्वर पाहात होता.)

ईयोब 15:21

त्याला प्रत्येक आवाजाची भीती वाटते. जेव्हा आपण सुरक्षित आहोत असे त्याला वाटते तेव्हा त्याचा शत्रू त्याच्यावर हल्ला करतो.

ईयोब 30:14

ते भिंतीला भोक पाडतात. ते त्यातून आत घुसतात आणि माझ्यावर दरडी कोसळतात.

स्तोत्रसंहिता 53:5

परंतु त्या दुष्टांना भीती वाटेल, पूर्वी कधीही भ्याले नव्हते इतके ते भीतील. ते दुष्ट लोक इस्राएलचे शत्रू आहेत. देवाने त्या दुष्टांना नाकारले आहे. म्हणून देवाची माणसे त्यांचा पराभव करतील. आणि देव त्या दुष्टांची हाडे इतस्तत फेकेल.

स्तोत्रसंहिता 73:16

या गोष्टी समजण्याचा मी खूप प्रयत्न केला पण तुझ्या मंदिरात येण्यापूर्वी ते माझ्यासाठी फारच कठीण होते.

यशया 7:2

“सिरीया आणि एफ्राइम (इस्राएल) यांच्या सैन्यांची एकजूट झाली आहे आणि त्यांनी एकत्र तळ ठोकला आहे,” असे दाविदच्या वंशजाला कळविण्यात आले.”जेव्हा राजा आहाज ह्याला हा. संदेश कळला तेव्हा तो व त्याची प्रजा अतिशय घाबरून गेले. रानातील वृक्ष वाऱ्याने ज्याप्रमाणे कापतात तशीच भीतीने त्यांची स्थिती झाली.

मत्तय 14:26

शिष्य त्याला पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले, त्यांना वाटले, भूतबीत आहे की काय म्हणून ते भूत, भूत असे ओरडू लागले.

मार्क 6:16

परंतु हेरोदाने जेव्हा ऐकले तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तो मरणातून उठविला गेला आहे.”

रोमकरांस 7:8

परंतु पापाने संधी साधली आणि मजमध्ये सर्व प्रकारचा लोभ भरला. कारण नियमशास्त्राशिवाय पाप मृतवत आहे.

Interlinear

Choose Theme