Home Bibles उत्पत्ति 43:19 · मराठी बायबल
उत्पत्ति 43:19 · मराठी बायबल

म्हणून मग ते भाऊ योसेफाच्या कारभाऱ्याकडे गेले.

Cross references

उत्पत्ति 15:2

परंतु अब्राम म्हणाला, “परमेश्वर देवा, असे काहीही प्रतिफळ नाही की जेणे कडून मला आनंद होईल, कारण मला मुलगा नाही; म्हणून माझ्या मरणानंतर माझे सर्वकाही दिमिष्कातील माझा गुलाम, अलिएजर यालाच मिळेल.”

उत्पत्ति 42:20

मग तुमच्या धाकट्या भावास येथे माझ्याकडे घेऊन या. यावरुन तुम्ही माझ्याशी खरे बोलता किंवा नाही याची मला खात्री पटेल.” आणि तुम्हाला मरावे लागणार नाही.”तेव्हा तसे करण्यास ते भाऊ कबूल झाले.

उत्पत्ति 43:16

मिसरमध्ये त्या भावांच्याबरोबर योसेफाने बन्यामीनास पाहिले; तेव्हा योसेफ आपल्या कारभाऱ्यास म्हणाला, “या लोकांना माझ्या घरी आण. एक चांगला पोसलेला पशू मारुन भोजन तयार कर, कारण हे सर्वजण दुपारी माझ्याबरोबर भोजन करतील.”

उत्पत्ति 44:1

मग योसेफाने आपल्या कारभाऱ्याला आज्ञा देऊन म्हटले, “या लोकांच्या पोत्यात जेवढे अधिक धान्य मावेल व त्यांना देता येईल तेवढे भर; आणि त्या सोबत प्रत्येकाचे पैसेही त्या पोत्यात ठेव.

मत्तय 20:8

संध्याकाळी मळ्याचा मालक मुकादमाला म्हणाला, मजुरांना बोलवा आणि त्यांना त्यांची मजुरी देऊन टाका! मी ज्यांना अगदी शेवटी कामावर आणले त्यांना अगोदर मजुरी द्या. नंतर बाकीच्या सर्वांना मजुरी द्या. मी कामावर रोजगारीने पहिल्याने बोलाविलेल्यांना सर्वात शेवटी मजुरी द्या.’

लूक 16:1

येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “एक श्रीमंत मनुष्य होता. त्याचा एक कारभारी होता. “हा कारभारी तुमचे पैसे उधळतो.’ असे त्या श्रीमंत माणसाला सांगण्यात आले.

Interlinear

Choose Theme