Home Bibles शास्ते 13:22 · मराठी बायबल
शास्ते 13:22 · मराठी बायबल

मानोहा बायकोला म्हणाला, “आपण आता खात्रीने मरणार. कारण आपण प्रत्यक्ष देवाला पाहिले आहे.”

Cross references

उत्पत्ति 32:30

म्हणून याकोबाने त्या जागेचे नाव पनीएल ठेवले. याकोब म्हणाला, “ह्या ठिकाणी मी देवाला तोंडोतोंड पाहिले आहे परंतु माझा जीव वाचवला गेला.”

निर्गम 3:6

मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव आहे.”देवाकडे पाहाण्यास मोशेला भीती वाटली म्हणून त्याने आपले तोंड झाकून घेतले.

निर्गम 24:9

नंतर मोशे, अहरोन, नादाब, अबीहू व इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर चढून गेले.

निर्गम 24:10

तेथे त्यांनी इस्राएलच्या देवाला पाहिले; नीलमण्यांच्या चौथऱ्यासारखे तेथे काही होते, ते आकाशाप्रमाणे स्वच्छ व निळेभोर होते त्यावर देव उभा होता!

निर्गम 33:20

परंतु तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही माणूस जगणार नाही.

अनुवाद 4:38

तुम्ही जसे पुढे जाल तसे त्याने तुमच्यापेक्षा मोठ्या व समर्थ राष्ट्रांना हुसकून लावले आणि तेथे तुमचा शिरकाव करुन दिला. त्यांचा प्रदेश त्याने तुम्हाला राहाण्यासाठी दिला. आजही तो हे करत आहे.

अनुवाद 5:26

साक्षात देवाला अग्नीतून बोलताना ऐकूनही नंतर जिवंत राहिला आहे, असा आमच्याखेरीज कोणी ही नाही.

शास्ते 6:22

तेव्हा गिदोनच्या लक्षात आले की इतका वेळ आपण परमेश्वराच्या दूताशी बोलत होतो. तेव्हा तो चित्कारला, “सर्व शक्तिमान परमेश्वरा! मी परमेश्वराच्या दूताला समोरासमोर पाहिले!”

यशया 6:5

मी फारच घाबरलो. मी म्हणालो, “हाय रे देवा! आता माझा नाश होणार देवाशी संवाद करण्याइतका मी पवित्र किंवा शुध्द नाही आणि मी ज्या माणसांत राहतो, तीही देवाशी प्रत्यक्ष बोलण्याइतकी शुध्द नाहीत.तरीसुध्दा राजाधिराज, सर्वशक्तिमान परमेश्वराला मी पाहिले आहे.”

योहान 1:18

कोणाही मनुष्याने आतापर्यत देवाला कधी पाहिले नाही. परंतु एकमेव देव (येशू) जो बापाच्या उराशी आहे, तो पुत्राद्वारे आम्हांला प्रकट झाला आहे.

योहान 5:37

आणि ज्या पित्याने मला पाठविले त्याने स्वत:ही माझ्याविषयी साक्ष दिलेली आहे. परंतु तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही, तो कसा दिसतो हे तुम्ही कधी पाहिले नाही.

Interlinear

Choose Theme