दावीद शौलकडे गेला आणि त्याच्या समोर उभा राहिला. शौलला तो फारच आवडला. दावीद त्याचा शस्त्रवाहक बनला.
Cross references
योसेफ मिसर देशाचा राजा फारो याची सेवा करु लागला तेव्हा तो अवघा तीस वर्षांचा होता; योसेफाने मिसर देशभर दौरा करुन देशाची पाहणी केली.
पण तुझ्या सेवेस हजर राहणारा, नूनाचा मुलगा यहोशवा तेथे जाईल. त्याला तू प्रोत्साहन दे कारण इस्राएलांना तोच देश वतन म्हणून मिळवून देईल.’
त्यावेळी परमेश्वराने एका खास कामगिरीसाठी लेवीचा वंश इतरांपेक्षा वेगळा केला. परमेश्वराच्या आज्ञापटाची ती पेटी वाहून नेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. याजक म्हणून परमेश्वराची सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकांना आशीर्वाद देणे ही त्यांची कामे होती. ती ते अजूनही करतात.
तुझ्या बायकाआणि कारभारी खरेच फार भाग्यवान आहेत. तुझ्या सेवेचे भाग्य त्यांना लाभने आणि तुझ्या ज्ञानाचा लाभ त्यांना होतो.
लोक खरोखरच मदत करु शकत नाहीत. तुम्ही मदतीसाठी लोकांवर खरोखरच विश्वास टाकू शकत नाही. देवाशी तुलना करता ते हवेतल्या फुंकरीसारखे न गण्य आहेत.
परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे तुमच्या नेत्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.
तुमच्या नेत्यांवर मदतीसाठी अवलंबून राहू नका. लोकांवर विश्वास टाकू नका. का? कारण लोक तुम्हाला वाचवू शकत नाहीत.
जर एखादा माणूस त्याच्या कामात तरबेज असला तर तो राजांची चाकरी करण्यायोग्य असतो. त्याला बिनमहत्वाच्या लोकांसाठी काम करावे लागणार नाही.